नीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
नीट’ परीक्षेत कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश
सजग टाईम्स न्यूज, नारायणगाव
नारायणगाव | वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची नेहल निलेश भळगट या विद्यार्थिनीने ७२० पैकी ६७५ गुण मिळवून देशात ९३५ वा क्रमांक पटकावून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. ग्रामीण भागात नीट चे शिक्षण घेऊन एवढे मोठे यश मिळविणारी पहिली मुलगी ठरली आहे.
या परीक्षेसाठी कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल मधून ३५ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे १ व ५०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे २ विदयार्थी आहेत. यामध्ये तन्वी रामदास काळे हिला ५५५ तर वैदेही मनोहर कवडे हिला ५१४ गुण आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला होता या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. जुन्नर तालुक्यात एका ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेमध्ये शिक्षण घेऊनही आपण वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट’ परीक्षा मध्ये चांगले मार्क पाडू शकतो. त्यासाठी मोठा खर्च करून पुण्याला किंवा इतरत्र जाण्याची गरज नाही. शिकविण्यासाठी चांगले शिक्षक व मन लावून नेटाने अभ्यास केला तर नीट परीक्षेमध्ये आपण ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही चांगले मार्क पाडू शकतो हे या मुलांनी मिळवलेल्या गुणांवरून सिद्ध झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शाळेचे सचिव विष्णू थोरवे, शिक्षक, कर्मचारी, पालक यांनी या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपल्या मुलांना चांगले गुण मिळावे त्यांना वैद्यकीय प्रवेश मिळावा यासाठी जुन्नर तालुक्यातून अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना मोठा खर्च करून पुणे या ठिकाणी पाठवत आहेत मात्र ग्रामीण भागातही चांगले शिक्षक मिळाले तर मुले अभ्यास करून चांगले गुण संपादित करू शकतात. ग्रामीण भागातील वातावरण हे अभ्यासासाठी पोषक आहे त्यामुळे पालकांनी यापुढील काळात याचा विचार करणे आवश्यक आहे.