लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख

लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – अमित देशमुख

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई (दि.२३) | आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

आज मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्यचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद चे अध्यक्ष आविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजी राजे जाधव,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, शरद कला प्रतिष्ठान चे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,अभिनेते सुशांत शेलारआदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील कलाकरांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाटय सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी  शासन सकारात्मक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोविड-19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंत यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी तमाशा सम्राज्ञी “विठाबाई नारायणगावकर” यांच्या नावाने कल्याणकारी आर्थिक विकास महामंडळ करावे, कलावंतांना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

Read more...

कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती

कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांची ११३वी जयंती

त्यानिमित्त गिरणी कामगारांचे नेते श्री काशीनाथ माटल ह्यांनी वाहिलेली भावपूर्ण आदरांजली

भारतीय कामगार चळवळीतीचे प्रवर्तक आणि गांधीवादी कामगार चळवळीचे अग्रगण्य आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११३ वी जयंती येत्या २१ऑगस्ट रोजी संपन्न झाली. लॉकडाऊनमुळे हि जयंती उत्सवाच्या रुपात संपन्न होणे अशक्य असताना संघटनेच्या वतीने गेल्या शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी छोटेखानी समारंभात कामगार चळवळीत नवा आदर्श निर्माण करणाऱ्या भूतकाळाला उजाळा दिला.
संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गं.द.आंबेकर यांच्या नावे विविध सामाजिक,औद्योगिक,शैक्षणिक , सांस्कृतिक,क्रीडा,सहकारी उपक्रम राबवून नव्यापिढीपुढे त्यांचे कार्य झळाळत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.दरवर्षी गिरणी कामगारा़ंच्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्य देऊन गौरविण्यात येते.गेले तीस-पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.गिरणी कामगार विद्यार्थ्याना प्रिय ठरलेल्या,अशा या उपक्रमाला लक्षणीय प्रतिसाद लाभला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र राज्यस्तरीय औद्योगिक गं.द.आंबेकर जीवन व श्रम गौरव पुरस्काराने संबंध महाराष्ट्रात इतिहास संपादन केला आहे.ज्येष्ठ अभिनेते विजय कदम,कॉ.ए.डी.गोलंदाज,गोदी कामगार नेते डॉ.शांति पटेल,हमाल कामगार नेते डॉ.बाबा आढाव, सरकारी कर्मचारी नेते कॉ.र.ग.कर्णिक, विडी कामार नेते कॉ.आडाम मास्तर ,इंटक रेल्वे नेते राजेंद्र प्रसाद भटनागर ,कामगार नेते कॉ.विश्वास उटगी(२०२०-पुरस्कार वितरण व्हायचा आहे.) या सारख्या कामगार चळवळीत निष्ठा आणि समर्पित भावनेने संबंध आयुष्य व्यतीत करणाऱ्या कामगार नेत्यांना आंबेकरजींच्या नावे जीवन गौरव तर अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्य महानुभावांना श्रमगौरव पुरस्काराने सन्मानित करुन संघटनेने कामगार चळवळीत नवा आयाम उभा कला आहे.

उच्च शिक्षित,सधन कुटुंबात जन्मलेल्या आंबेकर यांनी होमिओपॅथीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेले. राष्ट्रपिता महात्मागांधीं आणि पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार त्यांनी हिदुस्थान मजदूर सेवक संघाने चालविलेल्या अहमदाबाद येथील संस्थेत कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण घेतले.पुढे आंबेकर यांनी सन १९३० च्या सुमारास गिरणी कामगार चळवळीत प्रवेश केला.ते दुचाकी वरुन होमिओपॅथी औषधाद्वारे कामगार वस्त्यांमध्ये कामगार सेवा करु लागले.त्या काळात १९५७ मध्ये मुंबईत हिवतापाची साथ जिवघेणी ठरलेली.आंबेकरकरजींनी कामगारांची सेवा केली. केवळ दुचाकी वरुन कामगारांच्या जखमा बांधीत गिरणी कामगार संघटना बांधणारे गं.द.आंबेकर हे संपूर्ण जगामधील दुर्मिळ कामगार नेते होत.त्यानी त्या वेळी सुरू केलेला होमिओपॅथी दवाखाना आजही कार्यालयात सुरू आहे.१९३० मध्ये स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी भाग घेतला.त्यांना कारावासही झालेला.

