खेड तालुक्यातून अमोल कोल्हेंना ३० हजाराचे लिड : दिलीप मोहिते पाटील

 

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना खेड तालुक्यातून ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. महिला, तरुण, माळी समाज आणि इतर मागासवर्गीयांची बहुतांश मते राष्ट्रवादीला मिळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.

आम्ही तालुक्याच्या गावागावात प्रचार केला, शंभर ते सव्वाशे कोपरसभा आणि नऊ-दहा मोठ्या सभा घेतल्या. सर्वठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधी लोकांच्या सभांना गर्दी होत नव्हती. त्यांची उद्धव ठाकरेंची सभाही फ्लॉप झाली. पंतप्रधान मोदींची हवाही कुठे दिसली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांना तालुक्यात सभाही घेता आली नाही. शेवटच्या दिवशी राजगुरूनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या रॅलीला दोनशे लोकही नव्हते. याउलट त्याच दिवशी डॉ. कोल्हेंच्या रॅलीला प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र डॉ. कोल्हे यांना सर्वठिकाणी उदंड प्रतिसाद मिळणारा यावरून तालुक्यात त्यांना ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मला वाटतो, असे मोहिते म्हणाले.

आम्ही नेत्यांनी गावागावात प्रचार केला, मात्र गावातील कार्यकर्त्यांना गावातच ठाण मंडून बसण्यास सांगितले होते. आम्ही गावात गेल्यावर खासदारांनी तुमच्या गावात काय काम केले ? आणि खासदार कधी तुमच्या गावात आले होते का ? एवढे दोन प्रश्न आवर्जून विचारायचो. त्यांची उत्तरे बहुतांशवेळा नकारार्थी यायची. त्यावर मग त्यांना मत कशासाठी द्यायचे असा प्रश्न विचारल्यावर लोकांच्या लक्षात वस्तुस्थिती यायची आम्हाला सकारात्मक वातावरण तयार व्हायचे. याउलट नोटबंदी, जीएसटी, बैलगाडा शर्यती आणि खोट्या आश्वासनांमुळे विरोधी बाजूंवर लोकांचा राग दिसत होता. शिवसेना आणि भाजपचे लोक एकमेकांबरोबर प्रचंड भांडत होते आणि त्यानंतर अचानक गळ्यात गळे घालू लागले हेही लोकांना पटले नाही, त्यामुळे तालुक्यात आम्हाला मताधिक्य निश्चित असल्याचे असेही मोहिते यांनी सांगितले.

Read more...

जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचा कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर – शिरोली गावचा जुन्नर तालुक्याचा भूमीपुत्र म्हणून डाॅ अमोल कोल्हे यांना गावबैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोली गावाने एकत्र येऊन गावची बैठक घेऊन एकजुटीने कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा जाहिर केला आहे. याआधी नारायणगाव, वारूळवाडी या गावांनीही कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकजुटीने काम करत असल्याचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसत आहे हे आघाडीसाठी आशादायक म्हणावं लागेल.

Read more...

परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर 

डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more...

आरटीआय कार्यकर्ते बाबाजी पवळे यांचा महाराष्ट्र ग्रामविकास पुरस्काराने गौरव

 

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर | ग्रामविकास प्रतिष्ठान (महा.रा)या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बाबाजी पवळे यांच्या कामाची दखल घेत त्यांना साहित्यिक व कवी म.भा.चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय “महाराष्ट्र ग्रामविकास गौरव ” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

बाबाजी पवळे हे आरटीआय कार्यकर्ते असून अगदी तरुण वयापासून सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रात काम करत आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून सर्व समाजाच्या नागरिकांच्या न्याय व हक्कसाठी लढत आहेत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोशल मिडिया व पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केला आहे.अतिशय “निर्भीड” पणे काम करणाऱ्या पवळे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे,विलास भोईर,सुभाष गोरडे,विलास शिंदे, रामदास दौंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read more...

