‘राष्ट्रीय युवा संसद २०१९ – ‘पुणे जिल्हा युवा संसदेत अमर चिखले प्रथम.

‘राष्ट्रीय युवा संसद २०१९’
जिल्हा युवा संसदेत अमर चिखले प्रथम.

सजग वेब टीम, शरद शेळके

नारायणगाव | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी कार्यान्वित केलेला राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०१९ या कार्यक्रमासाठी १२ ते १८ जानेवारी दरम्यान ऑनलाईन स्क्रिनिंगद्वारे तसेच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पुणे जिल्हानिहाय युवा संसदेसाठी ५७ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. दि.२४ जानेवारी रोजी ही स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी पार पडली.अमर राजेंद्र चिखले याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत राज्य युवा संसदेत आपले स्थान निश्चित केले.या स्पर्धेच्या निमित्ताने प्र. कुलगुरू डॉ. उमराणी सर,नेहरू युवा केंद्र पुणे चे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर,ब्रिगेडियर हेमंत महाजन,सिनेट सदस्य भाग्यश्री मंठाळकर,प्रा. संजय बोराटे, डॉ.भोळे सर इ.मान्यवर उपस्थित होते .त्यांनी अमर चिखले याचे कौतुक करत दि ७ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय युवा संसदेसाठी शुभेच्छा दिल्या.
याआधी सुध्दा त्याने मागील वर्षी महाराष्ट्र राज्य युवक व क्रीडा सेवा संचालनायल द्वारा आयोजित राज्य युवा महोत्सव २०१८ मध्ये पुणे विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Read more...
Open chat