ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’स एक कोटींची मदत

‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’ला एक कोटींची मदत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द

मुंबई | ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19’साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला.

महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यशासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19’साठी 1 कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी आमदार राजेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे उपस्थित होते.

‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’चे संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद यांनी सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN

Open chat