बिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी

बिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्याची चिमुरडी मृत्युमुखी

सजग वेब टीम

येडगाव | जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील खानेवाडी परिसरातील शेतकरी रामदास भिकाजी भोर यांच्या शेतीमध्ये लक्ष्मण बाबुराव कुल्हाळ (रा. साकुर मांडवे) यांनी शेळ्या मेंढ्यांचा वाडा लावला होता. रात्री वाड्याच्या बाजूला सर्व कुटुंब झोपले असताना लक्ष्मण कुल्हाळ यांची नात, कल्याणी सुखदेव झिटे वय ५ महिने.रात्री आईवडिलांच्या मध्ये झोपली होती परंतु रात्री तीनच्या सुमारास बिबट्याने ओढुन ५०० मीटर वर फरपटत नेऊन खाल्ले. कुत्र्यांनी कालवा केला असता, कुटुंबातील सदस्य उठले व मुलीची आई बिबट्यामागे पळत गेली. परंतु अंधारात काही हाती लागले नाही. पहाटेच्या सुमारास थोडासा उजेड पडल्यावर मुलगी मृतावस्थेत आढळून आली. नातेवाईकांनी संबंधित वन अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी पंचनामा केला. तरी वन विभागाने त्वरित पिंजरा लावाण्याची मागणी येडगाव ग्रामस्थांनी केली आहे.

Read more...
Open chat