आम्ही जुन्नरकर आणि अतुल बेनके यांच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद


– तब्बल तीन हजार जणांची नावनोंदणी, एक हजारहून जास्त जणांची जागेवरच नोकरीसाठी निवड

नारायणगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके आणि ‘आम्ही जुन्नरकर’ सामाजिक संस्था यांच्या वतीने नारायणगाव येथे आयोजित नोकरी महोत्सवाला सुशिक्षित युवक-युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात जवळपास ३००० युवक-युवतींनी आपली नाव नोंदणी केली तर १००० हून अधिक जणांना मुलाखत घेऊन जागेवरच विविध कंपन्यांकडून ऑफर लेटर देण्यात आले. उर्वरित युवक-युवतींना देखील तातडीने पुढील काळात शैक्षणिक पात्रता आणि कंपन्यांचे नियमानुसार नोकरी देण्यात येणार आहे. या महोत्सवात बोलताना अतुल बेनके म्हणाले की “हा महोत्सव म्हणजे केवळ सुरुवात आहे. आज पासून माझ्या कार्यालयात ‘रोजगार’ या विषयाशी संबंधित स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे त्यात वर्षभर विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यापुढील काळामध्ये केवळ शेतीवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड होणार आहे. त्यामुळे युवकांनी उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याच्या हेतूने स्वतःचे घर,गाव सोडून ज्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील तेथे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेत मी स्वतः आणि ‘आम्ही जुन्नरकर’ फाउंडेशन यांचे सहकार्य आपल्याला नेहमी राहील”.

यावेळी प्रमुख पाहुणे मा.आमदार विलास लांडे यांनी देखील युवक-युवतींना स्वतःचा एक हॉटेल व्यावसायिक ते आज यशस्वी उद्योजक असा प्रवास सांगितला, यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, जि.प. सदस्य अंकुश आमले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुक्याचे प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, मा.जि.प. सदस्य बबनराव तांबे, कार्याध्यक्ष तुषार थोरात, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, रमेश भुजबळ, अरुण पारखे, युवक चे अध्यक्ष सुरज वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

रोजगाराच्या निमित्ताने ज्या गरजूंना प्रत्यक्ष अतुल बेनके यांना भेटायचे असल्यास दर गुरुवारी दुपारी २.०० ते ५.०० या वेळात अतुल बेनके यांच्या कार्यालयात ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read more...

आम्ही जुन्नरकर व अतुल बेनके यांच्या पुढाकाराने भव्य नोकरी महोत्सवाचे नारायणगाव येथे आयोजन

आम्ही जुन्नरकर व अतुल बेनके यांच्या पुढाकाराने भव्य नोकरी महोत्सवाचे नारायणगाव याठिकाणी आयोजन

सजग वेब टीम

नारायणगाव | आम्ही जुन्नरकर सामाजिक संस्था व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन नारायणगाव याठिकाणी करण्यात आले आहे.
हा महोत्सव रविवार दि.२७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.०० वा. सुरू होणार असून नारायणगाव येथील ब्लूमिंगडेल_हायस्कूल, पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी याठिकाणी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी खालील अटी आणि पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा:- १८ ते २५ वर्षे
शैक्षणिक पात्रता- दहावी पास, बारावी पास, ITI, MCVC, डिप्लोमा व पदवीधर व इतर

तसेच उमेदवारांसाठी नाव नोंदणीसाठीची मुदत
२५ जानेवारी २०१९ सायं ०५.०० वाजेपर्यंत आहे. तसेच दूरच्या उमेदवारांनी दूरध्वनीवरून ९९६५३४४११० या क्रमांकावर फोन करून नोंदणी करावी.

कॅन्टीन आणि ट्रान्सपोर्ट सुविधा
(कंपनी नियमानुसार)

मुलाखती झाल्यानंतर पात्र उमेदवाराची जागेवरच निवड करण्यात येईल.

या महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अशी माहिती नोकरी महोत्सवाच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.

जुन्नर तालुक्यातील युवक युवतींसाठी हा महोत्सव म्हणजे रोजगार आणि प्रशिक्षण सुवर्णसंधी घेऊन आला आहे.
त्याचा इच्छूकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या करिअरसाठी योग्य दिशा मिळवण्यासाठी, स्वावलंबी बनून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अतुल बेनके आणि आम्ही जुन्नरकर सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more...
Open chat