जे इतरांना जमलं नाही ते बाबूभाऊंनी करून दाखवलं

भाजी विक्रेत्या महिलांकडून स्वच्छतागृहाच्या कामाबद्दल सरपंचांचे कौतुक

राजेशिवछत्रपती प्रतिष्ठानकडून महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड वाटप.

सजग वेब टिम, नारायणगाव

नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत जाहीरनाम्यात दिलेला शब्द आता पूर्ण होताना दिसत आहे. अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न अखेर लोकनियुक्त सरपंच योगेश (बाबुभाऊ) पाटे यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मार्गी लावलाय. महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्वच्छतागृहाच्या कामाचे भुमिपूजन पुर्व वेशच्या मागील बाजूस करण्यात आले. शनिवार बाजारतळ याठिकाणी उभारलेल्या स्वच्छतागृहाच्या नंतर आता या आणखी एका स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाल्याने नारायणगाव भाजी बाजार संघटनेच्या महिलांनी सरपंचांचे कौतुक केले आहे. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की “जे इतरांना जमले नाही ते बाबुभाऊंनी करुन दाखवले” असे सांगत महिलांनी सरपंच योगेश पाटे यांचे कौतुक केले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, सदस्य आरिफ आतार, राजेश बाप्ते, सारिका डेरे, रुपाली जाधव, मेहबुब काझी, दिपक वारुळे, निलेश दळवी, मयुर विटे, सचिन जुंदरे, प्रा.अशफाक पटेल, संतोष विटे, यांसह मुक्ताई भाजी बाजार संघटनेच्या महिला, सभासद व ग्रामपंचायतच्या महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातुन भाजी बाजारासह गावातील व्यावसायिक महिलांना महिला दिनाचे शुभेच्छा कार्ड देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Read more...

माध्यमांचे धडक प्रश्न बाबू पाटेंची बेधडक उत्तरे; नारायणगाव ग्रामपंचायत वर्षपूर्ती पत्रकार परिषद

सजग वेब टीम

नारायणगाव | नारायणगाव ग्रामपंचायत सत्ता बदल होऊन २३ फेब्रु.२०१९ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. नारायणगावच्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सरपंच योगेश पाटे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी विकास कामांच्या माध्यमातून आपले गाव स्वच्छ, समृद्ध, सुंदर आणि हरित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून गेल्या एक वर्षात ३ कोटी ४८ लाखांची विकासकामे केली असल्याची माहिती नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश बाबू पाटे यांनी वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केले.

नारायणगाव ग्रामपंचायतीच्या एक वर्षातील विविध विकासकामे व उपक्रमाची माहिती शनिवारी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी उपसरपंच संतोष दांगट, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आत्तार, विजय वाव्हळ, गणेश पाटे, राजेश बाप्ते, रामदास अभंग, संतोष पाटे, ज्योती दिवटे, सारिका डेरे, सुप्रिया खैरे, पुष्पा आहेर, संगीता खैरे, ग्राम विकास अधिकारी नितीन नाईकडे, सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते. मागील वर्षी २३ फेब्रुवारीला सरपंच योगेश पाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज २३ फेब्रुवारीपर्यंत पेव्हर ब्लॉक्स, काँक्रीटीकरण, शौचालय, बंदिस्त गटार पाईपलाइन, नवीन अंगणवाडी इमारत बांधकामे, खडीकरण, शेड बांधणे, संरक्षक भिंत उभारणे, पाणीपुरवठा टाकी, मोकाट डुकरांचा बंदोबस्त, जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक महोत्सव, स्व.साबीर भाई शेख ठिबक सिंचन योजना, प्लॅस्टिक बंदी मोहीम, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर स्मारक पाठपुरावा, हरित नारायणगाव होण्यासाठी १० हजार झाडे ५ वर्षात लावणार आहे. आदी ३ कोटी ४८ लाख ७१ हजार ८२९ रुपयांची विकास कामे या कालावधीत सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने केली असून या पुढील काळात गॅस शववाहिनी, घनकचरा व्यवस्थापन, सिव्हेज वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्‍ट, अद्ययावत शौचालये आदी उपक्रम आणि प्रकल्प राबविणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने ओला व सुका कचरा विभाजन करण्याच्यादृष्टीने नियोजन करणार आहेत. नारायणगावात १३२ सोसायट्या अनधिकृत आहेत. अनेक सोसायट्यांनी ग्रामपंचायतीचे पाणी, लाईट, लाईन आदी सुविधा घेतल्या असून महसूल जमा करीत नसल्याचे निदर्शनास आल्यास १ एप्रिलपासून त्यांना सुविधा बंद करण्यात येईल. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी पाटे यांनी दिला आहे.

दप्तर तपासणी अहवालात जे कुणी दोषी आढळतील कायद्यानुसार त्यांना शिक्षा होईल यासंबंधीची आमची भूमिका अजूनही तीच आहे. तसेच मुक्ताबाई देवस्थान ट्रस्ट शी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गावबैठकीच्या निर्णयानुसार लढा देऊ असेही पाटे यांनी यावेळी नमूद केले.

Read more...

नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा, जि. प. शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

नारायणगाव | ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने परिसरातील सर्व जि.प.प्राथमिक शाळांचा संयुक्त “नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव-२०१९” पूर्व वेस,नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.एकूण नऊ जि.प.शाळांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामाध्येच नारायणगाव परिसरातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्व.साबीरभाई शेख ठिबक सिंचन अनुदान वाटपाचे लकी ड्रो कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती सरपंच श्री.योगेश बाबु पाटे व उपसरपंच संतोष दांगट यांनी दिली.


महोत्सवाचे उद्घाटन जुन्नर पंचायत सामितीचे गटविकास अधिकारी श्री.विकास दांगट आणि सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे,गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,बाळासाहेब पाटे,एकनाथ शेटे,सुजित खैरे,आशिष माळवदकर,डॉ.संदीप डोळे,शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे,उपसरपंच संतोष दांगट, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ,शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

‘चौदाव्या वित्त आयोगातून प्राथमिक शाळांच्या उन्नती,विकास कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व वित्तीय आराखड्यास पंचायत समिती जुन्नर कार्यालयाकडून परवानगी दिली जाईल तेसच ठिबक सिंचन योजनेला ग्रामपंचायत अनुदान इतकेच अनुदान पंचायत समिती जुन्नर मार्फत देण्यात येईल असे मनोगत गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती जुन्नरचे गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे यांनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महोत्सवामुळे जि.प.प्राथमिक शाळांना सांस्कृतिक महोत्सवामुळे जि.प.प्राथमिक शाळांना सांस्कृतिक मंच उपलब्ध झाला असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन व समाज यांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे सांगितले.

सरपंच योगेश पाटे यांनी परिसरातील सर्व जि.प.प्राथमिक शाळांचा विकास आराखडा पंचायत समिती जुन्नर सर्व अधिकारी,शिक्षक आणि समाजातील शिक्षण प्रेमी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने तयार करून गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक वातावरण ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले.
या प्रसंगी यशवंती मेश्राम,संतोषनाना खैरे,यांचेही भाषण झाले.

सर्व सहभागी शाळा विद्यार्थीनी ग्रामपंचायतच्या वतीने स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले तसेच तसेच मान्यवरांच्या हस्ते साबीरभाई शेख ठिबक सिंचन योजने अंतर्गत जाहीर झालेला उस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवाकामी विशेष परिश्रम घेणाऱ्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान सरपंच योगेश पाटे व उपसरपंच संतोष दांगट यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खैरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर औटी यांनी मानले.

Read more...
Open chat