प्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार

प्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार 

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव (दि.११) | नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी या गावातील मनिषा कैलास शेळके यांचे सर्व कुटुंब (एकूण ९ रुग्ण) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सर्व कुटुंबियांना लेण्याद्री कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यातच दुर्दैवाने शेळके यांच्या सासू लक्ष्मीबाई सखाराम शेळके वय ८५ वर्षे रा. धनगरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला.

प्राथमिक अंदाजानुसार त्या सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय असून त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कुणीही कौटुंबिक सदस्य नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनालाच पुढाकार घ्यावा लागला. नारायणगाव पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत धनगरवाडी व आरोग्य विभाग यांच्या वतीने आजींचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी सपोनि अर्जुन घोडे पाटील, नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ व आरोग्य विभागाचे कर्मचारी व सरपंच शेळके ताई, ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके आदी उपस्थित होते.

रुग्ण आढळलेल्या ठिकाणी योग्य उपाय योजना करून सर्व परिसर निर्जंतुक करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले आहे.

Read more...

ग्रामपंचायत नारायणगावचे महावितरण कंपनीस विविध मागण्यांबाबत निवेदन

ग्रामपंचायत नारायणगावचे महावितरण कंपनीस विविध मागण्यांबाबत निवेदन

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव विद्युत वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय शहरापासून लांब असल्याने नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये विद्युत कर्मचारी उपस्थित ठेवणे, तसेच विद्युत तारांच्या धोकादायक जाळ्यांमुळे दुर्घटना टाळण्यासाठी एअरबंच केबल संपूर्ण शहरात टाकणे व विकास कामात अडथळे निर्माण होणाऱ्या डीपी काढणे या विविध मागण्यांबाबतचे निवेदन नारायणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने अधिक्षक अभियंता यांना देण्यात आले.

नारायणगाव हे लोकसंख्येने व क्षेत्रफळाने मोठे शहर असल्याने नारायणगाव मधील वीज ग्राहकांची संख्या मोठी आहे. लॉकडाऊन मुळे तीन महिन्यांचे वीजबिल एकरकमी आल्याने वीज ग्राहकांची तारांबळ उडाली आहे. वीज बील शंका निरसणासाठी ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिला यांना दूरवर असलेल्या विद्युत कार्यालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे वीज ग्राहकांच्या वीजबिलबाबतच्या शंका निरसणासाठी नारायणगाव ग्रामपंचायतीमध्ये महावितरणचे २ कर्मचारी उपस्थित ठेवण्यात यावे, तसेच नारायणगाव शहरांमध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारांचे धोकादायक जाळे निर्माण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी तारा लोंबकळत आहे. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी संपूर्ण नारायणगाव शहरात एअरबंच केबल टाकण्यात यावी व आठवडे बाजार, मुक्ताबाई देवस्थान व इतर ठिकाणी विकास कामात अडथळा निर्माण होणाऱ्या डीपी इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, विघ्नहरचे संचालक संतोषनाना खैरे, लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी माननीय अधिक्षक अभियंता पुणे ग्रामीण राजेंद्र पवार यांना देण्यात आले.

यावेळी विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पवार साहेब, ग्रामपंचायत सदस्य राजेश (भैय्या) बाप्ते, सामाजिक कार्यकर्ते अजित वाजगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. माननीय अधिक्षक अभियंता श्री.पवार साहेब यांनी वरील मागणींचा सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.

Read more...

छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक – प्रा. नितीन बानुगडे  

छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक – प्रा. नितीन बानुगडे  

शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी शिवरायांचा पराक्रमांचा उलगडला इतिहास

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव दि.१३ | छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक होते असे प्रतिपादन शिवव्याख्याते  नितिन बानुगडे यांनी केले. नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात प्राध्यापक नितिन बानुगडे यांनी आपल्या शिव विचारांमधून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमांचा उलगडा केला. गेली सतत तेरा वर्ष प्राध्यापक बानुगडे हे नारायणगाव येथे शिवव्याख्यान करीत आहेत.

यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

यामध्ये पत्रकारिता पुरस्कार प्रा.अशफाक पटेल, कृषी उद्योजक सुरज औटी, डॉ. अनुष्का शिंदे, वन कर्मचारी धोंडू कोकणे, वन मित्र जालिंदर कोरडे , कृषी मित्र सुजित पाटे, मंगेश भास्कर, कबड्डीपटू मनोज बोंद्रे, सरपंच ज्योती वामन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास राजे थोरात, व सूर्या अकॅडमी यांना सन्मानित करण्यात आले.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश उर्फ बाबू पाटे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शंकर शेठ पिंगळे व संचालक मंडळ, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, संतोष नाना खैरे, उद्योजक संजय वारुळे, सुजित खैरे शरद चौधरी, अर्चना माळवदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर औटी, मेहबूब काझी, आशिष माळवदकर यांनी केले. तर आभार अजित वाजगे यांनी मानले.

Read more...

जे इतरांना जमलं नाही ते बाबूभाऊंनी करून दाखवलं

भाजी विक्रेत्या महिलांकडून स्वच्छतागृहाच्या कामाबद्दल सरपंचांचे कौतुक

राजेशिवछत्रपती प्रतिष्ठानकडून महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड वाटप.

सजग वेब टिम, नारायणगाव

नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जाहीरनाम्यात दिलेला शब्द आता पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अखेर लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबुभाऊ) पाटे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मार्गी लावलाय. महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्वच्छतागृहाच्या कामाचे भुमिपूजन पुर्व वेशच्या मागील बाजूस करण्यात आले. शनिवार बाजारतळ याठिकाणी उभारलेल्या स्वच्छतागृहाच्या नंतर आता या आणखी एका स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने नारायणगाव भाजी बाजार संघटनेच्या महिलांनी सरपंचांचे कौतुक केले आहे. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की “जे इतरांना जमले नाही ते बाबुभाऊंनी करुन दाखवले” असे सांगत महिलांनी सरपंच योगेश पाटे यांचे कौतुक केले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, राजेश बाप्ते, सारिका डेरे, रुपाली जाधव, मेहबुब काझी, दिपक वारुळे, निलेश दळवी, मयुर विटे, सचिन जुंदरे, प्रा.अशफाक पटेल, संतोष विटे, यांसह मुक्ताई भाजी बाजार संघटनेच्या महिला, सभासद व ग्रामपंचायतच्या महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातुन भाजी बाजारासह गावातील व्यावसायिक महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Read more...

ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल चा इ.१०वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा १००% निकाल

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील नावाजलेली ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित, ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कुल नारायणगाव या शाळेचा पाचव्या बॅच चा इयत्ता १० वी आय.सी.एस.ई. बोर्डाचा यंदाच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाचा १००% निकाल लागला आहे. शाळेने १००% निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण ३९ विद्यार्थी बसले होते. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील हि एकमेव आय.सी.एस.ई. बोर्डाची शाळा आहे.

विविध शालेय उपक्रम आणि मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊन त्यांच्या अभ्यासक्रम तसेच इतर विषयांतील गुणात्मक वाढीवर आमचा भर असतो. शाळेच्या एकंदरीत कामकाजातील सुसुत्रता आणि योग्य व्यवस्थापन यामुळेच शाळेची प्रगती चांगल्या गतीने सुरू आहे यापुढेही शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने प्रयत्नशील आहोत अशी माहिती संस्थेच्या विश्वस्त गौरी बेनके यांनी दिली आहे.

ब्लुमिंगडेल स्कुल मधील सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये पहिले पाच विद्यार्थी अनुक्रमे
अस्मिता अंजन नंदी( ९६.२०%),
स्वामी राजेंद्र शिंगोटे (९३.४०%),
वैष्णव विलास बाम्हणे (८९.८०%),
विपुल रामदास काळे (८७.८०%),
तेजस बाळासाहेब लामखडे (८७.८०%),
प्रथमेश मधुकर विभुते (८७.८०%),
प्रांजल नितीन तांबे (८५.८०%),
पर्णवी बाळासाहेब जाधव (८५.८०%),
स्वराज महेंद्र बारबुद्धे (८५.८०%)

यंदाच्या वर्षीही सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने पालक आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीने तसेच संस्थेचे अध्यक्ष वल्लभ बेनके, कार्याध्यक्ष अतुल बेनके तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी शिक्षक वर्गाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे तसेच सर्व पालकांचे आणि हितचिंतकांचे शाळा व्यवस्थापनाने आभार मानले आहेत.

Read more...

परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर 

डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more...

