शिवाजी विद्यालय धामणीच्या एस.एस.सी.१९८४च्या बॅच चा स्नेह मेळावा संपन्न

सजग वेब टीम, आंबेगाव ( आकाश डावखरे)

मंचर | दिनांक १६-०५-२०१९ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत एस.एस.सी.परीक्षा सन मार्च १९८४ दिलेले अ व ब तुकडीतील विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ३५ वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर सर्व जुने मित्र/मैत्रिणी आज शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.०० वा. हजर झाले होते.सर्वांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. एकमेकांच्या गळाभेटी,हस्तांदोलन करुन सर्व जण What’s I gain and What’s I loss आठवून बालपणीच्या पूर्व स्मृतींना उजाळा देत होते. अतिशय आनंददायी प्रसन्न वातावरणात सर्वांना आपले जिवलग मित्र/मैत्रिणी भेटल्यामुळे सर्वजण अतिशय आनंदी होते. सर्वांना अप्रतिम अल्पोपआहार व थंडगार लिंबू सरबताची व्यवस्था केली होती. सर्वांनी इडली,उपीट,रवा,व फलआहार याचा येथेच्छ आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत विद्येची देवता सरस्वती,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक/अध्यक्ष निवड दगडू वेताळ यांनी केले.प्रकाश शेवाळे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षस्थांनी मा,श्री.किसन रत्नपारखी सर होते. प्रथम सर्व दिवंगत मित्र व दिवंगत शिक्षक यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर शिक्षक कानडे सर, गाढवे सर, कर्णे मॅडम, रत्नपारखी सर, प्राचार्य मेंगडे सर, मोहिते सर, विधाटे मामा,चंद्रकांत बोऱ्हाडे मामा, सिनलकर सर,चव्हाण सर, कोळी सर यांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प व टायटन चे घड्याळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.त्यानंतर सर्वांचा परिचय करुन देण्यात आला.त्याननंतर आदरणीय कर्णे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करुन १९७९ पासूनचा धामणी ते साधना विद्यालय संपूर्ण जीवन वृतांत उभा केला.सरांच्या आठवणीने मॅडम खूपच भावनाविवश झाल्या होत्या. सर्वांना अश्रू अनावर झाले होते. मॅडम ची मुले,मुली उच्च विद्या विभुषित असून मुलगा निष्णात हृदयविकार तज्ञ आहे. कन्या स्विटीही निष्णात डॉक्टर आहे. धामणी मध्ये नोकरीचा श्रीगणेशा करून आत्तापर्यंत सर्व काही भरभरुन मिळाले. फक्त सरांची उणीव जाणवते. सरांच्या स्मरणार्थ मॅडम ने इ.१२वी गणित विषयामध्ये प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्यासाठीचा धनादेश सुपूर्द केला. सदर रक्कम कायमस्वरुपी बँकेत ठेव म्हणून ठेऊन त्यातून येणाऱ्या व्याजातून गणित विषयात प्रथम येणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत सुचविले. त्यानंतर कानडे सरांनी मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गाढवे सरांनी मनोगत व्यक्त करुन पूर्व स्मृतींना उजाळा दिला.सर्वांना शुभेच्छा दिल्या, प्राचार्य मेंगडे सर यांनी आत्तापर्यंतचा जीवनवृतांत कथन करुन संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ताविषयक विविध उपक्रमांची माहिती दिली.शाळेसाठी आवाश्यक भौतिक सुविधांसाठी ऐच्छिक यथाशक्ति खारीचा वाटा उचलण्याबाबत आवाहन केले व एकूण बारा वर्गांसाठी डायस देण्याबाबत सुचविले.त्यानंतर हरहुन्नरी,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व संस्थेच्या पश्चिम विभागाचे इन्स्पेक्टर रत्नपारखी सर यांनी सन १९८१ते १९८४ चा जीवनवृतांत कथन केला व पूर्व स्मृती जागृत केल्या.कला,क्रीडा अंतर्गत राबविलेले उपक्रम त्यातून मिळालेले बळ व प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे मिळालेले फळ,मुले,मुली उच्च विद्या विभुषित असल्याचे आवर्जुन सांगितले. शालेय स्नेह संमेलनात व परिसरातील यात्रेत त्यांनी व विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिनयाचा आवर्जुन उल्लेख केला. विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळविणारे व यशस्वी विद्यार्थी भेटल्यामुळे भरुन पावलो. तुमच्यामुळे आम्हीं आहोत असे सांगितले.चांगल्या कामाचे फळ चांगले मिळते. यथाशक्ति ऐच्छीक मदत करुन आपला खारीचा वाटा उचलण्याबाबत आवाहन केले.व सर्वांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकास्थित आत्माराम विधाटे यांच्याशी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी लाईव्ह संवाद साधला. त्यानंतर गजानन पुरी ,दगडू वेताळ,कल्पना जाधव,रवि दौंडकर,संगिता जाधव,शकुंतला हिंगे,धनाप्पा हाटकर,रंजना दहिवळ,माऊली जाधव यांनी मनोगत व्यक्त करुन आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.आपण इथपर्यंत पोहचून यशस्वी होण्यामागे आपले सर्व गुरुजन असल्याचे सर्वांनी आवर्जून सांगितले. सुर्यवंशी सर, सोमवंशी सर,कर्णे मॅडम, गाढवे सर, कानडे सर,रत्नपारखी सर,पवार सर, कर्णे सर,यांचा आवर्जुन उल्लेख केला.व आपल्या जडणघडणीत सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले,शिवराम दौंडकर आपल्या शालेय जीवनातील अनेक किस्से सांगितले व आपण यशस्वी उद्योजक कसे झालो.या बाबत अनुभव कथन केले व पुढील भेटीत शाळेस पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देणार असल्याचे जाहिर केले.उपस्थित सर्वांनी आपला यथाशक्ति निधी रोख स्वरुपात जमा केला.भगवान बढेकर, हनुमंत विधाटे, संजय विधाटे, गुलाब वाघ, बाळासाहेब बढेकर,रोहिदास लोंढे,सुभाष तांबे, गजानन भुमकर,मिना जाधव,कल्पना जाधव,शोभा जाधव,शशिकला शिंदे,शकुंतला हिंगे, सुनिल विधाटे, शशिकांत देशमुख, सुरेश पवार,दिलीप पाटोळे, फकिरा पिंगळे, शशिकांत जाधव, तानाजी दाते, सुभाष जाधव, दिलीप पंचरास, विनायक सासवडे,भगवान बढेकर, शिवराम दौंडकर, प्रकाश शेवाळे, माऊली जाधव, दगडू वेताळ, पाटीलबुवा जाधव, विठ्ठल विधाटे, धनाप्पा हाटकर, अशोक बढेकर, रामदास बढेकर, राजेंद्र जाधव, विठ्ठल जाधव, लांबहाते स्वप्निल आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश शेवाळे,शकुंतला हिंगे,सुभाष तांबे यांनी अतिशय परिश्रम घेऊन उत्कृष्ट नियोजन केले होते. न भूतो न भविष्यती कार्यक्रम झाला.माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली.शाळा शिकताना तहान भूक हरली.अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती. एक दिसाची रंगत संगत अखंड आपली मैत्री आपण आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहून मनसोक्त आनंद लुटला. सौ.शकुंतला हिंगे यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना अप्रतिम भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दगडू वेताळ यांनी केले.

Read more...
Open chat