परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर 

डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more...

राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात झालेल्या वादात दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल

प्रमोद दांगट, आंबेगाव (सजग वेब टीम)

मंचर | काल निरगुडसर येथे शिवसेना शाखा उदघाटन झाल्यानंतर दोन जमावा मध्ये झालेल्या भांडणे मारामारी नंतर दोन्ही पक्षाने एकमेका विरुद्ध अँट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केला असून यात विधानसभा माजी अध्यक्ष दिलीपराव वळसेपातील यांचे पुतणे व भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसेपाटील यांच्या सह 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर माजी उपसरपंच रवी वळसेपाटील यांच्या पत्नी मनीषा वळसेपाटील यांच्या सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून
फिर्यादीचे अमरजीत नामदेव गायकवाड( वय 30 वर्ष, धंदा खाजगी नोकरी, रा. निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे.)
,प्रदीप प्रताप वळसे,रामदास पांडुरंग वळसे,राहुल झुंजारराव हांडे,विश्वास भिकाजी गोरे,मिलिंद बाजीराव वळसे, मंगेश संभाजी वळसे,संदीप भाऊ सो वळसे,संतोष बापूराव वळसे,संदीप सदाशिव टेमकर,संतोष महादू टाव्हरे,विकास बाबाजी टाव्हरे , उदय हंबीराव हांडे ,अक्षय बाळासाहेब थोरात,शुभम अंबादास भोंडवे,ज्ञानेश्वर उर्फ माउली आदक (पूर्ण नाव माहित नाही),प्रमोद दिनकर वळसे,शाम तुळशीराम टाव्हरे,धीरज हांडे (पूर्ण नाव माहित नाही), वैभव रामचंद्र वळसे, पंकज वळसे पूर्ण नाव माहित नाही अ न 1ते 20 सर्व रा निरगुडसर ता.आंबेगाव जि.पुणे संजय नामदेव गोरे, तुषार सोपान टाव्हरे,संतोष दत्तात्रय मेंगडे,मंदाकिणी प्रताप वळसे, उर्मिला संतोष वळसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शांताराम रामभाऊ उमाप (वय,४६,रा.निरगुडसर) यांनी गणपत मारुती वळसे, मनीषा रवींद्र वळसे,राजेंद्र बबन वळसे,रेश्मा राजेंद्र वळसे,वसंत शंकर वळसे, अलका वसंत वळसे,विशाल वसंत वळसे,विकास वसंत वळसे,विद्या विशाल वळसे,अमर नामदेव गायकवाड,विकास कडवे,महेश गणपत राऊत,वैभव बाळासाहेब किरे,राजेंद्र पंचरास आदी वर गुन्हा दाखल केला आहे परिस्थिती शांत असून
सदर गुन्ह्याचा तपास खेड आंबेगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे करत असून त्यांनी ग्रामस्थांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.

Read more...

विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का ? त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा – वळसे पाटील

“विधानसभेला जर यश येत तर लोकसभेला का येत नाही. देशातील सरकार, राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येतय का ? त्यांना आपण तीन वेळा निवडून दिले त्यांनी काय दिवे लावले, रेल्वेचे काम होईल तेव्हा होईल पहिला मंचर चा एस.टी डेपो चालू करून दाखवा”

– आ. दिलीप वळसे पाटील

(निर्धार परिवर्तनाचा सभा, मंचर)

Read more...

राष्ट्रवादीची लोकसभेसाठी जाहिरनामा समिती जाहीर, अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड

 

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहिरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली असून या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभेसाठी जाहिरनामा समितीची घोषणा केली आहे.

या समितीमध्ये सदस्य म्हणून आमदार भास्करराव जाधव, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विदया चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.विक्रम काळे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, प्रदेश प्रवक्ते भूषण राऊत यांचा समावेश आहे.

Read more...
Open chat