‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान! – आ.महेश लांडगे

‘औद्योगिकनगरी’ पिंपरी-चिंचवडचा रहिवाशी असल्याचा मला अभिमान

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या भावना
– महापालिका वर्धापनदिनानिमित्त शहरवासियांना दिल्या शुभेच्छा

सजग वेब टीम, पुणे

पिंपरी । महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर अशी ओळख असलेल्या औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडचा मी रहिवाशी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ३८ वा वर्धापन दिन (स्थापना दिवस) रविवारी साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आमदार लांडगे यांनी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे शहरवासीयांशी संवाद साधला.
आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३८ वर्षांच्या वाटचालीमध्ये स्व. अण्णासाहेब मगर यांच्यापासून शहराच्या विकासाला सुरूवात झाली. प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे यांच्यापासून विद्यमान महापौर उषा उर्फे माई ढोरे यांच्यापर्यंत अनेक महापौर, नगरसेवक, स्थायी समिती चेअरमन, विरोधी पक्षाचे नेते यांचे योगदान आहे. तसेच, आतापर्यंतचे सर्व महापालिका आयुक्त, अधिकारी, आजी- माजी पदाधिकारी, कर्मचारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. विशेष म्हणजे, शहरात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कष्टकरी, चाकरमानी लोकांनी या शहराच्या विकासात भरच घातली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्धापन प्रतिवर्षी उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी देशावर, राज्यावर आणि आपल्या शहरावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. गेले सहा-सात महिने आपण सर्वजण संघर्ष करीत आहोत. किंबहून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिक आणि प्रशासन काम करीत आहे. या लढाईत आपण अनेक जवळच्या लोकांना गमावले आहे. या संकटाच्या काळात प्रत्येक गरजवंताला मदत करण्यासाठी आपण सूजान नागरिक म्हणून पुढाकार घेतला आहे. यापुढील काळात शहराची वाटचाल अधिक झपाट्याने होईल. यात शंका नाही, असा विश्वासह आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांनाही दिल्या शुभेच्छा…
पिंपरी-चिंचवडच्या विकासात आजवर सर्वपक्षीय नेत्यांनी योगदान दिले आहे. या शहरातील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येत पक्षातील नेत्यांनी आपआपल्यापरीने काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंद मानून लोकप्रतिनिधींनी विकासात योगदान दिले आहे. काही कामांना दिरंगाई निश्चित झाली. पण, विकासाच्या दृष्टीने प्रत्येकाने भूमिका ठेवली आहे.

नगरसेवक जबाबदारीने काम करताहेत…
प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाने आपल्या सोयी-सुविधांबाबत महापालिका सभागृहात पाठपुरावा करावा. यासाठी नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे. या भूमिकेतून महापालिकेतील सर्व नगरसेवक जबाबदारीने काम करीत आहेत. शहरात वाढणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने वाढणाऱ्या समस्या- अडचणी सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक योगदान देत आहेत. शहरातील नागरिकांच्या सूचनांचाही विकासकामांमध्ये समावेश केला जात आहे, असा विश्वासह आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिला.

Read more...

कंत्राटी कामगारांना महापालिका आस्थापनेवर कायमस्वरुपी घ्या – आ. महेश लांडगे

पिंपरी-चिंचवडमधील ‘कोरोना योद्धे’ आरोग्य कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत!

– आमदार महेश लांडगे यांची आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे मागणी

– कंत्राटी कामगारांना महापालिका अस्थापनेवर कायमस्वरुपी घ्या!

पिंपरी (दि.२) । पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत सुमारे २५ लाख नागरिकांना सक्षम आरोग्य सुविधा देण्याच्या भूमिकेतून प्रशासने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कायमस्वरुपी डॉक्टर भरती करण्यात येत आहे. मात्र, गेल्या २३ वर्षांपासून आरोग्य विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे घंटागाडी कर्मचारी, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक, आरोग्य सेविका यांच्यासह महापालिका रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांना महापालिका अस्थापनेवर कायमस्वरुपी रुजू करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने डॉक्टर भरती प्रस्ताव आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी अस्थापनेवर घेण्याबाबतची उपसूचना सर्वसाधारण सभेत मंजूर केली आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी तात्काळ करावी, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.
दरम्यान, आरोग्य विभागात काम करणारे चतुर्थ श्रेणीतील कंत्राटी कर्मचारी यांना महापालिका अस्थापनेवर रजू करुन घेण्यात यावे, या मागणीसाठी माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील अॅटोक्लस्टर येथे कर्मचारी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपचे १७ नगरसेवक, तसेच मनपा कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी आयुक्त हर्डिकरांसमोर बाजू मांडली.

