Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2758

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/operations.class.php on line 2762

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/plugins/revslider/includes/output.class.php on line 3706

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 751

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 795

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 831

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 839

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 893

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 917

Warning: "continue" targeting switch is equivalent to "break". Did you mean to use "continue 2"? in /home/sajagtimes/public_html/wp-content/themes/porto/inc/admin/ReduxCore/inc/extensions/customizer/extension_customizer.php on line 955
Mohit Shakale | Sajag Times

जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा

जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे लागणार मार्गी, सिंचन भवन बैठकीत झाली चर्चा

सजग वेब टीम, पुणे

पुणे (दि.१७) | सिंचन भवन पुणे येथे सोमवार (दि.१७) जुन्नर तालुक्यातील सिंचनाच्या प्रकल्पांसंबंधी आणि विविध प्रश्नांसंबंधी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जुन्नर चे आमदार अतुल बेनके, जि.प.सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, अशोक घोडके हे लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी पाईपलाईन प्रकल्प, बुडीत बंधारे, के टी बंधारे, वितरीका साफसफाई व दुरूस्ती, कालवा पोटचाऱ्या पूर्ण करणे, प्रकल्पबाधितांचे प्रश्न या संबंधित अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

यामध्ये खालील विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

– पिंपळगाव जोगा कालव्याची दुरूस्ती त्याचबरोबर शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पुल बांधणे, कालव्याच्या वितरीका व लघु वितरीका, नवीन आऊट लेट काढणे

– बेल्हे येथील प्रस्तावित एस्केप काम CR गेट चे काम त्वरीत सुरु करण्याबाबत कार्यकारी संचालक विलास राजपुत यांनी आजच्या बैठकीत मान्यता दिली.

– नवीन पाणी परवान्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन पूर्व भागातील शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

– चिल्हेवाडी पाईप लाईनच्या आराखडा व लाभक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होण्यासाठी सुचविण्यात आलेले सकारात्मक बदल मान्य केलेले आहेत. याबाबत काही तांत्रिकदृष्ट्या अडचणींवर मार्ग काढण्याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली.

– पिंपळगाव जोगा कालवा व चिल्हेवाडी पाईप लाईन यांचे प्रलंबित भूसंपादनचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करण्याबाबतचा कृती आराखडा बैठकीत तयार करण्यात आला.

– कुकडी डावा कालव्याच्या गळती थांबविणे, दुरुस्ती करणे, झाडे झुडपे काढणे, दळणवळणाला सोईकरता काही ठिकाणी पुल बांधणे CR गेट स्थापन करणे या सर्व बाबींना मान्यता देण्यात आल्या.

– लोकसहभागातून मनरेगा योजनेची जोड घेऊन संपूर्ण कालव्याच्या दुतर्फा सुशोभिकरण करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे ठरले.

– माणिकडोह धरणातील ८ पैकी ३ बुडीत बंधाऱ्यांच्याबाबत प्राधान्याने तांत्रिक मान्यता घेऊन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये चावंड, जळवंडी व अंजनावळे या बंधाऱ्यांचे प्रस्ताव प्राधान्याने घेण्यात येणार आहेत.

– रामजेवाडीच्या आऊट लेट च्या कामासाठी व निरगुडे, बेलसर कोल्हापूर पद्धती बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आमदार अतुल बेनके यांनी रु ६० लक्ष रु. निधी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.

– ओतूर येथील वाघदरा लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्ती चा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येणार आहे

आजच्या बैठकीमुळे तालुक्यातील सिंचनाच्या कामांना गती मिळणार असून,
जुन्नर तालुक्यातील सिंचनाची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू असे आमदार अतुल बेनके यांनी या बैठकीबाबत बोलताना सांगितले आहे.

या बैठकीला कार्यकारी संचालक विलास राजपूत, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, संभाजी माने , कुकडी कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, सुचिता डुंबरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील प्रदीप पिंगट, सुरेश तिकोणे आदी मान्यवरही या बैठकिला उपस्थित होते.

Read more...
Open chat