जीवन समृद्ध करणाऱ्या शिक्षणाची गरज – नितीन गोडसे; राज्यस्तरीय चर्चासत्र हुतात्मा राजगुरू महाविद्यालय

राजगुरू महाविद्यालयात  दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन

बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)

राजगुरूनगर | आपल्याकडे प्रचंड प्रमाणात नवयुवक करियरसाठी उपलब्ध होत असून त्यांचे समाधान करणारी साधनसंपत्ती उपलब्ध नाही तसेच राजकीय नेतृत्वात तशी इच्छाशक्ती दिसत नाही त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपले जीवन समृद्ध करणाऱ्या, आपल्या जाणिवा विकसित करणाऱ्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील एक्सेल गॅस अॅन्ड इक्युपमेंट प्रा.लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन गोडसे यांनी केले. ते  गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालय यांच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी  रोजी आयोजित उद्योजकता व नेतृत्व विकासात उच्चशिक्षणाची भूमिका या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील होते. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, अॅड.माणिक पाटोळे,  मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील,  उपप्राचार्य  डॉ. एच. एम.जरे, डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, प्रबंधक कैलास पाचारणे,भैरू चौगले आणि  विविध महाविद्यालयातून आलेले  प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

नितीन गोडसे पुढे म्हणाले की आज पारंपरिक शिक्षणातून जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सुलभ राहिला नाही. या रूळलेल्या मार्गावर जाऊन जीवनात यशस्वी होता येणार नाही. हे प्रचंड स्पर्धेचे युग असून जे सक्षम आहेत तेच टिकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यानी पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्याभिमुख शिक्षणाचा विचार करायला हवा. त्यासाठी सर्वोत्तम शिक्षण घ्या. स्वत:वर विश्वास ठेवा. स्वत:चा आदर करा. पूर्ण क्षमतेने काम करा. कामातून समाधान शोधा आणि यातून चांगली कार्यसंस्कृती निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील म्हणाले की माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बदलांनी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापली आहेत.  ओला, उबर सारख्या कंपन्या केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व फूड डिलिवरी क्षेत्रात  सहभाग घेऊन रोजगार व महसूल निर्मितीत आपले योगदान देत आहेत. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात व व्यवसायातही  व्हायला हवा. सद्या समाजात लोकांच्या हाताला काम देणारा उद्योजक निर्माण होण्याची गरज आहे.  बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व आले असूनविद्यापीठीय अभ्यासक्रम हा कौशल्याभिमुख असायला हवा. पदवी मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला एखादे कौशल्य तरी प्राप्त झाले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या समस्यांकडे संधी म्हणून पाहताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर उद्योजक म्हणून त्यांना वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण होऊ शकते असे ते म्हणाले.

या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठातील डॉ.ए.डी.जाधव, मुंबई विद्यापीठातील प्रा. मनोज सुपेकर, पुणे विद्यापीठातील डॉ.एम.जी.मुल्ला, डॉ.एम.आर.अवघडे, औरंगाबाद विद्यापीठातील डॉ. सईद अजरुद्दिन, डॉ. नंदकुमार राठी यांनी मार्गदर्शन केले.

चर्चासत्राचा समारोप उपप्राचार्य डॉ. एच.एम.जरे डॉ.टी.जी.गिते, डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, डॉ.सूर्यवंशी, डॉ.राजेंद्र शिरसी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या चर्चासत्रात सहभागी झालेल्या  सुमारे ६० संशोधकांच्या शोधनिबंधाचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या चर्चासत्राचे आयोजन उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, समन्वयक  प्रा. गणेश.धुमाळ,सहसमन्वयक प्रा. ए. एस.पवार यांनी केले. समिती सदस्य म्हणून प्रा.पी.पी.ओसवाल, प्रा.एस.ए.वीर, प्रा.टी.बी.वेहळे,प्रा.आर.एन. कातोरे, प्रा.एच.एस.चौधरी, प्रा.सुर्वे, प्रा.अभिजित बेंडाले, प्रा. सचिन गायकवाड, प्रा.मीनल बोगाडे, प्रा. रवींद्र मोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एच.एम.जरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.काजल शहा, प्रा.रसिका तांबे,यांनी तर आभार प्रा.गणेश धुमाळ यांनी मानले.

Read more...

रोटरी क्लबच्या लाखमोलाच्या मदतीने धामणे शाळेचा कायापालट!

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर | रोटरी क्लब पुणे स्पोर्ट सिटी, रोटरी क्लब पुणे रीव्हरसाईड व रोटरी क्लब अमेरीका व लंडन यांच्या लाखमोलाच्या मदतीने धामणे शाळेचे नूतनीकरण करत सहा महिन्यात कायापालट झाला असल्याची माहिती मुख्याध्यापक धर्मराज पवळे यांनी दिली.


रोटरीने शालेय इमारतीची उंची वाढवून नवीन छत दिले. शालेय इमारतीचे रंगकाम, मुलामुलींना स्वतंत्र शौचालय युनिट, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेचे भव्य प्रवेशद्वार, ७५ गुंठे शालेय परिसराला तारकुंपणासह संरक्षक भिंत, पेव्हिन ब्लाॅक, सात वर्गांना प्रत्येकी पांढरे फळे, टेबल, कपाटे, खुर्च्या, पंखे दिले. प्रत्येक वर्गात अद्ययावत विज व्यवस्था, ५० बेंच, हार्मोनिअम, तबला, संपुर्ण भजन साहित्य, इ लर्निंग संच, साऊंड सिस्टीम, ग्रंथालय, खेळाचे साहित्य,
आदी सर्व सुविधा रोटरी क्लबने या सहा महिन्यात धामणे शाळेसाठी निर्माण केल्याचे पवळे यांनी सांगितले.
या सार्‍यांचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळ्यासाठी लंडन रोटरीचे व्हाईस प्रेसिडेंट पाॅल चार्टर, फिलीस चार्टर, अमेरीकेचे रोटरीअन्स बिल एम्सिली, पुणे स्पोर्ट सिटीच्या प्रेसिडेंट रुपिंदर बेरी, विनोद पाटील, संदेश सावंत, मनोजित, जयु हळबे, केनेडी विल्यम्स, त्रिलोक कामदार आदी मान्यवरांसह धामणेचे उपसरपंच काळूराम कोळेकर, शिक्षणविस्तार अधिकारी रोहिदास रामाणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संगिता कोळेकर, बाबाजी सातपुते,संभाजी गिर्‍हे, सत्यवान भोकसे, किरण कोळेकर , अमोल सातपुते, नवनाथ कोळेकर, चंद्रकांत सातपुते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलगाडी सफर, मासवडी जेवण व महाराष्ट्रीयन फेट्यांच्या स्वागताने परदेशी पाहुणे भारावून गेले. धामणे शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम व अभ्यासातील गतीबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांनी परकीय चलनांची विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे आदींनी रोटरीच्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर केदारी यांनी केले. मारुती जरे व अनिल बोर्‍हाडे यांनी उत्तम संयोजन केले. मंगल निमसे यांनी आभार मानले.

Read more...

खेड तालुक्यात दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मनसेची मागणी


सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर | राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही.असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्दशनास आले आहे .सर्वच योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत अजुनही पोहचलेल्या नाहीत .त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असुन शेतकरी आत्महत्या करीत आहेत .दुष्काळी योजना फक्त कागदावरच दिसत आहे .या बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे .शासन निर्णय लागु करण्यास मंजुरी देण्यात आली होती.त्यामुळे खेड तालुक्यात दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे

जमीन महसुलात सुट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपाच्या विज बिलात ३३.५०% सुट,शालेय महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची विज खंडीत न करणे तसेच शासनाच्या सर्व सवलती ज्या लाभार्थी शेतकरी यांना देण्यात आल्या आहेत,त्याची  सविस्तर लेखी माहिती लाभार्थ्यांच्या नावासह यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावी.

