पारगावचे युवा शेतकरी विकास चव्हाण यांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

 

बारामती – कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे यांच्या मार्फत दिला जाणारा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार काल जुन्नर तालुक्यातील पारगाव चे युवा शेतकरी विकास चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. बारामती येथे राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र सिंग शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. एकरी १३६ टन ऊस पिकवून विकास चव्हाण यांनी याआधीही आपली कृषी क्षेत्रातील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या कार्यक्रमाला राजेंद्र पवार(अध्यक्ष बारामती ऍग्रिकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट), सुनंताताई पवार, नवल किशोर राम(जिल्हाधिकारी), बनसोडे साहेब (प्रकल्प संचालक, आत्मा), झेंडे साहेब (विभागीय कृषी सहसंचालक), देशमुख साहेब (आत्मा) यांसह शेतकरी आणि स्थानिक नागरिकांची विशेष उपस्थिती होती.

Read more...
Open chat