७५ वर्षांच्या आजीबाईने केला हरिश्चंद्र गड एका दिवसात सर. महाराष्ट्रातील तीन नंबरचे शिखर केले सर. – पिंपळवंडीची हिरकणी

७५ वर्षांच्या आजीबाईने केला हरिश्चंद्र गड एका दिवसात सर. महाराष्ट्रातील तीन नंबरचे शिखर केले सर.
– पिंपळवंडीची हिरकणी
नातवाने केला आजीचा हट्ट पुर्ण.

सजग वेब टिम

पिंपळवंडी | आपला नातु अनेक वेळा गड, किल्ले फिरायला जातो.आपणही हरिश्चंद्र गड सर केला पाहिजे अशी इच्छा पिंपळवंडी(ता.जुन्नर) येथील हिराबाई दत्तात्रय शिंदे या आजीने आपला नातु निखिल प्रमोद बारभाई याच्या कडे बोलुन दाखवली.हरिश्चंद्र गड हा प्रत्येक गड किल्ले फिरणाऱ्या भटक्यांची एक पंढरीच आहे.महाराष्ट्र तसेच देशभरातून पर्यटक या गडावर येत असतात. शंकराची भक्त व पिंपळेश्वर मंदिराच्या पुजारी हिराबाई शिंदे व त्यांचा नातु निखिल बारभाई राहणार पिंपळवंडी(ता.जुन्नर)हे दोघे शनिवारी(ता.१९) हरिश्चंद्र गड सर करण्यासाठी निघाले व एकाच दिवशी कोकणकडा,मंदिर व महाराष्ट्रातील उंचीवरचे तीसऱ्या नंबरचे तारामती शिखर ७५ वर्षांच्या आजीने सर केले व तरुणांसाठी तसेच सर्व वयोगटातील व्यक्तीं समोर या आजीबाईने एक आदर्श ठेवला.
शेवटच्या टप्यात घळईच्या मार्गे गड उतरत असताना अंधार झाल्यामुळे मार्ग सापडत नसल्यामुळे निखिल यांनी पिंपळवंडी येथील आपल्या मित्रांना फोन लावले.त्यानंतर गडाच्या पायथ्याला असलेले चिंतामण कवठे हे त्यांच्या दोन सहकार्यांना घेऊन त्यांना शोधण्यासाठी गडावर गेले.त्यांच्या पाठोपाठ पिंपळवंडी येथील गिर्यारोहक पराग छल्लारे यांच्या नेतृत्वा खाली बाळा पंडित,राहुल विधाटे डॉ.संदीप रोहकले, संदीप लेंडे,योगेश वामन,राजेश काकडे,राजेश साळुंखे,मयुर पवार,मंगेश गुजर,मयुर निमसे,संकेत शिंदे,सिद्धार्थ कसबे,प्रवीण काळे,योगेश सोमवंशी,सचिन क्षीरसागर,हे तरुण गडावर रात्रीच्या वेळेस गेले.त्यानंतर सर्वांनी मिळुन निखिल बारभाई व त्याची आजी हिराबाई शिंदे यांना शोधले व सुखरूप पायथ्याला आणले.
आजीबाईने तारामती शिखर सर केल्याने तेथील रहिवासी अचंबित झालेले दिसले कारण हरिश्चंद्र गड सर करण्यासाठी खुप तरुण येत असतात परंतु कोणी सहजा तारामती कडे जात नाहीत. सर्वांनी मिळुन आजीबाईंचा सत्कार केला व त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.

Read more...
Open chat