थापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी- महापौर राहुल जाधव

थापलिंग येथील बैलगाडा शर्यतीचा घाट बंद करणे दुर्देवी-महापौर राहुल जाधव

सजग वेब टिम – बाबाजी पवळे
नागापूर ( ता.आंबेगाव ) | श्री क्षेत्र थापलिंग खंडोबा या ठिकाणी बैलगाडा घाटा मध्ये पोलीस प्रशासनाने जेसेबीच्या साहाय्याने घाट खोदून बंद केलेली घटना दुर्देवी असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले दावडी (ता.खेड ) येथील सातपुते परिवाराने त्यांच्या लाडक्या बैलाच्या घातलेल्या दशक्रिया विधी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .

श्री क्षेत्र थापलिंग येथे बैलगाडा शर्यती दरवर्षीप्रमाणे फळी फोडण्याची तसेच नवसाचे बैलगाडे पळविण्याची परंपरा आहे,परंतु थापलिंग येथे बैलगाडा शर्यत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने जेसीबी घेऊन घाटच उकरून टाकला, ही दुर्दैवी बाब आहे मी सुध्दा एक बैलगाडा मालक असून बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले या वेळी मोठ्या संख्येने बैलगाडा मालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read more...
Open chat