महाराष्ट्र पत्रकार संघाची जुन्नर तालुका जम्बो कार्यकारिणी जाहिर
अध्यक्षपदी प्रा.अशफाक पटेल उपाध्यक्षपदी काजल फुलसुंदर, अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, कार्यवाह अशोक कोरडे यांची निवड
नारायणगाव | महाराष्ट्र पातळीवर कार्यरत असणार्या महाराष्ट्र पत्रकार संघाची “जुन्नर तालुका कार्यकारिणी” पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सचिव शेखर सुर्यवंशी, राज्य संघटक शिरिष कुलकर्णी, सरपंच योगेश पाटे, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, अशोक पाटे, आरिफ आतार, सचिन खैरे, अनिल खैरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच जाहिर करुन पदाधिकार्यांना कार्ड व नियुक्तीपत्र प्रदान सोहळा नारायणगाव मुक्ताई मंगल कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा प्रतिनिधी म्हणुन अँड.कुलदिप नलावडे, किसन गावडे, जुन्नर तालुका अध्यक्षपदी शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक प्रा.अशफाक पटेल, उपाध्यक्षपदी कालज फुलसुंदर, अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, कार्यवाह अशोक कोरडे, सहकार्यवाह अरुण मोरे, किरण पाडेकर, संघटक अभय वारुळे, गणेश मोढवे, खजिनदार संतोष हाडवळे, सहखजनिदार राजेंद्र खेत्री, तुषार आंधळे, संपर्कप्रमुख आकाश डावखरे, सहसंपर्कप्रमुख सतिश पाटे, प्रसिद्धीप्रमुख स्वप्निल ढवळे, सुधाकर सैद, विजय चाळक, सचिन भोर, रामदास सांगळे, प्रेस फोटो- व्हिडिओग्राफर अलिअहेमद चौगुले, सचिन संते, राजेश आमले, ऋषिकेश कुर्हाडे, तवस्सुल अहेमद सय्यद, कायदेशीर सल्लागार अँड.केतनकुमार पडवळ, अँड.सुनिता चासकर, मार्गदर्शक म्हणुन डाॅ.मिलिंद कसबे, डाॅ.संदिप काकडे, डाॅ.मिनाक्षी काकडे या पदाधिकार्यांसह सदस्यपदी दर्शन फुलपगार, शितल नलावडे, सना पटेल, मनिषा औटी, भारती हांडे, धनश्री कडाळे, प्रतिक्षा चौधरी, मनिष गडगे, मंदार अहिनवे, किशोर वारुळे, शरद शेळके, गणेश चोरे, राहुल औटी, पोपट बढे, विनोद रायकर, मंगेश शेळके, प्रविण कांबळे, मिलिंद खेत्री, कार्तिकेश चौधरी, नवरोज सय्यद, आकाश रायकर यांची नियुक्ती करत ५४ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
या सोहळ्याचे प्रास्ताविक जुन्नर तालुका अध्यक्ष प्रा.अशफाक पटेल यांनी करत पत्रकार संघामार्फेत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणार असल्याचे सांगतिले. यानिमित्ताने जिल्हा प्रतिनिधी अँड.कुलदिप नलावडे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन डेरे, सदस्य मनिषा औटी, सचिन डेरे, आकाश डावखरे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिचय करुन देत कार्यकारणी सुरु केल्याबद्दल आभार मानले. यावेऴी सरपंच योगेश पाटे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा देत अभिनंदन केले. तसेच राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करत कार्यकारिणीला सुचना दिल्या. या सोहळ्याचे सुत्रसंचालन संघटक गणेश मोढवे यांनी तर आभार सहसंपर्कप्रमुख सतिश पाटे यांनी मानले.