त्या काळात गिरणी कामगारांना बेमुदत संपा शिवाय काहीच मिळत नाही, हा समाज साम्यवादी कामगार चळवळीने पूढे आणलेला.पण आंबेकर यांनी प्रथम वाटाघाटी, न्यायालयिन मार्ग आणि शेवटी संपाचा मार्ग अनुसरण्याचा विचार पुढे आणला.उठसूट संपकरुन संपाचे तिक्ष्ण हत्यार बोथट होताकामानये यावर त्यांचा अढळ विश्वास होता आणि तो त्यांनी प्रँक्टीकली खरा करून दाखवला.महागाई निर्देशांकाशी निगडित पगारवाढ,भविष्य निर्वाह निधी,आजरपणाची रजा,ग्रँच्युईटी आदी बेनिफिट कामगारांना मिळवून देऊन त्यांनी त्यांचे जीवनमान उंचालले.गिरणी कामगारांना चुनाभट्टी,परेल आंबेकर नगर,ठाणे येथे मालकी हक्काची घरे उभे करून देणारे त्या काळापर्यंत तरी आंबेकर हे पहिलेच कामगार नेते होत. आंबेकर हे न्यायालयात स्वतः कामगारांची अभ्यासपूर्ण बाजू मांडत.त्यांचे एक प्रतिस्पर्धी कामगार नेते कॉ.एस.ए.डांगे म्हणत,न्यायालयात फक्त आंबेकररांनी लढावे,ते खरे होते.आंबेकर यांनी अविवाहित राहून शेवटच्या श्वासा पर्यंत गिरणी कामगारांसाठी चंदना प्रमाणे देह झिजविला. त्यांनी निस्वार्थी, ध्येयवादी आणि समर्पित भावनेने संघटना उभी केली.त्यांची संघटना ७० वर्षापेक्षा अधिककाळ ताठ मानेने उभी आहे आणि त्यांचे नावही १०० वर्षे टिकून आहे,याचे कारण त्यांच्या कार्याला विधायक चळवळीचा वारसा आहे.संघाचे नेतृत्व आणि अन्य पदाधिकारी तो वारसा पुढे नेण्याचे काम करीत आहेत.खरेतर आजच्या कामगार चळवळी पुढील तो आदर्श ठरावा.

– काशिनाथ माटल

Read more...

राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना- अजित पवार

राज्यातील मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘ग्रामोत्थान’ योजना- अजित पवार

२५ हजारांहून अधिकची लोकसंख्या असणाऱ्या गावांना होणार लाभ

निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणार; मोठ्या गावांच्या विकासाला मिळणार गती

मुंबई (दि.२५)| राज्यातील २५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावात केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नियोजन आणि ग्रामविकास विभागाला दिले.

दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील जवळपास ३०० मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात ‘राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार दिलीपराव बनकर, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा उपस्थित होते.

राज्यात २५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची संख्या साधारपणे ३०० च्या आसपास आहे. या गावात केवळ घरपट्टी कर संकलनाव्दारे विकास करताना निधीच्या कमतरतेमुळे अनेक मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक वेळा मागणी होत असते. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी शहरी भागाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील मोठ्या गावांसाठी ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

ही योजना नियोजन विभाग आणि ग्रामविकास विभागाव्दारे तयार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे.

या ‘ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, रस्तेदुरुस्ती, बाग बगीचे विकास यासारखी नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. मोठ्या गावांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे राज्यातील मोठ्या गावांच्या विकासाला गती मिळणार आहे.

Read more...
Open chat