जुन्नर तालुक्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांना सुरुवात

जुन्नर तालुक्यात महात्मा फुले ब्रिगेडच्या योजनांना सुरुवात

सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव

नारायणगांव (दि.५)| जुन्नर तालुका कार्यकारणीची बैठक नारायणगांव येथे पार पडली त्यात महात्मा फुले ब्रीगेडच्या योजनांना सुरुवात झाली आहे. महात्मा फुले ब्रिगेडच्या जुन्नर तालुका कार्यकारिणी बैठक जिल्हा अध्यक्ष मा. दत्ताभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वा खाली नारायणगाव बालाजी ट्रॅक्टर शेजारी हॉल येथे संपन्न झाली.

या बैठकीत पदाधिकारी परिचय तालुका सचिव रणजित कानडे यांनी केला तर नारायणगाव शहर अध्यक्ष रामदास अभंग यांनी सर्व पदाधिकारी यांचे स्वागत व मार्गदर्शन केले व तालुका संपर्क प्रमुख संतोष भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.

जिल्हा अध्यक्ष मा.दत्ताभाऊ शिंदे यांनी महात्मा फुले ब्रिगेड तर्फे बचत गटाविषयी व राबविल्या जाणाऱ्या योजनानंची माहिती पुढील प्रमाणे, श्री संत सावतामाळी पेन्शन योजना (माळी समाजाचे वयोवृद्ध वय 65 वर्ष पुढील) सावित्रीबाई फुले शिक्षक शिष्यवृत्ती योजना (माळी समाजातील विद्यार्थी यांना इयत्ता पहिली ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती) महात्मा फुले स्वावलंबी योजनेच्या माध्यमातून शेतीव्यवसाय व उद्योगासाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल., आपल्या महात्मा फुले योजनांच्या माध्यमातून जुन्नर तालुका माळी समाजाला आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करायचे असून जास्तीत जास्त समाज बांधवांना आपल्या योजनांची माहिती द्या प्रदेशाध्यक्ष मा.दत्तात्रय माळी यांच्या आदेशानुसार आज पासून आपण तालुक्यात योजनांची सुरुवात करत आहोत जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित गरीब लोकांसाठी खाजगी दवाखाने यामध्ये महात्मा फुले जण आरोग्य योजना राबविण्यासाठी प्रयत्न करूया.

यावेळी तालुकाध्यक्ष मा.वसंत काफरे, तालुका उपाध्यक्ष किरण वाघोले , तालुका संपर्कप्रमुख संतोष भुजबळ , तालुका सचिव रणजित कानडे नारायणगाव शहराध्यक्ष रामदास अभंग ,जुन्नर शहराध्यक्ष संजय डोके ,जुन्नर शहर उपाध्यक्ष नितीन शेरकर, जुन्नर शहर कार्याध्यक्ष सुमंत मेहेर ,बेल्हे शहराध्यक्ष शंकर शिंदे, बोरी-माळवाडी उपाध्यक्ष रघुनाथ घोलप,आगर शहराध्यक्ष रमेश काफरे ,उपाध्यक्ष सागर भास्कर इतर मान्यवर उपस्थित होते.

Read more...
Open chat