भागीतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)

भागीतवाडी (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आरोग्यसेविका शारदा उईके,आशासेवक उषा बेंढारी,मुख्याध्यापक मंगेश बुरुड,उपशिक्षका सविंद्रा कोळप,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.यावेळी सर्व विदयार्थ्याना जंतनाशक गोळया वाटप करण्यात अाल्या तसेच निरीक्षणाखाली सर्व मुलांनी गोळया खाल्ल्या.
शारदा उईके यांनी जंतनाशक गोळया का खायच्या,त्याचे महत्व सर्वांना सांगितले.शाळेचे मुख्याध्यापक मंगेश बुरुड यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनाची माहीती व महत्व सर्वाना सांगितले.
सविंद्रा कोळप यांनी सर्वाचे आभार मानले.

Read more...
Open chat