महापालिका आरोग्य विभागात प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गत केलेल्या परिपत्रक / आदेशानुसार तात्पुरत्या स्वरुपात विविध पदे मानधनावर सहा महिने कालावधीकरिता भरण्यात येतात. सदरची प्रक्रिया २००७ पासून सुरू आहे. काही कर्मचारी यांनी महापालिकेत कायमस्वरुपी सामावून घेणे व सेवा खंडित करु नये याकरिता न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिला आहे. परिणामी, गेल्या १३ वर्षांपासून कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्दवाढ होवून नवीन १८ महसुली गावांचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या एकूण क्षेत्रफळात व लोकसंख्येत वाढ झाल्याने आरोग्यविषयक सुविधा पुरवणे महापालिकेचे अत्यावश्यक व तातडीचे कर्तव्य आहे.

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता द्या..
सध्या कोरोनाच्या परिस्थितीत आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून सन्मान दिला जात आहे. पण, प्रशासनाची वागणूक ही कंत्राटी कर्मचारी अशीच आहे. पनवेल आणि मुंबई महापालिका प्रशासनाच्या धर्तीवर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये कोविड भत्ता द्यावा.
कोरोना विषाणुचा वाढता प्रसार पाहता यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे न्यायालयात दाखल प्रकरणापैकी जे कर्मचारी वर्षांनुवर्षे कर्तव्यावर गैरहजर राहून रुग्णसेवा देत नाहीत. तसेच, कोरोनाच्या साथरोग कालावधीत रुग्णसेवा न देता गैरहजर राहिले आहेत, असे कर्मचारी सोडून ज्या कर्मचाऱ्यांनी सलग सेवा दिली आहे. तसेच प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम (RCH), राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM) कार्यक्रमांतर्गत कर्मचारी, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकण कार्यक्रम अंतर्गत कर्मचारी (NTEP) अशा कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिका अस्थापनेवर घेण्यात यावे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

महापालिका सफाई संवर्गात ८०० पदे रिक्त…
पिंपरी-चिंचवड महापालिका अस्थापनेवर सध्यस्थितीला सफाई संवर्गात २५९३ पदे मंजूर असून ८०० पदे रिक्त आहेत. अशा घंटागाडी कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करुन घेण्यासाठी त्यांची शैक्षणिक आर्हतेची माहिती घ्यावी. मनपाचे सेवा नियमानुसार सफाई संवर्गातील पदासाठी चौथी पास अशी शैक्षणिक आर्हता आहे. सदरची आर्हता सध्या कार्यरत असलेल्या घंटागाडी ठेकेदार यांच्याकडे आहे किंवा कसे? याची तपासणी करुन नियुक्तीची कार्यवाही करावी. या कर्मचाऱ्यांना नियुक्त्या द्यावयाचे झालेस बिंदू नामावली तपासून नियुक्तीची कार्यवाही करावी. आज अखेर घंटागाडी ठेकेदार यांचे निधन झालेल्या त्यांच्या वारसांना महापालिका सेवेत लाड-पागे धोरण लागू करण्याबाबत कार्यवाही करावी. सध्या कार्यरत असलेले घंटागाडी ठेकेदार वयाधिक झाले असतील, तर त्यांचे बाबतीत संबंधित कर्मचारी महापालिका सेवेत घंटागाडी ठेकेदार म्हणून १९९७ मध्ये दाखल झालेल्या दिवशी वयाची अर्हताधारण करीत असल्याचा त्याचा सेवेत समावेश करण्यात यावा, अशी उपसूचना करण्यात आली आहे.

… असा आहे या प्रकरणाचा न्यायालयीन तिढा!
मे. औद्योगिक न्यायालयाने यु. एल. पी.०५/२००० मध्ये दिलेल्या मनाई आदेशाविरुद्ध महापालिकेने सदरचा विषय मे. औद्योगिक न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नाही. या मुद्याबाबत पुन्हा औद्योगिक न्यायालयात हरकत दाखल केली होती. तथापि, मे. औद्योगिक न्यायालयाने सदरची हरकत नामंजूर केली आहे. सदर निर्णयाच्या विरोधात महापालिकेने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र. ४९३१/०३ दाखल केली आहे. सदरची याचिका अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. त्यामुळे याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेणे आवश्यक आहे. तसेच, घंटागाडी ठेकेदारांनी महापालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल केलेली स्पेशिअल लिव्ह टू अपील मागे घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मे. औद्योगिक न्यायालय, पणे यांच्याकडे घंटागाडी ठेकेदारांनी मनपा विरुद्ध दाखल केलेली याचिका तात्काळ निकाली काढणेबाबत विनंती करावी व त्यानिकालाप्रमाणे कार्यवाही करावी, अशी सूचना भाजपा नगरसदस्यांनी सर्वसाधारण सभेपुढे ठेवली त्याला मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सकारात्मक निर्णय घेवून अंमलबजावणी केल्यास संबंधित कामगारांना न्याय मिळणार आहे.

