नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरण होणार?

नगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरण होणार?

सजग वेब टीम

मुंबई | पुणे जिल्हा व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारा माळशेज घाट हा कोकण व देशाला जोडणारा एक महत्वाचा घाट आहे.नगर कल्याण महामार्गावर असणाऱ्या या घाटाचे अमोघ सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते.सम्पूर्ण राज्यभरातून पर्यटक पावसाळ्यात येथे वर्षविहारासाठी येत असतात.
परंतु अरुंद रस्ता अन कोसळणाऱ्या दरडी या मुळे माळशेजघाटात होणाऱ्या अपघातांची संख्याही प्रचंड मोठी आहे.काही वर्षांपूर्वी झालेला एस टी अपघात आपणा सर्वांना ज्ञात आहेच.
परंतु आता माळशेज घाटाचे रुंदीकरण होणार असल्याची माहिती समोर येते आहे.24 जानेवारी 2019 रोजी पुरुषोत्तम पाटील क्रीडा नगरी (भिवंडी) येथे या रस्त्याच्या भूमीपूजनाचा समारंभ संपन्न होतो आहे.माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
माळशेज घाटामध्ये किमी 84.000 ते किमी 101.000 लांबीच्या अंदाजे 7.50 किलो मीटर लांबीच्या बोगद्याचे व घाटरस्त्याचे चौपदरीकरण होणार आहे अशी माहिती वृत्तपत्रात भूमीपूजनाच्या जाहिराती मार्फत प्रदर्शित करण्यात आली आहे.
जर माळशेज घाटाचे चौपदरीकरण झाले तर कल्याण नगर महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब ठरणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)

Read more...
Open chat