आमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेना प्रवेश

जुन्नर | मनसेचे एकमेव आमदार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांची उद्या सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पुन्हा शिवसेनेत घरवापसी होत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेना भवन येथे शक्तिप्रदर्शन करत ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३वा वर्धापन दिन पार पडला आणि त्यांनंतर आलेली हि बातमी म्हणजे मनसेला मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनंतर मनसे चा एकमेव आमदारही आता शिवसेनेच्या गळाला लागला आहे.

बरोबर ५ वर्षांपूर्वी २०१४ साली आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत मनसेचे विद्यमान सर्व आमदार पराजित झाले फक्त आ. सोनवणे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

शिवजयंती कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही भूमिपूजन कार्यक्रम पार पडले होते त्यावेळी राज ठाकरे यांचा फोटो फ्लेक्सबोर्ड वर नव्हता त्याचवेळी या प्रवेशाची कुणकुण लागली होती यामुद्द्यावरून सोशल मीडियावर वादही झाला होता.

Read more...

राज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक! घणाघाती भाषण.

राज ठाकरेंचा भाजपवर सर्जिकल स्ट्राइक! घणाघाती भाषण.

राज ठाकरेंच्या भाषणातील २९ महत्वाचे मुद्दे

सजग वेब टीम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच, नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासह राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी रोखठोक मतं मांडली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील २९ महत्त्वाचे मुद्दे :

१) मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही तरीही तेच ठरवतात की मी म्हणे लोकसभेच्या २ जागा मागितल्या, २ जागा मागितल्या. लोकसभेचं काय हे मी नंतर तुम्हाला सांगेन – राज ठाकरे

२) लोकांची स्मरणशक्ती कमी असते, अगदी वर्तमानपत्रातील लोकांना देखील आठवड्यापूर्वी काय घडलं हे आठवत नसतं. लोकांनी विसरून जावं हीच भाजप सरकारची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय काय करून ठेवलंय,ह्याची आठवण करून द्यायची आहे – राज ठाकरे

३) मी कोल्हापूरला जे बोललो त्यावर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या फुटत होत्या. नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली लावारीस मुलं वाट्टेल ते पसरवत होती. – राज ठाकरे

४) अनेक रिकामटेकडे युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तान मध्ये घुसलं पाहिजे अशा गप्पा सुरु होत्या, आणि हे बोलणारे कोण तर दिवाळीत फटाके फुटले तर घाबरणारी ही लोकं आणि निघाले युद्धाच्या गप्पा करायला – राज ठाकरे

५) अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. कॅरेवन ह्या मासिकावर १००० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणारे विवेक डोवल ह्यांची मुलं. अजित डोवालची मुलं पाकिस्तनी पार्टनर आहे, अरब पार्टनर आहे. हा पार्टनर चालतो का भाजपला?हा देशद्रोही नाही? – राज ठाकरे

६) नरेंद्र मोदी आणि त्यांचे भारतीय जनता पक्ष हे ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते? तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा? नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले? – राज ठाकरे

७) २७ डिसेंबर ला अजित डोवाल आणि पाकिस्तनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे बँकॉक येथे भेटले. काय झालं ह्या बैठकीत? – राज ठाकरे

८) पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवान मारले गेले, आणि आम्ही तरीही प्रश्न नाही विचारायचे? – राज ठाकरे

९) २०१५ ला कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या आधी मी बोललो होतो की हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. मी ज्योतिषी नाही पण भाजप काय काय करू शकते ह्याचा मला अंदाज आहे. राम मंदिरावरून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला, – राज ठाकरे

१०) पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील जर काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का? – राज ठाकरे

११) पुलवामा नंतर मोदी हसत खेळत शांतता पुरस्कार घ्यायला गेले होते. नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये जाऊन कशी भारतीयांची वाट लावली हे सांगणारं भाषण करून आले – राज ठाकरे

