दुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा;मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याचे दिले आश्वासन
सजग वेब टिम, मुंबई
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज संध्याकाळी ८ वाजता राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
सोलापूर जिल्ह्यातील काही गावे त्याचप्रमाणे दिनांक १२ आणि १३रोजी सातारा जिल्ह्यातील माण, अहमदनगर जिल्ह्यातील काही गावे आणि बीड जिल्ह्यातील गावांना शरद पवारांनी भेट देत तेथील जनतेच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्या समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बैठकीदरम्यान मांडल्या.
पिण्याच्या पाण्याच्या समस्याबद्दल सांगताना पिण्याचे पाणी हे पुरेसं नियमित वेळेवर नाही. कमी अधिक प्रमाणात त्याचबरोबर अशुद्ध पाणी पुरवठा व जनावरांसाठी पाणी नसताना या सगळ्या बाबींचा विशेषत्वाने उल्लेख केला. टँकरसाठी पाणी भरताना त्यामुळे वीजेची समस्यासुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात मोठी अडचण असल्याचे निदर्शनास आणलं. शिवाय बीड जिल्ह्यामध्ये भेट दिली. त्यावेळी येथील चारा संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. छावण्या सुरू झाल्या तरी चारा न मिळाल्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असल्यामुळे व्याजाचा भुर्दंड बसत असल्यामुळे जनावरांना चारा देण्याची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे छावण्या बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्या समस्यांचे गांभीर्य निदर्शनास आणून देत त्यांची देयके वेळेवर जातील याकडे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
त्याचप्रमाणे चारा छावणी चालण्यातील अडचणीत केवळ उसाचा चारा देवू केला जात आहे. त्याचे प्रमाण कमी असणे याची पद्धत क्लिष्ट स्वरूपाची असेल असं जनावरांचे आकडेवारी रोजच्या रोज कळवणं अशा बऱ्याच समस्या या बाबींचा चारा छावणी चालकांना त्रास होत असल्याचा प्रामुख्याने निदर्शनास आणून दिले.
प्रति जनावर 90 रुपये इतके चारा छावणी चालवण्यासाठी असणारे अनुदान अपुरे असल्याचे देखील शरद पवारांनी निदर्शनास आणले. ते आता शंभर रुपये प्रति जनावर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
केंद्रशासनाने अन्नसुरक्षा कायदा लागू केल्यानंतर सुद्धा दुष्काळी भागातील जनतेला रेशन कार्डवर अन्नधान्य मिळत नसल्याची तक्रार शरद पवारसाहेबांनी केली. त्यावेळेस साधारणतः बीपीएल अंतर्गत 7 कोटी लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा शासनाचा असल्याचं शासनातर्फे सांगण्यात आलं मात्र दुष्काळी परिस्थितीमध्ये बीपीएल, एपीएल आणि सर्वांनाच यांना अत्यल्प दरात आणि त्यावरील असलेले घटक असतील त्यांना परवडेल असे दरामध्ये धान्य सरसकट देण्यात यावे ही विनंती देखील शरद पवारांनी केली.
या बैठकीत प्रति जनावर रुपये शंभर येथे चारा छावण्या अनुदान केल्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि त्यामध्ये 120 रुपयेपर्यंत वाढ करण्याच्या दृष्टीने निश्चित लक्ष देईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाजातील प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणले की, शेळ्या-मेंढ्यांचा सुद्धा जनावरांच्या छावणीत प्रमाणे विचार करण्यात यावा त्यासाठी स्वतंत्र विचार करण्यात यावा ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणली. या गोष्टीकडे देखील लक्ष पुरवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, आमदार राणा जगजितसिंह, आमदार राजेश टोपे आदींसह दुष्काळी भागातील काही प्रतिनिधी उपस्थित होते.