शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला – विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला
विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे 

सजग वेब टीम, शिरूर

शिरूर | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील सगल तीन वेळा खासदार होते. पैकी दोन पंचवार्षिकपासून हा भाग त्यांच्या मतदारसंघात जोडण्यात आला आहे. मात्र या भागात अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

केंदूर आणि पाबळसह या भागातील १२ गावांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी नाही तर मतदान नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, शिरुरच्या पश्चिम पट्ट्यात आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळतं, मात्र पाण्याचा प्रश्न पेटल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा मोठा फटका आढळरावांना बसण्याची शक्यता आहे.

Read more...

आमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेना प्रवेश

जुन्नर | मनसेचे एकमेव आमदार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांची उद्या सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पुन्हा शिवसेनेत घरवापसी होत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेना भवन येथे शक्तिप्रदर्शन करत ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३वा वर्धापन दिन पार पडला आणि त्यांनंतर आलेली हि बातमी म्हणजे मनसेला मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनंतर मनसे चा एकमेव आमदारही आता शिवसेनेच्या गळाला लागला आहे.

बरोबर ५ वर्षांपूर्वी २०१४ साली आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत मनसेचे विद्यमान सर्व आमदार पराजित झाले फक्त आ. सोनवणे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

शिवजयंती कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही भूमिपूजन कार्यक्रम पार पडले होते त्यावेळी राज ठाकरे यांचा फोटो फ्लेक्सबोर्ड वर नव्हता त्याचवेळी या प्रवेशाची कुणकुण लागली होती यामुद्द्यावरून सोशल मीडियावर वादही झाला होता.

Read more...

जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी; चर्चा आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची

पुणे : आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा जुन्नर तालुक्यात सुरूआहे. हे वृत्त समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशाताई बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेऊन आमदार सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, तसेच अनेक पदांवर काम करणाऱ्या शिवसैनिकांनी सामूहिकरीत्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. याबाबत वृत्तपत्र व सोशल मीडियावर जुन्नर तालुक्यात शिवसेनेत फूट पडणार, तसेच लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अशा बातम्या आल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी दि. ५ मार्च रोजी मातोश्रीवर भेटण्यासाठी गेले होते.

प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे दबावतंत्र वापरून जि. प. गटनेत्या आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीस गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याने या पदाधिकाऱ्यांना कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिकाºयांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना
प्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून आमदार सोनवणे यांचा प्रवेश झाला तर आशाताई बुचके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयांना मातोश्रीवर बोलाविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

 

जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी
आशाताई बुचके यांनी वैयक्तिक भेट मागितली असता उद्धव ठाकरे यांनी ‘मला तुमच्याशी बोलायचे नाही, पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा’ असे म्हणत भेट देण्यास नकार दिला. तसेच हॉलमध्ये येऊन सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आशाताई बुचके यांना राजीनाम्याच्या दबावतंत्रावर खडे बोल सुनविले. मीडियामार्फत आपण केलेले वक्तव्य पक्षाला अशोभनीय आहे. आपण पक्षापेक्षाही मोठ्या झाल्या आहात. तुम्ही तालुक्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा. त्यानंतर आपणास भेटण्यास टाईम देऊ, असे स्पष्ट केले, बेशिस्तपणा चालणार नाही, अशी तंबीही पदाधिकाऱ्यांना दिली. जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने आशाताई बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आमदार सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशाताई बुचके यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more...

आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध

आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध
– पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव – जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह वारुळवाडी याठिकाणी आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. काल प्रसिद्ध झालेल्या आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत च्या वृत्ताने जुन्नर तालुक्यातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून विविध पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यासंबंधीची मतं आज माध्यमांसमोर व्यक्त केली.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात यावा अशी मुख्य मागणी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष नेतृत्वाकडे करण्यात आली. आम्हांला विश्वासात घेऊन च वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावेत अन्यथा आम्ही सर्व जण आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा देऊ असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला असून याबाबत पक्ष नेतृत्वाने गंभीरपणे विचार करावा. शिवसैनिकांचा विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे असं सांगताना उमेदवारीबाबत दगा फटका झाल्यास कार्यकर्ते म्हणतील ती माझी पुढील दिशा असेल असंही सूचक विधान यावेळी केलं.

जर सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर बुचके या अपक्ष लढणार का? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. जुन्नर तालुका शिवसेनेने पक्ष नेतृत्वाला आता सूचक इशारा दिला असून यावर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेवेळी उपतालुका प्रमुख संतोष खैरे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुका संघटक योगेश पाटे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, संभाजी तांबे, जीवन शिंदे, मंगेश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Read more...

राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)

मंचर | काल निरगुडसर येथे शिवसेना शाखा उदघाटन झाल्यानंतर दोन जमावा मध्ये झालेल्या भांडणे मारामारी नंतर दोन्ही पक्षाने एकमेका विरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केला असून यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसेपातील यांचे पुतणे व भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसेपाटील यांच्या सह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर माजी उपसरपंच रवी वळसेपाटील यांच्या पत्नी मनीषा वळसेपाटील यांच्या सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून
फिर्यादीचे अमरजीत नामदेव गायकवाड( वय 30 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, रा. निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे.)
,प्रदीप प्रताप वळसे,रामदास पांडुरंग वळसे,राहुल झुंजारराव हांडे,विश्वास भिकाजी गोरे,मिलिंद बाजीराव वळसे, मंगेश संभाजी वळसे,संदीप भाऊ सो वळसे,संतोष बापूराव वळसे,संदीप सदाशिव टेमकर,संतोष महादू टाव्हरे,विकास बाबाजी टाव्हरे , उदय हंबीराव हांडे ,अक्षय बाळासाहेब थोरात,शुभम अंबादास भोंडवे,ज्ञानेश्वर उर्फ माउली आदक (पूर्ण नाव माहित नाही),प्रमोद दिनकर वळसे,शाम तुळशीराम टाव्हरे,धीरज हांडे (पूर्ण नाव माहित नाही), वैभव रामचंद्र वळसे, पंकज वळसे पूर्ण नाव माहित नाही अ न 1ते 20 सर्व रा निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे संजय नामदेव गोरे, तुषार सोपान टाव्हरे,संतोष दत्तात्रय मेंगडे,मंदाकिणी प्रताप वळसे, उर्मिला संतोष वळसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शांताराम रामभाऊ उमाप (वय,४६,रा.निरगुडसर) यांनी गणपत मारुती वळसे, मनीषा रवींद्र वळसे,राजेंद्र बबन वळसे,रेश्मा राजेंद्र वळसे,वसंत शंकर वळसे, अलका वसंत वळसे,विशाल वसंत वळसे,विकास वसंत वळसे,विद्या विशाल वळसे,अमर नामदेव गायकवाड,विकास कडवे,महेश गणपत राऊत,वैभव बाळासाहेब किरे,राजेंद्र पंचरास आदी वर गुन्हा दाखल केला आहे परिस्थिती शांत असून
सदर गुन्ह्याचा तपास खेड आंबेगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करत असून त्यांनी ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.

Read more...

आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा – रविंद्र करंजखेले

प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)

मंचर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्वनियोजित कट करून शिवसेनेच्या व दलित समाजाच्या युवकांना शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कृत्याचा शिवसेना आंबेगाव तालुका जाहीर निषेध करत आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आमदार दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रविंद्र करंजखेले यांनी केली.

दलित युवकांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या प्रदीप वळसे, रामदास वळसे व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा करंजखेले यांनी दिला आहे.

ह्या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दलित बांधवांच्या मतांवर डोळा ठेवून राज्यात साळसूदपणाचा आव आणत असताना राष्ट्रवादीचे नेते व आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या गुंडांकडून स्वतःच्या गावात दलित बांधवांवर असले भ्याड हल्ले करत खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार केल्याने त्यांची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे.

Read more...

मिना शाखा आणि घोड शाखा कालव्यांमधून पाणी सोडण्याची शिवसेनेची मागणी

मंचर ।  जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पुर्वभागातील गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याने तसेच याभागाला शेवटचे आवर्तन हे आक्टोबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात करण्यात आलं होते. अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटल्याने या भागातील लोकांना तीव्र पाणी टंचाई ला सामोरे जावं लागत आहे तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.  याभागात पाणी सोडण्याची मागणी  शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी दिली आहे.


मीना शाखा कालवा तसेच घोड शाखा कालवा यामधून जुन्नर तालुक्याच्या पुर्वभागातील मांजरवाडी , खोडद , हिवरे , वडगाव कांदळी , बोरी खुर्द , निमगाव सावा ,सुलतानपूर , शिरोली , औरंगपुर, पारगाव तर्फे आळे, कावळ पिंपरी, तसेच आंबेगाव तालुक्यातील कळंब, लौकी ,थोरांदळे, जाधववाडी, भराडी, जवळे , रांजणी , खडकी , नागापूर , चांडोली बु.,वळती , भागडी,पिंपरखेड,शिंगवे या गावांना पाणी सोडण्याबाबत शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी समवेत औरंगपुरचे सरपंच राहुल डुकरे , मांजरवाडी गावचे सरपंच संतोष मोरे , उपशाखाप्रमुख सुखदेव खंडागळे , थोरांदळे गावचे मा.उपसरपंच मंगेश टेमगिरे , सुरेश पवार उपस्थित होते.

Read more...
Open chat