युवक महोत्सव २०१९ भीमाशंकर करंडक चे विजेते ठरले ‘विशाल जुन्नर फार्मसी कॉलेज, आळेफाटा’

 

मंचर | डि.जी. फाऊंडेशन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पराग मिल्क फूड्स लि. आयोजित युवक महोत्सव २०१९
भीमाशंकर करंडक चे यावर्षीचे विजेते ठरले जुन्नर तालुक्यातील विशाल जुन्नर फार्मसी कॉलेज, आळेफाटा.

या युवक महोत्सवात ४० महाविद्यालयातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र लिमये, मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे व अभिनेत्री मालविका गायकवाड यांना निमंत्रित केले होते.

यावेळी उपेंद्र लिमये यांचे आगमन झाले त्यावेळी विशेष गोष्ट घडली. त्यावेळी जोगवा चित्रपटातील ‘लल्लाटी भंडार’ हे गीत सुरु होते. हे गीत म्हणत नाचत नाचत लिमये वळसे पाटील यांच्या समोर आले. वळसे पाटील यांनीही नमस्कार केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केल्याने व लिमये यांचा नाच सुरुच असल्याने हा मोह वळसे पाटील यांना आवरता आला नाही. त्यांनीही काही वेळ दोन्ही हात वर करून ताल धरला. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.

दिलीप वळसे पाटील, किरण वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मालविका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांचा जल्लोष पाहून झालेला आनंद व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने गेली सात वर्ष युवक महोत्सवाचे आयोजन अॅड राहुल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली केले जाते. त्याचा फायदा अनेक मुले व मुलीना झाला असून त्यांना चित्रपट व अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. स्वतःच्या व इतर कुणाच्याही लग्नात मी आतापर्यंत कधीही नाचलो नाही. युवा पिढीचा उत्साह पाहून मी भरावून गेलो. जीवनात प्रथमच मी नाचून ताल धरला. असे सांगताना वळसे पाटील यांना आनंदा अश्रू लपवता आले नाहीत.

Read more...
Open chat