संभाजी ब्रिगेड पक्षाचे अॅड.मनोज आखरे लोकसभेच्या मैदानात ? सांगितला राजीव सातवांच्या जागेवर दावा !

सजग वेब टीम

हिंगोली – संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे सुञाकडून समजले आहे.अॅड.आखरेंनी त्यांच्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय व हिंगोली काॅंग्रेरसचे विद्यमान खासदार राजीव सातव यांच्या जागेवर दावा सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.अॅड.मनोज आखरे हे सुद्धा हिंगोलीचेच रहिवासी असल्यामुळे त्यांनी काॅंग्रेसकडे सदर जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते.तर या मागे राजीव सावत व अॅड.आखरे यांच्या मधील स्थानिक पातळीवरील मतभेद कारणीभुत असल्याचे बोलले जात आहे.
अॅड.मनोज आखरेंच्या माध्यमातून हिंगोलीची लोकसभेची जागा काॅंग्रेसने संभाजी ब्रिगेडला सोडण्यासाठी सध्या एक शिष्ठमंडळ दिल्ली येथे ठाण मांडून असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळामध्ये संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर,मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव व संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर व गंगाधर बनबरे आदीचा समावेश असल्याचे समजते.सदर शिष्टमंडळाने काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन,त्यांचे कडे सदर जागा संभाजी ब्रिगेडला सोडण्यासंदर्भात जोरदार मागणी केल्याचे व राजीव सातव यांच्या निष्र्कियेतेचा पाढा वाचल्याचे सुञांकडून समजले आहे.काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मागणीला वरिष्ठापर्यंत पोहचवण्याची भुमिका घेऊन,धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकञित लढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची भुमिका मांडली असली तरी अंतिम निर्णय काय झाला.हे अद्याप समजलेले नाही.परंतु,या निमित्ताने अॅड.मनोज आखरे व खासदार राजीव सातव यांच्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघातील जागेवर संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

Read more...

तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड

तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड

सजग वेब टीम

पुणे  | तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. आई, वडील आणि आपले कुटुंब यांचे सक्षमीकरण करावे यातूनच समाज घडतो. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी एका खासगी माध्यम समूहाला  मुलाखत देताना दिला.

पुढे बोलताना म्हणाले दर्जेदार शिक्षण घ्यावे, असे कोर्सेस करा की ज्यातून रोजगार मिळेल. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सारखे कार्यक्रम राबविले पाहिजे. त्यासोबतच ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा असे यावेळी सांगितले.

मला कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर दिली होती

या मुलाखती मध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी अनेक गोष्टींचा उलघडा केला आहे. पुढे बोलताना म्हणाले, भाजपचा मराठा चेहरा म्हणून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी मला कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर दिली होती. २०१२ पासून ते २०१४ पर्यंत अनेकवेळा भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सर्व समाजाचे नेते एकत्रित करीत होते. मराठा समाजाचा चेहरा म्हणून अनेकवेळा त्यांनी भाजपमध्ये येण्याविषयी माझ्यासोबत चर्चा केली. त्यासोबतच कॅबिनेट मंत्री पदाची सुद्धा ऑफर दिली होती, परंतु मला त्या विचारधारेवर विश्वास नाही आणि कधी त्याच्याशी तडजोड केली नसल्याने मंत्री पद नाकारले होते. मला राजकीय संधी होती पण विचारधारा कधीच सोडली नाही.

