रस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत जुन्नरच्या रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा 

रस्त्यावर सापडलेले १८ हजार रुपये केले परत सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांचा प्रामाणिकपणा 

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | समाजात एकीकडे पैसा हा सर्वस्व मानला जात असताना याच पैशांमुळे नाते-गोतेही दुरावले जात आहेत. मात्र, आजही समाजात काही अशी माणसे आहेत, जी पैशांपेक्षा माणुसकीचा विचार करताना दिसतात.

याचाच प्रत्यय रविवारी जुन्नर-आपटाळे रोडवर आला. हरवलेले 18 हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांनी प्रामाणिकपणा जपत तेवढ्याच तन्मयतेने परत केले.

जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील बाळू बिडवई हे रविवारी संध्याकाळी जुन्नर येथे कामानिमित्त निघाले. जुन्नर पोचल्यानंतर त्यांच्या खिशातील 18 हजार रुपये रस्त्यात पडल्याचे काही अंतर पुढे गेल्यानंतर पडल्याचे लक्षात येताच बिडवई यांना धक्का बसला. संपूर्ण रस्त्यावर शोधाशोध करूनही त्यांना पैसे मिळाले नाही. बिडवई यांनी पुन्हा जुन्नर -आपटाळे रोडवर पैसे शोधायला सुरवात केली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रिजवान पटेल यांना सोमतवाडी पेट्रोलपंपाजवळ हरवलेले पैसे सापडले होते या तरुणाने प्रामाणिकपणा दाखवत हरवलेले 18 हजार रुपये सापडल्याचे मित्र तौसिफ़ खान यांस सांगितले. पटेल यांनी खान यांनासोबत घेऊन जुन्नर रोड वर कोणी रस्त्यावर शोधत असेलच या भावनेनं समोरच्या व्यक्तीचा शोध घेतला. व सापडलेले 18 हजार रुपये त्यांना सुपूर्त केले.

सध्या कोरोना लाॅकडाऊनमुळे सर्वच जण अडचणीत आहेत. ज्या व्यक्तीचे पैसे हरवले असतील त्याची काय अवस्था असेल या विचारातूनच आपण हे पैसे परत केल्याचे रिजवान पटेल व तौसिफ़ खान यांनी सांगितले.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat