जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती जुन्नर |
जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची उपस्थिती
सजग वेब टिम, जुन्नर
जुन्नर | नारायणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका कार्यकारिणी ची बैठक पार पडली. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत हि बैठक पार पडली. या बैठकीसाठी आ.अतुल बेनके यांच्या समवेत तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा सरचिटणीस दिलीप कोल्हे, युवकचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, पं. स. सभापती विशाल तांबे, मीडिया विभाग प्रमुख विजय कुऱ्हाडे, पक्षाचे जि.प.सदस्य यांसह काही प्रमुख आणि निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी, पक्षाची भूमिका यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
जुन्नर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या शासकीय उपाययोजना व पुढील धोरणे या बाबतीत माहीती आमदार बेनके यांनी यावेळी दिली. रेशनिंग वितरण, अन्न धान्य पुरवठा तसेच कोविड केअर सेंटरची उभारणी यासंबंधीची सविस्तर माहीती बेनके यांनी दिली.
या बैठकीत बोलताना जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी पक्षाच्या व सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या महत्वाच्या उपाययोजनांची माहिती देत तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचे व घेतलेल्या दक्षतेचे कौतुक केले.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध सुचना करून काही मागण्याही जिल्हाध्यक्षांसमोर मांडल्या. सर्व सुचनांची दखल घेत तालुक्यासाठी अधिक मदत देण्याचे आश्वासन गारटकर यांनी दिले. त्याचप्रमाणे अन्य तालुक्यांमध्ये कशाप्रकारे काम सुरू आहे, बारामती पॅटर्न काय आहे व जिल्ह्यात अनेक उपाययोजना कशा सुरू आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
सध्या तालुक्यातील बहुतांश कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबईहून आलेले नागरिक आहेत असे आढळून आले आहे यावर उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. यासंदर्भात नव्याने ठोस उपाययोजना करणं गरजेचं असल्याने प्रशासनाला तशा सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.
अनेकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली व या गंभीर संकटावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.