आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी या सदरात आजची सावित्रीची लेक आहेत..
मीनाक्षी राठोड
जालना जिल्ह्यातील बंजारा समाजातून आलेल्या व आज अभिनयाद्वारे समाजात व समाजकारणात आज स्वःताचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मीनाक्षीताई यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेवूयात.
शालेय जीवनात वडिलांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे ताईंनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली. पुढे महाविद्यालयीन जीवनात एकांकिका व युवा महोत्सव यामधे सहभागी होऊन अनेक बक्षीसे देखील पटकवली.यातून त्यांची अभिनय क्षेत्राची आवड अजून बळकट होत गेली.
या आवडीला करियर म्हणून निवडण्याचा निर्णय घेताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून त्यांनी कोर्स केला.
पुढे ताईंना समविचारी मित्रांची साथ मिळत गेली.
पुढे त्यांची शाहिर संभाजी भगत यांच्याशी ओळख झाली आणि “शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकाचा जन्म झाला.
राजकुमार तांगडे यांची कथा व शाहिर संभाजी भगत यांची चळवळीची गाणी आणि त्याच्या सोबतीला मीनाक्षी ताई व त्यांच्या टीमचा अभिनय यामुळे हे नाटक आज जनमानसात खूप लोकप्रिय ठरलंय व ठरतंय.
याचबरोबर मीनाक्षीताईंनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “नाळ” या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा आहे. पर्यावरणावर आधारित “हिरवी” ही शॉर्टफिल्म त्यांची लवकर येतेय. तसेच,त्या “प्रयास” हेल्थ कॅम्पसाठी त्या काम करतायत.
सध्या गाजत असलेल्या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं या” मालिकेत त्या करत असलेली साऊथ इंडियन महिलेची भूमिका वाखाण्याजोगी आहे.
या सर्व प्रवासात मीनाक्षीताईंना घरच्यांची साथ तर मिळालीच त्याचबरोबर मित्रत्वाच्या नात्यातल्या कैलास दादांच्या रूपाने जीवनभराची साथ व सोबत मिळत आहे.
अशा या अभिनयाच्या क्षेत्रातदेखील सामाजिकता व चळवळीत काम करणाऱ्या मीनाक्षीताईंना लोकसंस्थेचा मानाचा मुजरा व त्यांना आगामी कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
-स्नेहल डोके-पाटील (लोकसंस्था)