मिना शाखा आणि घोड शाखा कालव्यांमधून पाणी सोडण्याची शिवसेनेची मागणी

मंचर ।  जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील पुर्वभागातील गावांमध्ये पाणी टंचाई भासत असल्याने तसेच याभागाला शेवटचे आवर्तन हे आक्टोबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात करण्यात आलं होते. अडीच महिन्याहून अधिक कालावधी लोटल्याने या भागातील लोकांना तीव्र पाणी टंचाई ला सामोरे जावं लागत आहे तसेच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.  याभागात पाणी सोडण्याची मागणी  शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शिवसेनेचे जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी दिली आहे.


मीना शाखा कालवा तसेच घोड शाखा कालवा यामधून जुन्नर तालुक्याच्या पुर्वभागातील मांजरवाडी , खोडद , हिवरे , वडगाव कांदळी , बोरी खुर्द , निमगाव सावा ,सुलतानपूर , शिरोली , औरंगपुर, पारगाव तर्फे आळे, कावळ पिंपरी, तसेच आंबेगाव तालुक्यातील कळंब, लौकी ,थोरांदळे, जाधववाडी, भराडी, जवळे , रांजणी , खडकी , नागापूर , चांडोली बु.,वळती , भागडी,पिंपरखेड,शिंगवे या गावांना पाणी सोडण्याबाबत शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवेदन दिले. यावेळी समवेत औरंगपुरचे सरपंच राहुल डुकरे , मांजरवाडी गावचे सरपंच संतोष मोरे , उपशाखाप्रमुख सुखदेव खंडागळे , थोरांदळे गावचे मा.उपसरपंच मंगेश टेमगिरे , सुरेश पवार उपस्थित होते.

Read more...
Open chat