महिला आरोग्य जागृतीसाठी सामाजिक संस्थांनी एकत्र यावे – ला.ओमप्रकाश पेठे

नारायणगाव | समाजातील महिलांच्या आरोग्यासाठी सर्व सामाजिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न करून महिलांमधील वाढत्या कर्करोगा विरूद्ध सामुहिक कार्य करणे आवश्यक आहे असे मनोगत लायन्स क्लब पुणे डिस्ट्रिक्ट चे ईलेक्ट प्रांतपाल ला. ओमप्रकाश पेठे यांनी व्यक्त केले.
ग्रामोन्नती मंडळाचे गुरूवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर माता पालक संघ,लायन्स क्लब आॅफ जुन्नर शिवनेरी,लायन्स क्लब आॅफ पुणे, प्रशांती कॅन्सर केअर मिशन पुणे,प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने महिला आरोग्य तपासणी व स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रविंद्र वाघोले व लायन्सचे अध्यक्ष शिरीष जठार यांनी दिली.

शिबीराचे उद्घाटन ईलेक्ट प्रांतपाल ला. ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डाॅ.वर्षा गुंजाळ,माजी जि.प.सदस्या राजश्री बोरकर,डाॅ.पल्लवी राऊत, लायन्स क्लब पुणेचे अध्यक्ष ला.संजय सोनीस,अध्यक्ष शिरीष जठार,ला.श्रद्धा पेठे,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे,मुख्याध्यापक रविंद्र वाघोले,पर्यवेक्षिका रंजना बो-हाडे,पालक संघाचे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ,उपाध्यक्षा प्रतिभा गावडे,सचिव अनुपमा पाटे,मेहबूब काझी,राहूल नवले,ला.नरेंद्र गोसावी,संजय शिंदे,संदिप मुथ्था,अंजली गुंजाळ,शितल जठार,तृप्ती जुन्नरकर,लायन्स क्लब व पालक संघाचे सर्व पदाधिकारी,महिला मोठ्या संख्येने हजर होते.
या शिबिरामध्ये 120 महिलांची तपासणी करण्यात आली.शिबिरात रक्तदाब,रक्तगट,हिमोग्लोबीन,लिपीड प्रोफाईल तसेच स्तन कर्करोग प्राथमिक तपासणी व प्रबोधन करण्यात आले.
तपासणी कामी मंचर येथील महालॅबचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक रविंद्र वाघोले यांनी केले.सुत्रसंचालन अनुपमा पाटे व मेहबूब काझी यांनी केले.व आभार ला.गणेश देशमुख यांनी मानले.

Read more...

स्वागत सभेत अमोल कोल्हे उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचे लागले लक्ष

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर : शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे लगेच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शिरूर मतदारसंघासाठीचा विधानसभास्तरीय मेळावा उद्या दुपारी २.०० वा. नारायणगाव याठिकाणी तर सायं. ०५.०० वा. भोसरी याठिकाणी होत असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

या स्वागत मेळाव्यात उद्या ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या चित्रीकरणासाठी कोल्हे यांना करावा लागलेला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि त्या संदर्भातील काही मुद्दे राजकिय आणि सामाजिक वर्तुळात सध्या चर्चेत आहेत. याच मालिकेवरून शिवसेनेतील काही नेते आणि पुणे जिल्ह्यातील एका महत्वाच्या खासदार व्यक्तीचे नाव न घेता त्यांनी केलेली टिका आणि वक्तव्ये यावर देखील ते प्रकाश टाकणार का? त्यांच्या स्वतःचे गाव नारायणगाव याठिकाणीच हि स्वागत सभा होत असल्याने कोल्हे या सभेत काय बोलणार याकडे राज्यातील सर्व राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले.

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मातब्बर नेते जिल्ह्यात येत असल्याने या दोन्ही ठिकाणच्या सभांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या महत्वाच्या दोन सभांमुळे शिरूर मतदार संघातील राजकिय वातावरण मात्र ढवळून निघणार आहे यात मात्र शंका नाही.

Read more...

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार झालेत ‘बळीचा बकरा’

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकीस्वार झालेत ‘बळीचा बकरा’
– कंत्राटदारांचा आणि प्रशासनाचा गलथनपणा नागरिकांच्या जीवावर

सजग वेब टीम, जुन्नर
नारायणगाव | नारायणगाव अंतर्गत पुणे नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे, काही ठिकाणी खडी पसरवून ठेवण्यात आली आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्र समोरील मूळ रस्त्याचा बराचसा भाग कामासाठी उकरून ठेवण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी कुठलाही सूचनादर्शक फलक ठेवण्यात आला नाहीये त्यामुळे नाशिक च्या दिशेने येणाऱ्या गाड्यांना मुख्यतः दुचाकीस्वारांना काम झालेल्या भागातील रस्त्यावरून जाताना त्याच लेन मध्ये काम सुरू असलेल्या उकरून ठेवलेल्या रस्त्यावरून जावे लागत आहे. अचानक गाडीचा वेग आणि तोल सांभाळताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.
याठिकाणी कुठलाही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही अथवा सुचनाफलकही नसल्याचे आढळून आले आहे.

