नारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन

नारायणगाव येथे राजुरच्या सुप्रसिद्ध पन्हाळे पेढा सेंटरचे उद्घाटन

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | अकोले तालुक्यातील राजुर येथील ८५ वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध पन्हाळे पेढेवाले यांच्या नारायणगाव शाखेचा शुभारंभ अमित बेनके, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उद्योजक विनायक कर्पे, पन्हाळे पेढ्याचे प्रमुख अभिजित पन्हाळे यांच्या हस्ते संपन्न झाला. नारायणगाव येथे सुदिप व अक्षय सुनिल कसाबे यांनी या व्यावसायाची शाखा सुरु केली आहे.

या उद्घाटन प्रसंगी संतोष दांगट, अनिताताई कसाबे, रोहिदास केदारी, गणेश वाजगे, जयेश कोकणे, अतुल आहेर, संजय बढे, राजेश कोल्हे, भावेश डोंगरे, विकास कोल्हे, ईश्वर पाटे, अॅड.कुलदिप नलावडे, प्रा.अशफाक पटेल, अक्षय कसाबे, विविध उद्योजक, ग्रामपंचायत सदस्य यांसह मित्र परिवार उपस्थित होते.

नारायणगाव व वारुळवाडी परिसरातील ग्राहकांसाठी पेढ्याची घरपोच डिलिव्हरी दिली जाणार असुन ग्राहकांनी आवर्जुन या सेवेचा लाभ घ्यावा तसेच एकदा नारायणगाव बसस्थानका समोरील असणार्‍या पेढा सेंटरला भेट द्यावी व पेढ्याची गोडी चाखावी असे आवाहनही सुदिप कसाबे यांनी केले आहे.

Read more...
Open chat