काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचं निधन  

 

सांगली | विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवाजीराव देशमुख किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. सांगली जिल्ह्यातील कोकरुड या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजकीय कारकिर्द

शिवाजीराव देशमुख १९९६ आणि २००२ मध्ये विधानपरिषदेवर निवडून गेले होते. विधानपरिषदेचे सभापती असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणला होता. त्यानंतर त्यांना सभापती पद सोडावं लागलं होतं. त्यापूर्वी १९७८ , १९८० , १९८५ आणि १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडून आले होते.

Read more...
Open chat