Read more...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – अजित पवार

सजग वेब टीम, पुणे

पुणे, (दि.२८) | कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटोक्लस्टर, चिंचवड येथील कोविड-19 रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे यांच्यासह आजी माजी महापौर, नगरसेवक आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने स्वतः खर्च करुन कोविड रुग्णालयाची उभारणी केल्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या नगरीत विविध जाती, धर्माचे नागरिक राहतात. लोकसंख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या काळात नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचारांती जादा देयक आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरीता शहरासह ग्रामीण भागात पथके तयार करुन देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. कोरोना विरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्यामदतीने भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याचादृष्टिने संशोधन सुरु आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवानिमित नागरिकांना शुभेच्छा दिल्या. नागरिकांनी कोठेही गर्दी न करता, सामाजिक अंतर पाळत, नियमित मास्क वापरुन या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या संकटकाळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसेच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगले काम करीत आहे. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोना विरुध्दची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे कोवीड-19 रुग्णालय उभारल्याबद्दल समाधानी आहे. कोरोना चाचण्यांचे मोठ्या प्रमाणात वाढवून चाचणीमध्ये लक्षणे नसलेल्या नागरिकांना गृह किंवा संस्थात्मक विलिनीकरण केले पाहिजे. यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण आणता येईल. नागरिकांच्या मदतीने एकत्रित लढाई लढूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्की यश येईल.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यावेळेपासून आरोग्य यंत्रणा चांगले काम करीत आहे. महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या सोई-सुविधांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव ढाके यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.

Read more...

बिर्ला हॉस्पिटल कर्मचारी संप अखेर मागे; आमदार महेश लांडगे यांनी ‘जोडले हात’

बिर्ला हॉस्पिटल कर्मचारी संप अखेर मागे; आमदार महेश लांडगे यांनी ‘जोडले हात’

– प्रशासन- कर्मचाऱ्यांमध्ये यशस्वी समझोता

– रुग्णांना दिलासा; आरोग्य सुविधा पूर्ववत सुरू

सजग वेब टीम, पिंपरी

पिंपरी | आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अक्षरशः हात जोडले. ‘मी तुमच्यात देव पाहतो. ही वेळ आपसात भांडण्याची नाही, तर कोरोनाविरोधात लढण्याची आहे, आवाहन कर्मचाऱ्यांना केले. अखेर लांडगे यांच्या मध्यस्थीला यश मिळाले आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेतील महत्वाचा घटक असलेल्या रुग्णालयाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण येऊ लागला. रुग्णांची हेळसांड होऊ नये. याकरिता भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.

दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य विभागाचे डॉ. पवन साळवी यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. कर्मचारी प्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासन अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी, आमदार लांडगे यांनी रुग्णालय आवारात संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांशी संवाद साधला.

आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये गेले 3 दिवस चालू असलेले हॉस्पिटल प्रशासन आणि वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टरर्स, नर्स) यांच्यामध्ये असलेले आंदोलन मागे घेऊन वैद्यकीय सेवा सुरु करण्यास सुरुवात केली.

आमदार लांडगे म्हणाले की, ‘मी तुमच्यामध्ये देव पाहतो…आताची वेळ आपापसात भांडण्याची नाही, तर कोरोनाशी लढा देण्याची आहे. कर्मचाऱ्यांनी लोकांचा आणि रुग्णांचा विचार करावा.

मी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा…
आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी बांधवांच्या व्यथा मला माहीत आहेत. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण, ही वेळ भांडण्याची नाही. तुम्ही शहरातील नागरिकांची सेवा करीत आहेत. अनेकांचे प्राण तुम्ही वाचवले आहेत. पण, आज कोरोनाशी लढण्याची वेळ असून आंदोलनाची नाही. कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या असतील त्या प्रशासनाकडे मांडून आपणास न्याय द्यायचा मी प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी दिले. त्याला कर्मचारी आणि प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला.

Read more...

डॉ.आंबेडकर यांच्या मूळगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपाची मदत

डॉ. आंबेडकर यांच्या मूळगावातील शाळेला पिंपरी-चिंचवड भाजपाची मदत

– विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त सामाजिक उपक्रम

– भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

– आंबडवेतील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला ‘एक हात मदतीचा’

पिंपरी । शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश जगाला देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळगावी म्हणजे आंबडवे या ठिकाणी असलेली शाळा निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाली. दापोलीतील ग्रामीण भागात असलेल्या या शाळेची डागडूजी करण्यासाठी आता भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या साथीने पिंपरी-चिंचवड भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक हात मदती’चा उपक्रमांतर्गत आमदार महेश लांडगे यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादाळत नुकसान झालेल्या कोकणातील विविध गावांमध्ये मतदकार्य करण्याचा निर्धार केला आहे. बुधवारी सकाळी ही मदत शाळेला पोहोच झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे आदी उपस्थित होते.
यापूर्वी पिंपरी-चिंचवडकरांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त नागरिकांसाठी लक्षवेधी मदतकार्य केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील जालगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. याठिकाणी सांस्कृतिक भवन, जिमखाना, महिला वसतिगृह आहे. मंडणगडपासून सुमारे १७ किमी अंतरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे आहे.