काल याभागात जवळपास ७ जणांना गाडी घसरून दुखापत झाली असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सजग टाईम्स शी बोलताना सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते तुषार कोऱ्हाळे यांनी आणि याभागात राहणाऱ्या नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी ठेकेदार आणि प्रशासनाच्या या गलथनपणाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. जर कामाला उशीर लागणार होता तर रस्ता खोदण्याची घाई का केली आणि खोदल्यानंतर त्याठिकाणी सूचनाफलक का लावण्यात आला नाही असा सवाल नागरिक संबंधित प्रशासनाला विचारत आहेत.

आधीच बायपास चे रखडलेले काम, धुळीचा होणारा त्रास, ट्रॅफिक, रस्त्याच्या रुंदीकरणाचे संथ गतीने चाललेलं काम आणि त्यातच हे अपघात यामुळे प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्याविषयी जनतेच्या मनात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी नारायणगाव आणि वारुळवाडी गावच्या नागरिकांनी रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जावरून संबंधितांना धारेवर धरले होते. त्यांनंतरही संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडून बेजबाबदार वर्तन सुरूच असल्याचे दिसून येत आहे. काल झालेल्या अपघातांनंतर त्याठिकाणी अडथळे (बॅरिगेट्स) लावण्यात आले आहेत. विद्यमान खासदार आणि विरोधकांमध्ये बळीचा बकरा कोण ची चर्चा जोरात सुरू आहे परंतु यांच्या भांडणात नक्की कुणाचा बळी जातोय हे या अपघाताच्या घटनांमधून पाहायला मिळत आहे.

Read more...

शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्या -विश्वजित शिंदे

 

शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्या -विश्वजित शिंदे

सज वेब टीम

नारायणगाव | प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व द्यावे.खेळामुळे शरीर सुंदर व निरोगी होते,मन आनंदी राहते असे मनोगत आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू विश्वजित शिंदे यांनी व्यक्त केले.ग्रामोन्नती मंडळाच्या गुरूवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, उपकार्याध्यक्ष डाॅ.आनंद कुलकर्णी,कार्यवाह रविंद्र पारगावकर, उपकार्यवाह अरविंद मेहेर,जयश्रीताई खिलारी,याशिका शिंदे,डी.के.भूजबळ,एकनाथ शेटे,मुख्याध्यापक रविंद्र वाघोले,उपमुख्याध्यापक रमेश घोलप,बी.एफ.पावडे,पर्यवेक्षक रंजना बो-हाडे,दत्तत्राय कांबळे,अनुराधा पुराणिक,अनिल गायकवाड,शिक्षक प्रतिनिधी विजय कापरे, विद्यार्थी प्रतिनिधी नेहा ढोमसे,आदिती टाव्हरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वजीत शिंदे पुढे म्हणाले की शालेय जीवनात एन.सी.सी.मधूनच अनेक खेळाडू तयार होतात.कोणत्याही आवडीच्या खेळात आपण सतत सहभागी असले पाहीजे.सातत्य असेल तर यश नक्कीच मिळते नारायणगावसारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतात ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी अनिलतात्या मेहेर म्हणाले की आपल्या शिक्षकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा.ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमी आदर्श विचार देण्याचा प्रयत्न केला जातो.


यावेळी क्रीडासमुपदेशक जयश्रीताई खिलारी, नवोदित खेळाडू याशिका शिंदे,यांचेही भाषणे झाली.
याप्रसंगी आदर्श शिक्षक म्हणून क्रीडाशिक्षक भिमराव पालवे,विजय साबळे,शंकर केंगले, वनिता वायकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.तसेच सर्व राज्य व राष्ट्रीय खेळाडू व सर्व क्रीडा शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
ग्रामोन्नती मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध क्रीडास्पर्धेचे बक्षिस वितरणही या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र वाघोले यांनी केले.सुत्रसंचालन अनुपमा पाटे,मेहबूब काझी यांनी केले व आभार उपप्राचार्य बबन पावडे यांनी मानले.

Read more...
Open chat