आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सजग वेब टीम, प्रमोद दांगट – आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील निगडाळे,भागीतवाडी,राजेवाडी,तळेघर,राजपूर आदी जिल्हा परिषद प्राथमिक,शासकीय आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयांत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी शाळांमध्ये दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रभातफेरी,बालसभा,ग्रामस्वच्छता अशा विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.
निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. प्रभातफेरी,बालसभा,अहिंसा शपथ,ग्रामस्वच्छता अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.सुरुवातीला स्वच्छता प्रभातफेरी काढून ग्रामस्थांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ ची जनजागृती करण्यात आली.त्यानंतर शाळेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.‘रघुपती राघव राजाराम…’ हे भजन व सर्व धर्म प्रार्थनेचे गायन करण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कुऱ्हाडे,सुनिल लोहकरे,प्रदीप कुऱ्हाडे,अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे,मदतनीस लीलाबाई लोहकरे,विद्यार्थी उपस्थित होते.शाळेत आयोजित केलेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी यश कुऱ्हाडे होता.यावेळी श्रेया लोहकरे,साहिल लोहकरे,ऋतुजा भोमाळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.विद्यार्थी सुमित लोहकरे याने महात्मा गांधी यांची वेशभूषा केली होती.शांती, सद्भाव आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शपथ घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिर,ग्रामपंचायत,अंगणवाडी,शाळा परिसरात स्वच्छता केली.आभार संतोष थोरात यांनी मानले.युवा कार्यकर्ते निलेश लोहकरे यांच्या वतीने खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .
भागीतवाडी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.विदयार्थी छाया लांघी,शिवम भालेराव,समीक्षा कोळप यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनपरिचय आपल्या भाषणातून उलगडून सांगितला.यावेळी उपशिक्षिका सविंद्रा कोळप यांनी बालसभेला उद्बोधित केले.याप्रसंगी अंगणवाडी शिक्षिका सुलाबाई कोळप,पोलिस पाटील दत्तात्रय बेंढारी,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मारूती उंडे,रुख्मिणी भागीत उपस्थित होते.मुख्याध्यापक मंगेश बुरुड यांनी आभार मानले.
राजेवाडी शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिक्षणतज्ञ सरस्वती साबळे,मुख्याध्यापक यमना साबळे,पदवीधर शिक्षक लहू घोडेकर,एकनाथ मदगे व संदीप माळी तसेच विदयार्थी उपस्थित होते.
तळेघर शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक बुधाजी पारधी,सावळेराम आढारी,किसन केंगले,मनोहर थोरात,विद्यार्थी उपास्थित होते

Read more...
Open chat