तसेच ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील किती विहिरी अधिग्रहीत केल्या किती टँकर लावले याची सविस्तर माहिती द्यावी .तालुक्यातील एकुण जलसाठा व तालुक्यातील पशुधनास एप्रिल २०१९ पर्यंत पुरेल एवढा पुरेसा चार उपलब्धतेबाबत माहिती सुद्धा देण्यात यावी .दरम्यान तालुकाप्रशासनाने तालुक्यातील सगळ्या सार्वजनिक विहिरींचा गाळ काढावा व विहिरी दुरुस्त्या कराव्यात पाण्यांच्या योजनांच्या दुरुस्त्या कराव्यात टंचाईग्रस्त गावत ५००० लि.पाण्याची टाकी बसवावी . मनरेगा योजना प्रभावीपणे राबवावी.योग्य रितीने चारा पुरवठा करावा .अनुदानित अन्नधान्य साठी पात्र असलेल्यांना शिधापत्रिका त्वरित बनवुन द्यावी.दुष्काळी गावात अपंग ,विधवा ,निराधार ,वृद्ध ,अत्यंत पिडीत अश्या लोकांसाठी सामुहीक स्वयंपाक घर सुरु करण्यात यावे .अशी मागणी सुद्धा आम्ही करीत अहोत.तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या

तसेच गाई म्हशी विकत घेणे,शेळीपालन, कुक्कुटपाल,शेड –नेट हाऊस,पॉलीहाऊस,मिनी डाळ मिल ,पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर,ट्रॅक्टर व अवजारे ,पॉवर टिलर या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती ७ दिवसांच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपलब्ध करून द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करेल असा इशारा  या निवेदनाव्दारे देण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे,सुधीर बधे संघटक पुणे जिल्हा,मनोजदादा खराबी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मंगेशभाऊ सावंत,उपाध्यक्ष पुणे जिल्हा संदीप पवार,अध्यक्ष खेड तालुका नितीन ताठे, सचिव खेड
तालुका विश्वास टोपे कामगार नेते तुषार बवले अध्यक्ष खेड तालुका मनवीसे,अतुलभाऊ मुळूक
मा अध्यक्ष खेड तालुका मनविसे मिनीनाथ ताम्हाणे उपाध्यक्ष खेड तालुका,महेश खलाटे उपाध्यक्ष खेड तालुका, सुजित थिगळे उपाध्यक्ष खेड तालुका, किशोर सांडभोर अध्यक्ष राजगुरुनगर शहर, सलीम सय्यद उपाध्यक्ष राजगुरूनगर शहर,विशाल कड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..

Read more...

आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – निवृत्ती महाराज देशमुख

बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)

राजगुरूनगर |आईवडिलांच्या गालावरचे हसू हे मुलांसाठीची सर्वात मोठी श्रीमंती असून आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांनी  हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत मायबाप याविषयावर बोलत होते यावेळी केले.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील, जि.प.सदस्य बाबाजी काळे,   संस्था संचालक   अॅड. मुकुंदराव आवटे, बाळासाहेब सांडभोर, सुशील सिंगवी, डॉ.रोहिणी राक्षे, अश्विनी मोरमारे, अॅड.माणिक पाटोळे, उमेश आगरकर, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टे पाटील, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी
निवृत्ती महाराज देशमुख यांचे स्वागत अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी केले.

निवृत्ती महाराज देशमुख पुढे म्हणाले की, कुटुंब व्यवस्था विचाराने कमजोर झाल्याने समाज विकासापासून वंचित राहत आहे. त्यासाठी सदविचारांना आजही समाजात किंमत आहे. सकारात्मक विचारांनी काम केले तर  आदर्श नागरिक बनण्याची कुवत या सदविचारांमध्ये आहे. पालकांनीही आपल्या घरात मुलांना अभ्यासपूरक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे तरच मुले घडतील. ते पुढे म्हणाले की मोबाईल ही गरज असली तरी त्याचा अतिरेक करू नये. मोबाईलच्या अतिरेकाने माणसामाणसातील संवाद संपत चालला आहे. निद्रानाशासाराखा आजार जडला आहे. शालेय जीवनातील  मुलांचे मोबाईल पालकांनी वेळोवेळी तपासायची गरज व्यक्त केली. समाजात ज्ञानाला किंमत असून ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना आजही नोकऱ्या असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थी हा वर्गात किंवा क्रीडांगनावर असायला हवा. विद्यार्थी सर्वगुणसंपन्न तयार व्हावा यासाठी महाविद्यालय हे उर्जा निर्माण करणारे स्रोत असायला हवे. विद्यार्थ्यांना कष्ट, सदविचार, चांगले मित्र, अखंडाभ्यास या गोष्टी मोठे होण्यासाठी आवश्यक आहेत. अपयशाने खचून जाऊ नका. आपले काम प्रामाणिकपणे करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

