… अन्यथा मातोश्रीच्या दारात आंदोलन करु – करण गायकर ; डीजे बंदीवरुन डीजे मालक आक्रमक
. . .अन्यथा मुंबईत मातोश्रीच्या दारात आंदोलन करु – करण गायकर
डीजे बंदीवरुन डीजे मालक आक्रमक
छावा क्रांतिवीर सेना प्रणिक पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनचा पदग्रहण समारंभ व मार्गदर्शन मेळावा संपन्न
कळंब | छावा क्रांतिवीर संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित पुणे जिल्हा साउंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनचा तालुका कमिटी पदग्रहण समारंभ व मान्यवर मार्गदर्शन मेळावा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, केंद्रिय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील, संपर्कप्रमुख क्रांतीनाना मळेगावकर, सह्याद्री मळेगावकर, पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष अनिल पाटील, खजिनदार सागर सुतार, साई उंद्रे, सचिव अमोल आमले, सल्लागार अॅड.सुनिल अोव्हाळ, यांसह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर म्हणाले की, साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मुंबईत मातोश्रीच्या दारात आंदोलन करु असे सांगत मागण्या मान्य करणे शक्य नसेल तर सरकारने साऊंड मालकांचे साहित्य विकत घेऊन कर्ज माफ करावे असा इशारा सरकारला दिला.
तांत्रिक गोष्टींचा विचार करून सरकारने योग्य ते नियमांना अनुसरून सरकारने परवानगी द्यावी असे मनोगत राजु देवकर यांनी व्यक्त केले.
यावेळी साऊड सिस्टिम व लाईट असोसिएशनकडुन तहसिलदार जुन्नर, उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर, विविध पोलिस स्टेशन यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात अाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर यांनी दिली.
कोविड लाॅकडाऊन तसेच डिजेबंदीमुळे साऊंड सिस्टिम व लाईट मालकांवर व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली अाहे. त्यामुळे शासनाने साऊंड व लाईट मालकांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे, कर्ज माफ करावे, डिजे वाजवण्यास नियमात परवानगी द्यावी यांसह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या असुन शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन पुकारुन रस्त्यावर उतरु असा इशाराही छावा क्रांतिवीर सेना व साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशन कडुन देण्यात आला आहे.
यानिमित्तानं पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनचे संघटक गुड्डु भांबुरे, पिंटु इलेक्ट्राॅनिकचे राजु देवकर, जिल्हा संचालक योगेश पाटील, निकेश मोरे, अमोल आमले, जुन्नर तालुकाध्यक्ष रोहित भुमकर, आंबेगाव तालुकाध्यक्ष अमोल मोरडे, खेड तालुकाध्यक्ष गणेश पाटोळे, यांसह छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी, सदस्य व पुणे जिल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुका साउंड सिस्टिम असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सल्लागार अॅड.सुनिल अोव्हाळ, सुत्रसंचालन गणेश मोढवे तर आभार जिल्हा संघटक गुड्डु भांबुरे यांनी मानले.
Leave a Reply