आरटीआय कार्यकर्ते बाबाजी पवळे यांचा महाराष्ट्र ग्रामविकास पुरस्काराने गौरव
सजग वेब टीम, राजगुरूनगर
राजगुरूनगर | ग्रामविकास प्रतिष्ठान (महा.रा)या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.यावेळी माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बाबाजी पवळे यांच्या कामाची दखल घेत त्यांना साहित्यिक व कवी म.भा.चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय “महाराष्ट्र ग्रामविकास गौरव ” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
बाबाजी पवळे हे आरटीआय कार्यकर्ते असून अगदी तरुण वयापासून सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रात काम करत आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून सर्व समाजाच्या नागरिकांच्या न्याय व हक्कसाठी लढत आहेत तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोशल मिडिया व पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केला आहे.अतिशय “निर्भीड” पणे काम करणाऱ्या पवळे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे,विलास भोईर,सुभाष गोरडे,विलास शिंदे, रामदास दौंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.