राम मंदिरासाठी अयोध्येत पाठविण्यात आली होती चांदीची वीट

राम मंदिरासाठी अयोध्येत पाठविण्यात आली होती चांदीची वीट

कुणी पाठवली होती ती चांदीची वीट? 

सजग संपादकीय, स्वप्नील ढवळे 

सध्या देशभर श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा होताना दिसत आहे. राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. असाच एक शिवसेनेचा नेता होऊन गेला ज्याने सन १९८७ साली महाराष्ट्रातून पहिली चांदीची वीट राम मंदिरासाठी अयोध्येत पाठवली होती. एका शहरातून पहिली चांदीची वीट अयोध्या येथे पाठविण्यात आली होती. हे शहर मुंबई नाही तर ते ठाणे शहर होते. शिवसैनिकांच्या धर्मवीरांचे ठाणे.

एके काळचे ठाण्याचे शिवसेनाप्रमुख असणारे आनंद दिघे यांनी ती पहिली चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना कोणतीही जाहिरातबाजी न करता दिघे यांनी ती वीट बाबरी मशिद पाडण्याच्या ५ वर्ष आधी पाठवली होती. दिघे यांनी त्या जागी मंदिर व्हावे म्हणून पहिली चांदीची वीट बनवून घेतली होती. त्या वीटेला बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नवरात्रौत्सवाच्या पूजेत ठेवली होती. अनेक शिवसैनिकांनी त्या वेळी बाळासाहेबांच्या आदेशानुसार त्या उत्सवासाठी दानधर्म केले होते. रोज त्या चांदीच्या वीटेचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागत होत्या, त्यावेळी संपूर्ण ठाणे हे राममय झाले होते. आज इतक्या वर्षांनी दिघे यांनी त्या काळी पाहिलेल्या स्वप्नातील राम मंदीराचे भूमिपूजन आज पूर्ण होत आहे. राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने आनंद दिघे यांची आठवण अनेक शिवसैनिक काढत आहेत.

Read more...
Open chat