अनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा
अनिलदादा खैरे यांचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा
नारायणगाव येथे वृक्षारोपण व ग्रामपंचायतला दिले मास्क
उद्योजक विशाल अडसरे यांनी मित्राच्या वाढदिवसानिमित्त केले मास्कचे वाटप
नारायणगाव | नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबु पाटे यांचे विश्वासू सहकारी अनिल खैरे यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
यानिमित्तानं नारायणगाव खोडद रोड येथे जवळपास १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोरोना काळात कार्यरत असणार्या सेवकांना २०० मास्कचे सरपंच योगेश पाटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून सोडियम हायपोक्लोराईड फवारणी, अर्सेनिक गोळ्यांचे वाटप यांसह ग्रामपंचायत व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यामातुन राबविण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमात अनिल खैरे हे सक्रिय पुढाकार घेत अाहेत. सध्या कोरोना पार्श्वभुमीवर सामाजिक जबाबदारी अोळखुन त्यांनी वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराने हार, तुरे, फ्लेक्स यावर अनावश्यक खर्च करु नये असे आवाहनही मित्र परिवाराला केले होते. त्यानुसार मित्र परिवाराने खैरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक उपक्रम राबवले यानिमित्तानं त्यांचे वर्गमित्र लक्ष्मी ऑटो स्पेअर्स चे मालक विशाल अडसरे यांनी ग्रामपंचायतला २०० मास्क भेट दिले.
यावेळी विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, कुसुमताई शिरसाठ, राजेश बाप्ते, भाऊ मुळे, धर्मेंद्र गुंजाळ अजित वाजगे, ईश्वर पाटे, अजय पाटे, जयेश कोकणे, जालिंदर खैरे, नंदू अडसरे यांसह अनिल खैरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.