राजगुरुनगर ही क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरुंची भूमी असून या क्रांतीच्या भूमीत शिक्षणाची ज्ञानज्योत साहेबरावजी बुट्टेपाटील यांनी लावली. या महाविद्यालयातील विद्यार्थी आदर्श घडला तरचं त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे ते म्हणाले.

मुलांनी आईवडिलांचा संभाळ करावा. प्रेरणादायी चरित्र पाठ करून आचरणात आणावे. व्यसनांच्या आहारी जाऊ नये. आणि योग्य शिक्षण व कष्ट करण्याची सवय अंगीकारून वर्तमान आयुष्य चांगले जगण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला विद्यार्थ्यांनीही त्यांना प्रचंड  टाळ्यांंच्या गजरात प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल कुलकर्णी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय प्रा.धनंजय बोऱ्हाडे यांनी तर आभार प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील यांनी मानले.

Read more...

चांगुलपणाची लोकचळवळ उभी करण्याची गरज – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 

बाबाजी पवळे, राजगुरुनगर (सजग वेब टीम)

राजगुरुनगर – गरिबी, विषमता, भ्रष्ट्राचार, कुपोषण हे समाजाचे शत्रू असून त्याला आळा घालण्यासाठी स्वच्छता, शिस्त, परिश्रम यातून समाज व देशाची प्रगती करा. याच मूल्यांच्या प्रचार व प्रसारासाठी प्रयत्न करून युवकांनी आपली उर्जा विधायक कामांकडे वळवण्यासाठी चांगुलपणाची लोकचळवळ स्वत:पासून सुरु करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र मंत्रालयातील निवृत्त सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत प्रत्येक दिवस, नवा दिवस, नवी क्षितिजे या विषयावर बोलत होते. या प्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील,  संचालक  बाळासाहेब सांडभोर, अॅड. प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष  अॅड.  राजमाला  बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे स्वागत व सत्कार संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील  यांनी केले.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलताना पुढे म्हणाले की आज शिक्षण गावोगावी पोचले असले तरी समाज परिवर्तांची चळवळ थांबली आहे. त्यासाठी   समाजाच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीत अमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणे पहिल्यांदा मनाची स्वच्छता करायला हवी. शिक्षणाला नाविन्याची जोड देऊन तंत्रज्ञानाचा वापर समाजजीवन संपन्न करण्यासाठी करायला हवा. समाजाच्या सर्व थरातील लोकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणायला हवे. यासाठी प्रत्येकाच्या मनातील प्रेमाचे दिवे पेटवून चांगुलपणाची लोकचळवळ सुरु करणे गरजेचे आहे.

