आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – निवृत्ती महाराज देशमुख

बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)

राजगुरूनगर |आईवडिलांच्या गालावरचे हसू हे मुलांसाठीची सर्वात मोठी श्रीमंती असून आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी  हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत मायबाप याविषयावर बोलत होते यावेळी केले.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, जि.प.सदस्य बाबाजी काळे,   संस्था संचालक   अॅड. मुकुंदराव आवटे, बाळासाहेब सांडभोर, सुशील सिंगवी, डॉ.रोहिणी राक्षे, अश्विनी मोरमारे, अॅड.माणिक पाटोळे, उमेश आगरकर, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टे पाटील, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी
निवृत्ती महाराज देशमुख यांचे स्वागत अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी केले.

निवृत्ती महाराज देशमुख पुढे म्हणाले की, कुटुंब व्यवस्था विचाराने कमजोर झाल्याने समाज विकासापासून वंचित राहत आहे. त्यासाठी सदविचारांना आजही समाजात किंमत आहे. सकारात्मक विचारांनी काम केले तर  आदर्श नागरिक बनण्याची कुवत या सदविचारांमध्ये आहे. पालकांनीही आपल्या घरात मुलांना अभ्यासपूरक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे तरच मुले घडतील. ते पुढे म्हणाले की मोबाईल ही गरज असली तरी त्याचा अतिरेक करू नये. मोबाईलच्या अतिरेकाने माणसामाणसातील संवाद संपत चालला आहे. निद्रानाशासाराखा आजार जडला आहे. शालेय जीवनातील  मुलांचे मोबाईल पालकांनी वेळोवेळी तपासायची गरज व्यक्त केली. समाजात ज्ञानाला किंमत असून ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना आजही नोकऱ्या असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थी हा वर्गात किंवा क्रीडांगनावर असायला हवा. विद्यार्थी सर्वगुणसंपन्न तयार व्हावा यासाठी महाविद्यालय हे उर्जा निर्माण करणारे स्रोत असायला हवे. विद्यार्थ्यांना कष्ट, सदविचार, चांगले मित्र, अखंडाभ्यास या गोष्टी मोठे होण्यासाठी आवश्यक आहेत. अपयशाने खचून जाऊ नका. आपले काम प्रामाणिकपणे करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राजगुरुनगर ही क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंची भूमी असून या क्रांतीच्या भूमीत शिक्षणाची ज्ञानज्योत साहेबरावजी बुट्टेपाटील यांनी लावली. या महाविद्यालयातील विद्यार्थी आदर्श घडला तरचं त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे ते म्हणाले.

मुलांनी आईवडिलांचा संभाळ करावा. प्रेरणादायी चरित्र पाठ करून आचरणात आणावे. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. आणि योग्य शिक्षण व कष्ट करण्याची सवय अंगीकारून वर्तमान आयुष्य चांगले जगण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रचंड  टाळ्यांंच्या गजरात प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.धनंजय बोऱ्हाडे यांनी तर आभार प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील यांनी मानले.

Read more...
Open chat