शिक्षण व सहकार क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व जनार्दन(मास्तर) बांगर कालवश

सजग वेब टीम, जुन्नर
बेल्हे| मुंबई एज्युकेशन बोर्डाचे माजी उपायुक्त आणि विशाल जुन्नर नागरी पतसंस्थेचे संस्थापक जनार्दन रभाजी बांगर उर्फ जना मास्तर यांचे अल्पशा आजाराने मुंबई  येथे राहत्या घरी देहावसान झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सहा मुली,सून,जावई,नातवंडे आणि भाऊ असा मोठा परिवार  आहे बेल्हे (गुंळूचवाडी) शिवारात शेतकरी कुटुंबात जन्मलेले जनार्दन रभाजी बांगर हे मुबंई एज्युकेशन बोर्डाचे उपयुक्त असताना राज्यातील अनेक शिक्षण संस्थेच्या संचालकाना मार्गदर्शन करून संस्था जगविल्या असल्याचे बोलले जाते.मुबंई येथे नोकरी-व्यवसायांच्या निमित्ताने आलेल्या बेल्हे परिसरातील व्यक्तींना एकत्र करून बेचाळीस वर्षांपूर्वी दिन दुबळ्या घटकांना उभे करण्यासाठी भायखळा येथे,विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.त्यानंतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी त्यांनी विशाल जुन्नर सेवा मंडळा ची स्थापना करून आळे येथे सर्वप्रथम औषध निर्माण महाविद्यालय सुरु केले.परिसरात शिक्षण व सहकार क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते,आज सकाळी मुंबई येथे राहत्या घरी त्यांचे देहावसान झाले,सायंकाळी बेल्हे येथील गंगाद्वार स्मशानभूमीत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यात आले.
Read more...
Open chat