१२) सैन्याचं एक वैशिष्ट्य आहे की सैन्याला दिलेलं काम ते शांतपणे आणि चोखपणे करून येतात. सैनिक लढाई जिंकतात किंवा हरतात, ते फक्त योग्य माहितीच्या आधारावर. भारतीय हवाई दलाने त्यांचं काम उत्कृष्टपणे पूर्ण केलं. – राज ठाकरे

१३) ज्या वैमानिकांनी धाडसाने बालाकोट हवाई हल्ले केले, त्या वैमानिकांच्या कर्तृत्वावर शंका घेताय असं म्हणून की राफेल विमान असती तर परिस्थिती वेगळी असती. राफेल घ्या किंवा घेऊ नका, अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट का दिलं ह्याचं उत्तर द्या – राज ठाकरे

१४ ) काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत जितकी होती त्यापेक्षा आत्ता जास्त का आहे? काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का? – राज ठाकरे

१५)मोदी म्हणाले होते सीमेवरच्या सैन्यापेक्षा व्यापारी जास्त शूर आणि धाडसी असतो. हे बोलताना मोदींना लाज नाही वाटत? – राज ठाकरे

१६) मी आज एक गोष्टीची भीती व्यक्त करतोय, की निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल – राज ठाकरे

१७) राफेल व्यवहाराची कागदपत्र चोरीला जात आहेत, आधी सरकार मान्य करतं की चोरीला गेले, आणि आता म्हणाले कॉपी चोरीला गेली. आणि हिंदू वर्तमानपत्राच्या एन राम हे रोज त्या कागदपत्रातून गौप्य्स्फोट करत आहेत. आज त्यांच्यावर चोरीचा आळ घेत आहेत – राज ठाकरे

१८) भारतीय जनता पक्षाचं नशीब बघा, आज त्यांच्यावर ‘राम’ आणि हिंदू’ उलटला – राज ठाकरे

१९)२५ डिसेंबर २०१५ ला मोदींनी नवाझ शरीफ ह्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवला आणि पुढे ७ दिवसांत पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला. पुढे ३ महिन्यात ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या – राज ठाकरे

२०)उरी हल्ल्यानंतर उत्तराखंड, उत्तरप्रदेशच्या निवडणुका झाल्या, गुरुदासपूर हल्ल्यानंतर १० दिवसात दिल्ली निवडणुका झाल्या – राज ठाकरे

२१) डोकलाम येथील तणावानंतर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या ओरडत होत्या की चायनीज माल बंद करा. मग सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनून आला? आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर? आणि हे ठरवणार देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण ते? – राज ठाकरे

२२) ट्रोल करताना जर नीट टीका केली तर ठीक आहे पण उगाच शिव्या द्यायला लागले तर ट्रोलिंग करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा – राज ठाकरे

२३) राफेलची कागदपत्र चोरीला जातात, जुन्या चित्रपटात दाखवत होते ते खोटं वाटायचं, पण असली प्रकरणं बघता ते खरंच वाटायला लागलं – राज ठाकरे

२४)राम आणि हिंदू अंगावर आला, द हिंदू वर्तमानपत्राचा दाखला देत राज ठाकरेंचा मोदींवर हल्ला – राज ठाकरे

२५) 25 डिसेंबर 2015 ला नवाज शरीफला केक भरवला, पुढच्या 7 दिवसात 2 जानेवारीला पठाणकोट हवाईतळावर हल्ला झाला. केक बादला का? – राज ठाकरे

२६) मुद्द्याला मुद्दा असेल तर चालेल, थोडासा विरोध चालेल, पण आपल्याला शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारायचं – राज ठाकरे

२७) देशातील पत्रकाराला धोक्याची दिवस, गंमत म्हणून नव्हे तर गांभिर्याने घ्या – राज ठाकरे

२८)आपल्या पक्षाअंतर्गत निवडणुकीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, इतरांशी नव्हे, दोन देतो का , तीन देतो का असे करत नाही, तसे करायला मी काही प्रकाश आंबेडकर नाहीय – राज ठाकरे

२९ ) लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो सांगेन, तो तुमच्या, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा असेल, आचारसंहिता लागली की आपण भेटूच – राज ठाकरे

Read more...

