मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कार्यगौरव
मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कार्यगौरव
सजग वेब टीम, पुणे
भुगाव | २०१९ च्या पुर परीस्थितीत आषाढी एकादशीला पंढरपूर मध्ये महाराष्ट्रातून जमलेल्या भोळ्याभक्तांच्या जनसमुदायात मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने उत्कृष्ट पद्धतीने काम पाहिले म्हणून याही वर्षी जागतिक स्तरावर असलेले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि सोलापूर आपत्ती समिती यांनी पुढाकाराने पुणे जिल्ह्यातून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये पुंडलिक मंदिर आणि चंद्रभागा नदी परीसरात कुठलाही अनूचित प्रकार घडू नये, या बंदोबस्तासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापन टिमची मागणी केली.
जनसेवा फाउंडेशन, तंटामुक्ती समिती भुगाव, एस आर एस फॅसिलिटी व समस्थ ग्रामस्थ मंडळी भुगाव यांच्या वतीने मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीस पिण्याच्या पाण्याचे बॉक्स, बिस्कीट पुड्यांचे बॉक्स देण्यात आले. त्यांना ग्रामपंचायत सदस्या पर्वतीकाकू शेडगे आणि सवितामामी खैरे यांच्या वतीने नाष्टा देण्यात आला.
यावेळी गावातील जेष्ठ नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.