परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर 

डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more...

विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का ? त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील

“विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का ? त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा”

– आ. दिलीप वळसे पाटील

(निर्धार परिवर्तनाचा सभा, मंचर)

Read more...

युवक महोत्सव २०१९ भीमाशंकर करंडक चे विजेते ठरले ‘विशाल जुन्नर फार्मसी कॉलेज, आळेफाटा’

 

मंचर | डि.जी. फाऊंडेशन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पराग मिल्क फूड्स लि. आयोजित युवक महोत्सव २०१९
भीमाशंकर करंडक चे यावर्षीचे विजेते ठरले जुन्नर तालुक्यातील विशाल जुन्नर फार्मसी कॉलेज, आळेफाटा.

या युवक महोत्सवात ४० महाविद्यालयातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र लिमये, मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे व अभिनेत्री मालविका गायकवाड यांना निमंत्रित केले होते.

यावेळी उपेंद्र लिमये यांचे आगमन झाले त्यावेळी विशेष गोष्ट घडली. त्यावेळी जोगवा चित्रपटातील ‘लल्लाटी भंडार’ हे गीत सुरु होते. हे गीत म्हणत नाचत नाचत लिमये वळसे पाटील यांच्या समोर आले. वळसे पाटील यांनीही नमस्कार केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केल्याने व लिमये यांचा नाच सुरुच असल्याने हा मोह वळसे पाटील यांना आवरता आला नाही. त्यांनीही काही वेळ दोन्ही हात वर करून ताल धरला. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

दिलीप वळसे पाटील, किरण वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मालविका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांचा जल्लोष पाहून झालेला आनंद व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने गेली सात वर्ष युवक महोत्सवाचे आयोजन अॅड राहुल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली केले जाते. त्याचा फायदा अनेक मुले व मुलीना झाला असून त्यांना चित्रपट व अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. स्वतःच्या व इतर कुणाच्याही लग्नात मी आतापर्यंत कधीही नाचलो नाही. युवा पिढीचा उत्साह पाहून मी भरावून गेलो. जीवनात प्रथमच मी नाचून ताल धरला. असे सांगताना वळसे पाटील यांना आनंदा अश्रू लपवता आले नाहीत.

Read more...
Open chat