भाजप सरकार प्रतिगामी

देशभरात भाजपचे सरकार असले तरी मी भाजप हा पक्ष असल्याचे मी मानत नाही. कारण भाजपचे सगळे नेते आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आहेत. त्यामुळे हे सरकार भाजपचे नसून आरएसएस विचारधारेचे सरकार आहे. मुळात भाजप हा पक्षच नाही. भारतातील पक्ष हे विकासावर नाहीतर विचारधारेवर चालतात. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई आहे. सध्या देशात घटना विरोधी सरकार असून घटना विरोधी कायदे करते. घटनेत आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूदच नाही हे सरकार घटना पायाखाली तुडवण्याचं काम करतंय, प्रतिगामी सरकार असून यांनी धोरणे द्वेष पसरवणारे आहेत. गोरक्षकाचा मुद्दा असो किंवा तिहेरी तलाकचा मुद्दा घेऊन मुस्लिमांमध्ये एक वातावरण तयार करून एका विशिष्ट समाजाला बाजूला ठेवायचं, धर्माचे राजकारण करून कायम देश असुरक्षित करायचं, या सर्व गोष्टींमुळे घटनेच्या चौकटीला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पुरोगामी, सामाजिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. हा धोका मूलतत्वाला म्हणजे शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या समतावादी विचाराला धोका झाला आहे.

काँग्रेस सर्व समावेशक पक्ष

देशामध्ये काँग्रेस आणि भाजप दोन मुख्य पक्ष आहेत. त्यासोबत अनेक राजकीय दृष्ट्या स्थानिक अस्मिता निर्माण होऊन राज्यस्तरीय अनेक पक्ष निर्माण झाले असले तरी मोठ्या प्रमाणात पुरोगामी विचारधारेची पक्ष आहेत. मत विभाजन टाळण्यासाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे आहे.

सध्या काँग्रेसची बदलती भूमिका असून तरुणांना आकर्षित करणारे राहुल गांधींचे नेतृत्व आहे. काँग्रेसचे सर्वसमावेशक विचार पुढे आणले असून सोशो पॉलिटिक्स करीत आहे. असा प्रयोग त्यांनी गुजरात मध्ये केला ओबीसी मधून अल्पेश ठाकूर, दलित चेहरा जिग्नेश मेवानी आणि खुल्या प्रवर्गातून हार्दिक पटेल या सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करून सोशो पॉलिटिक्स करून नवा पर्याय निर्माण केला होता. असाच प्रयोग राजस्थान आणि मध्यप्रदेशात केला होता, त्यात काँग्रेसला मोठं यश मिळालंय.

संभाजी ब्रिगेड बहुजनांची संघटना

संभाजी ब्रिगेड हि सामाजिक संघटना असून संघटनेचे ब्राम्हणेत्तर विचार आहेत. सामाजिक दबाव गट करून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे काम करते. संभाजी ब्रिगेड दोन पातळीवर काम करत असून राजकीय पक्ष म्हणून स्थापन झाला आहे. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. मी समाजामध्ये नैसर्गिक गरज होती म्हणून संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद घेतले आहे. संभाजी ब्रिगेड मध्ये दुभंगलेले मतभेत नाहीत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड हा एकाच परिवार आहे. फक्त राजकीय भूमिकेशी माझा संबंध नाही. संभाजी ब्रिगेड पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवीत आहे, मात्र यावेळेस परिस्तिथी वेगळी असून संभाजी ब्रिगेड पक्षाने पुरोगामी आघाडी मध्ये यावे त्यांचे स्वागत होईल.

आमचा यापूर्वी शिवराज्य पक्ष होता पण त्याला यश मिळाले नाही. संभाजी ब्रिगेडला पक्ष करताना ब्राम्हणेत्तर पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष पर्याय होऊ शकतो, असे मला स्वतःला वाटले म्हणून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षाचे चांगले धोरणे आहेत, त्यांनी रोजगार हमी योजना, कुळ कायदा यासारखे अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. या पक्षाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्यामुळे हा पर्याय निवडला.

१६ टक्के आरक्षण एक मृगजळ

गेल्या दोन वर्षांमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून मोर्चे शांततेत पार पडले. त्यानंतर ठोक मोर्चा निघाला होता. त्याला हिंसक वळण लागले होते, त्यात १० हजार कार्यकर्यांवर गुन्हे नोंदले गेले. ३८ कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांची इतर मागासवर्गीय आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. त्या आयोगाने केलेल्या अभ्यासातून सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध झाला. अपेक्षा होती की ओबीसी प्रवर्गात कुणबी म्हणून समावेश होईल. मराठा आणि कुणबी एकच आहेत सिद्ध करण्यासाठी ९१ पुरावे दिले आहेत. मुळात मराठा ही जात नसून महाराष्ट्रातला समूह आहे, कुणबी ही जात आहे.

