नारायणगाव वारुळवाडी मध्ये पुन्हा लॉकडाऊन ; गणपती विसर्जन पाचव्या दिवशी करण्याचे आवाहन

नारायणगाव वारुळवाडी मध्ये पुन्हा लॉकडाऊन ; गणपती विसर्जन पाचव्या दिवशी करण्याचे आवाहन

नारायणगाव | सध्या नारायणगाव, वारूळवाडी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सध्या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रोगाचे रुग्ण वाढत आहेत. हि परिस्थिती रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी रोखण्यासाठी दि. २८/०८/२०२० पासून नारायणगाव व वारूळवाडी गावांमध्ये कटेन्मेंट झोन जाहीर करून लॉकडाऊन करण्याबाबतची कारवाई सुरू झालेली आहे. त्यासंबंधीचे आदेश तहसीलदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली आहे.

नारायणगांव व वारूळवाडी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असतो. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांना दिनांक २७/०८/२०२० रोजी आपण अध्यक्ष, सभासद तसेच आपले मंडळांचे कार्यकर्ते यांनी आपापसात बैठक घेऊन सदर दिवशीच विसर्जन करावे असे आवाहन ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच दिनांक २८/०८/२०२० रोजी पासून लॉकडाऊन चालू होत असल्या कारणाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बाहेर पडून विसर्जन करता येणे शक्य होणार नाही. तसेच लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडल्यास अशा नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तरी सर्व सार्वजनिक मंडळ तसेच इच्छेनुसार घरगुती गणपती यांनी शक्यतो दिनांक २७/०८/२०२० पर्यंत विसर्जन करावे असे आव्हान पोलीस प्रशासनाने केले आहे.

Read more...
Open chat