खेड तालुक्यात दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मनसेची मागणी


सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर | राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांना शासनाने ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही.असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्दशनास आले आहे .सर्वच योजना लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत अजुनही पोहचलेल्या नाहीत .त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असुन शेतकरी आत्महत्या करीत आहेत .दुष्काळी योजना फक्त कागदावरच दिसत आहे .या बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे .शासन निर्णय लागु करण्यास मंजुरी देण्यात आली होती.त्यामुळे खेड तालुक्यात दुष्काळी योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे

जमीन महसुलात सुट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपाच्या विज बिलात ३३.५०% सुट,शालेय महाविद्यालयांचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता,आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची विज खंडीत न करणे तसेच शासनाच्या सर्व सवलती ज्या लाभार्थी शेतकरी यांना देण्यात आल्या आहेत,त्याची  सविस्तर लेखी माहिती लाभार्थ्यांच्या नावासह यादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात यावी.

तसेच ज्या ठिकाणी पाणीटंचाई आहे तेथील किती विहिरी अधिग्रहीत केल्या किती टँकर लावले याची सविस्तर माहिती द्यावी .तालुक्यातील एकुण जलसाठा व तालुक्यातील पशुधनास एप्रिल २०१९ पर्यंत पुरेल एवढा पुरेसा चार उपलब्धतेबाबत माहिती सुद्धा देण्यात यावी .दरम्यान तालुकाप्रशासनाने तालुक्यातील सगळ्या सार्वजनिक विहिरींचा गाळ काढावा व विहिरी दुरुस्त्या कराव्यात पाण्यांच्या योजनांच्या दुरुस्त्या कराव्यात टंचाईग्रस्त गावत ५००० लि.पाण्याची टाकी बसवावी . मनरेगा योजना प्रभावीपणे राबवावी.योग्य रितीने चारा पुरवठा करावा .अनुदानित अन्नधान्य साठी पात्र असलेल्यांना शिधापत्रिका त्वरित बनवुन द्यावी.दुष्काळी गावात अपंग ,विधवा ,निराधार ,वृद्ध ,अत्यंत पिडीत अश्या लोकांसाठी सामुहीक स्वयंपाक घर सुरु करण्यात यावे .अशी मागणी सुद्धा आम्ही करीत अहोत.तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या

तसेच गाई म्हशी विकत घेणे,शेळीपालन, कुक्कुटपाल,शेड –नेट हाऊस,पॉलीहाऊस,मिनी डाळ मिल ,पॅकिंग व ग्रेडिंग सेंटर,ट्रॅक्टर व अवजारे ,पॉवर टिलर या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती ७ दिवसांच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपलब्ध करून द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईल आंदोलन करेल असा इशारा  या निवेदनाव्दारे देण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष समिरभाऊ थिगळे,सुधीर बधे संघटक पुणे जिल्हा,मनोजदादा खराबी उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मंगेशभाऊ सावंत,उपाध्यक्ष पुणे जिल्हा संदीप पवार,अध्यक्ष खेड तालुका नितीन ताठे, सचिव खेड
तालुका विश्वास टोपे कामगार नेते तुषार बवले अध्यक्ष खेड तालुका मनवीसे,अतुलभाऊ मुळूक
मा अध्यक्ष खेड तालुका मनविसे मिनीनाथ ताम्हाणे उपाध्यक्ष खेड तालुका,महेश खलाटे उपाध्यक्ष खेड तालुका, सुजित थिगळे उपाध्यक्ष खेड तालुका, किशोर सांडभोर अध्यक्ष राजगुरुनगर शहर, सलीम सय्यद उपाध्यक्ष राजगुरूनगर शहर,विशाल कड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..

Read more...
Open chat