महाराष्ट्र सरकारने जे १६ टक्के आरक्षण दिले ५० टक्केच्या वर जाणारे आरक्षण असून ते एसईबीसी दिले आहे. हे आरक्षण मुळातच टिकणार नाही. एम.जी.गायकवाड यांच्या आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध केले आहे. केंद्राने नवीन १० टक्के आरक्षण राज्यसभेत आणि लोकसभेत मान्य करून घेतला. राष्ट्रपतींनीही सही केली आहे. अनेक राज्यात लागू करण्यात आला, त्याला सुद्धा आर्थिक निकषाद्वारे मर्यादा घातल्या आहेत. घर, शेती किती, आठ लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या लोकांना मिळणार आहे. ज्यांना इतर मागास वर्गाचा दर्जा दिला त्यांना हे आरक्षण मिळणार नाही.

मराठा समाजाची अशी अवस्था झाली ५० टक्केच्या वर जाणारे १६ टक्के आरक्षण दिले. जे मुळात मिळणारच नाही, ते एक मृगजळ आहे. १० टक्के सवर्ण किंवा आर्थिक निकषावरील आरक्षण तेही मिळणार नाही. कारण इतर मागासवर्गीयांप्रमाणे मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध झाला आहे.

अडीच कोटी पेक्षा जास्त मराठा समाज कमिटी मोर्च्याच्या माध्यमातून मोठ्या अपेक्षेने रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजाची आर्थिक कुचंबना झाली होती, शेती परवडत नाही, शेतकरी आत्महत्या करीत आहेत . मात्र क्रांती मोर्चांमुळे एक आशा निर्माण झाली होती, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणारी आणि घटनात्मक आरक्षण मिळेल. आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळतील. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे १६ टक्के तर नाहीच पण १० टक्के सुद्धा आरक्षण मिळणार नाही.

दलित-मराठा दंगल करण्याचा प्रयत्न अयशस्वी

गेल्यावर्षी कोरेगाव भीमा येथे दलित-मराठा यांच्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. या मागे षडयंत्र कुणाचे असू शकते तर हे सरकार पेशवाईचे सरकार आहे. पेशवाईचा वारसा मानणाऱ्या सरकारच्या काळात जर कोणी पेशवाईच्या पराभवाचा उत्सव साजरा करीत असेल तर हे त्यांना कधीच पटणार नाही. म्हणून हिंदुत्ववादी लोकांना वाईट वाटले म्हणून हे सगळे घडले. त्यासोबतच यामध्ये संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांची नावे का आली ? त्यांची नावे कोणी घेतली ? त्या भागात तीन महिन्यापूर्वी कुणी बैठका घेतल्या ? याबाबतचा पोलिसांचा अहवाल आल्यावरच सत्य बाहेर येईल. राज्यात संभाजी ब्रिगेडमुळे मराठा आणि दलितांमध्ये एकोपा निर्माण झाला आहे.

तर खासदार संभाजी राजेंचे स्वागत करतील

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते भाजपचे खासदार नाहीत. त्यांचीही एक राजकीय महत्वकांक्षी होती त्यांना खासदार व्हायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ती पूर्ण करायला हवी होती, पण ती इच्छा भाजपकडून पूर्ण करण्यात आली.

युवराज संभाजी राजे हे आमच्यासोबत २००७ पासून जोडले गेले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनतर ते आमच्यासोबत शिवशाही यात्रेत महाराष्ट्रभर फिरले. मुंबईत मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व केले. मला वाटते ते पुन्हा शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकर विचारांचे काम करण्याचे ठरवले तर पुरोगामी विचारांचे लोक त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करतील. तसेच ते पुन्हा सामाजिक कार्यात परत येतील असा मला विश्वास आहे.

Read more...
Open chat