आंबडवे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर व असोंड येथील आश्रमशाळा व वसतिगृह चालवले जाते. अत्यंत ग्रामीण भागात संस्थेचे कार्य सुरू आहे. भटक्या विमुक्त समाजातील मुलांना, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील मुलांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत. या हेतुने संस्था कार्यरत आहे. गेल्या २६ वर्षांपासून संस्थेच्या ज्ञानार्जनाचे कार्य अखंडपणे सुरू आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे संस्थेचे मोठे नुकसान…
आंबडवे येथील आपल्या शाळेच्या इमारतीवरील व सांस्कृतिक भवनावरील एकही पत्रा व शेड शिल्लक राहिलेली नाही . तशीच परिस्थिती मंडणगड कॉलेज व बाकी शाळांची झालेली आहे . कॉलेज इमारतीवरील तसेच लेडीज हॉस्टेल व सांस्कृतिक भवनावरील सुमारे 1100 पत्र्यांचे नुकसान झाले आहे . किमान 50 ते 60 लाखांचे नुकसान आपल्या सर्व प्रकल्पाचे झाले आहे. गेल्या महिनाभरात पत्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सांस्कृतिक भवन आणि महिला वसतिगृहाचे काम मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मंडणगडच्या युनिटचे मोठे नुकसान झाले. संस्थेच्या सर्वच पाच युनिटमधील वीज पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम इदाते यांनी दिली.

राज्य शासन पुरस्कारप्राप्त शाळा पण संकटात मदत शून्य…

कर्मवीर दादासाहेब इदाते यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या आपल्या संस्थेने गेली 26 वर्ष शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. भाजपाचे माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. कर्मवीर दादांनी सुरू केलेल्या या सर्व संस्था अतिशय दुर्गम भागात कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच आर्थिक विषयामध्ये संस्थेने कधीही पैसा कमविण्याचा अथवा शिक्षणाचा धंदा करण्याचा प्रयत्न केला नाही. संस्था 80 G मान्यताप्राप्त असून आपल्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा मनाचा शाहू- फुले-आंबेडकर हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. परंतु, निसर्ग चक्रीवादळ होवून एक महिना झाला. पण, राज्य सरकार अथवा जिल्हा प्रशासनाकडून कसलीही मदत संस्थेला मिळालेली नाही, अशी खंतही कार्याध्यक्ष इदाते यांनी व्यक्त केली.

स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे साकारले होते सिनिअर कॉलेज…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संस्था ग्रामीण भागात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगला शिक्षणाचा संदेश दिला. पण, त्यांच्या जन्मगावी चौथीपर्यंतसुद्धा शाळा नव्हती. ज्या भागात शिक्षणाचा लवलेश नव्हता. अशा भागातील मुलांसाठी संस्थेने शाळा सुरू केल्या आहेत. युती सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री स्व. गोपिनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांमुळेच मंडणगड येथे सिनिअर कॉलेज सुरू झाले. कारण, मंडणगड तालुका असला तरी, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला शिक्षा करावयाची असेल, तर त्याची बदली आजही मंडणगड येथे केली जाते. असोंड येथे भटके विमुक्तांसाठी आश्रमशाळा आणि ओबीसी मुलांसाठी वसतिगृह आहे. सातवीनंतर पुढे काय? म्हणून संस्थेच्या पुढाकाराने माध्यमिक वसतिगृह विनाअनुदानित तत्त्वावर सुरू केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या कोरोनामुळे शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा बंद आहेत. पण, शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व डागडूजी करण्याची चिंता संस्था चालकांना आहे.

माजी समाज कल्याण मंत्री भाई गिरकर यांचा दानशूरपणा…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाला माजी समाज कल्याण मंत्री विजय तथा भाई गिरकर यांनी कायम मदत केली आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर गिरकर यांनी चौथ्या दिवशी शाळेला भेट दिली. त्यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करुन गिरकर यांनी संस्थेला १ लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला होता. तसेच, गिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या समता परिषदेकडूनही १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेला देण्यात आला आहे. संस्थेच्या वाटचालीत भाई गिरकर यांचे मोठे योगदान आहे, असेही कार्याध्यक्ष इदाते यांनी म्हटले आहे.

Read more...
Open chat