चांगल्या माणसांनी राजकारणापासून दूर राहणे हे समाजाच्या अधोगतीचे लक्षण असून समाजसेवेची आस मनात असणारे कार्यकर्ते राजकारणात असावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी सामान्य लोक आणि राज्यकर्ते यांच्यातील विश्वास निर्देशांक किती त्यावर त्या देशाची प्रगती अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
पासपोर्टसारखी जटील वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोचविताना मागील एका वर्षात तीनशेच्या आसपास पासपोर्ट सेवा केंद्र देशात सुरु केली असून प्रत्येक लोकसभा मतदार संघात पासपोर्ट कार्यालय सुरु करायचे असून आपल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातही पासपोर्ट शिबीर आयोजित केले जाईल असे ते म्हणाले.
प्रशासनाची कार्यसंस्कृती ही जनतेशी संवादी असायला हवी. प्रत्येकाने मातृभाषेचा अभिमान ठेवावा. ज्या क्षेत्रात आपण आहोत तेथे चांगले करण्याचा प्रयत्न करावा. हुतात्मा राजगुरू यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका अशी अपेक्षा व आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
साहेबराव बुट्टेपाटील यांच्या कार्याचा गौरव करून मी जरी काल परराष्ट्र सेवेतून निवृत्त असलो तरी त्यांच्या कर्मभूमीत मी सेवाप्रवृत्त होण्याचा संकल्प करीत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना नवसमाजाच्या निर्मितीसाठी सर्वधर्म समभावाची, वसुंधरेच्या जतनाची आणि मानवी मूल्यांच्या जोपासानेची शपथ दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उमेश जगताप यांनी व वक्त्यांचा परिचय डॉ. बी.डी.अनुसे यांनी तर आभार ऋग्वेद काळे याने मानले.

 

Read more...

महाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व म्हणजे सावरकर – डॉ.सच्चिदानंद शेवडे (साहेबराव बुट्टे पाटील व्याख्यानमाला)

बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)

राजगुरूनगर | तत्त्वज्ञ, इतिहासकार, कवी, क्रांतिकारक, देशभक्त, साहित्यिक, पत्रकार अशी एकाच मानवी शरीरात असलेली प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाची विविध रूपे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपाने भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरली गेली असून  ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ललामभूत व्यक्तिमत्त्व असल्याचे गौरवोद्गार  डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी काढले. ते  हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत  सावरकर एक झंझावात  या विषयावर बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक शांताराम घुमटकर, अॅड.  मुकुंदराव आवटे,  बाळासाहेब सांडभोर,  उमेश आगरकर, प्राचार्य  डॉ. एस.बी. पाटील,  व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला    बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा.जी.जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, राष्ट्र हेच सावरकरांचे जीवनमूल्य होते. त्यामुळे त्यांचे साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच निर्माण झाले आहे. यावेळी त्यांनी सावरकरांच्या  जीवनातील निवडक प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती दिली.

सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीबद्दल बोलताना त्यांनी मराठी भाषेला सावरकरांनी नव्या शब्दांची देणगी दिली असून रत्नागिरीच्या स्थानबध्दतेच्या काळात  अस्पृश्योद्धाराच्या कार्यासोबतच सावरकरांनी  भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली. त्यांच्यामुळेच महापौर, प्रशाला, प्राचार्य, दिग्दर्शन, संकलन, निर्माता असे अनेक शब्द मराठीत रूढ झाल्याचे ते म्हणाले.
स्वतंत्र भारतात आपण क्रांतिकारकांची उपेक्षा केल्याचे सांगून  महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांना जाणीवपूर्वक गुंतवण्यात आल्याचे ते म्हणाले.

तारूण्य हे वयावर किंवा केसाच्या रंगावर न ठरता ते त्या त्या व्यक्तीच्या उर्जेवर ठरायला हवे असे सांगून आपण मुलांना पराक्रमाचा इतिहास शिकवत नसल्याने मुलांमध्ये राष्ट्राबद्दलची उर्मी कमी झाली आहे. त्यामुळेच  लष्करात अधिकाऱ्यांच्या हजारो जागा रिक्त असल्याचे ते म्हणाले. आपण जातीपातीच्या पलिकडे जाऊन  मी भारतीय आहे अशी आपली पहिली ओळख निर्माण करायला हवी.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे सावरकरांचे इंग्लडमधील निवासस्थान असलेले इंडिया हाऊस ताब्यात गेऊन तेथे त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनंजय बोऱ्हाडे यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. कैलास सोनावणे  यांनी तर आभार कु. अक्षय कोळेकर याने मानले.

Read more...
Open chat