अतुल बेनके यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर रास्ता रोको प्रकरणी गुन्हे दाखल


नारायणगाव | दिनांक १३ जानेवारी २०१९ रोजी नारायणगाव-गुंजाळवाडी रस्त्याचे काम व्हावे म्हणून करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंजाळवाडी रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे .अनेकदा पाठपुरावा करूनही बांधकाम विभागानेही याकडे लक्ष दिले नाही यामुळे वारूळवाडी व गुंजाळवाडी येथील ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी ग्रामीण रुग्णालय वारुळवाडी येथे रास्ता रोको केला. या ठिकाणी काही वेळ वाहतुकीचा खोळंबाही झाला, यादरम्यान रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णांना मात्र वाट मोकळी करून देण्यात आली होती.


याच पार्श्वभूमीवर आज दिनांक १४ जानेवारी २०१९ रोजी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे सदर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अतुल बेनके, सचिन वारुळे, तान्हाजी वारुळे, विपुल फुलसुंदर,राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, वरुण भुजबळ, विनायक नायकोडी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे तालुका उपाध्यक्ष
राहुल गावडे, गुंजाळवाडी चे उपसरपंच श्रीकांत वायकर व इतर ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन चे ए. पी.आय घोडे पाटील व इतर पोलीस कर्मचारी करीत आहेत.

Read more...
Open chat