गुळाणीच्या सरपंचपदी ७५ वर्षाच्या आजीबाई


बाबाजी पवळे, राजगुरूनगर (सजग वेब टीम)

राजगुरूनगर – तुम्ही तुमच्या गावचं सरपंचपद ७५ वर्षीय आजीबाईंना द्याल का हो? पुणे जिल्ह्यातील गुळाणी ग्रामपंचायतीचा गाडा मात्र आता ७५ वर्षीय महिलेच्या हाती सोपवण्यात आला आहे.

७५ वर्षीय इ़ंदुबाई हनमंत ढेरंगे अंगठेबहाद्दर या आजी थेट जनतेतून सरपंच झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गुळाणी ग्रामपंचायतीचा गाडा त्या हाकणार आहेत.

गुळाणी गावचे सरपंचपद महिलांसाठी राखीव घोषित होताच, वयाच्या ७५ व्या वर्षी या आजीबाईनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. विरोधकाला पाणी पाजून विजयही निश्चित केला.

इंदूबाई अंगठेबहाद्दर असल्या तरी त्यांनी गावाचा विकास करण्याचा ध्यास बांधला आहे. इंदुबाईंना थेट जनतेतून सरपंचपदाच्या खुर्चीवर बसून एक गावाने इतिहास रचला आहे. या वयातही गुळाणी गावचा गाडा हाकून त्या गावचा विकास करतील असा विश्वास गावकऱ्यांनी दाखवला आहे.

गावच्या विकासासाठी त्यांची ही धडपड नव्या पिढीला लाजवेल अशीच आहे. यातून भावी पिढीसमोर मात्र एक आदर्श उभा केला, हे नक्की.

Read more...
Open chat