नवदाम्पत्याचे कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचे ध्येय

नवदाम्पत्याचे कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचे ध्येय

सजग वेब टीम, मुंबई

मुंबई | लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य सुखी संसाराच्या स्वप्नात रममाण होतात. पुढील आयुष्य कसे असेल याचे नियोजन करतात. पण मुलुंडमधील एक नवविवाहित जोडप्याने सामाजिक भान ठेवत वेगळा विचार केला. आहे. या नवदाम्पत्यांची समाजासाठी झटणार्‍या कोरोना योद्धांसाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार सध्या त्यांच्या डोळ्यासमोर आहे. याच हेतूने त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य सुरू केले आहे. आपण थोडीफार मदत करू शकतो, याचे समाधान त्यांना आहे.

टाळेबंदी काळात अनेकांची लग्न रखडली. अखेर, सरकारने नियमावली जाहीर करत लग्न करण्याची परवानगी दिली. त्यानंतर काही जणांनी 50 जणांच्या उपस्थितीत लग्न केलं. अशाच पद्धतीने मीरा आणि अभिषेक कुलकर्णी यांनी 25 जूनला लग्न केलं. विवाह झाल्यानंतर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी कोरोना वॉरियरला मदत करण्याचे ठरवले. विवाहानिमित्त जे पैसे वाचले, त्याचा सदुपयोग झालाच पाहिजे. आपले अनुकरण इतर नवदाम्पत्यांनीही केले पाहिजे. हा विचार करून मीरा आणि अभिषेकने नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत कोरोना योद्धा पोलिसांना मास्क, सॅनिटायजरचे वाटप केले.

Read more...

प्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार

प्रशासनानेच केला ८५ वर्षांच्या आजीचा अंत्यसंस्कार 

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव (दि.११) | नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी या गावातील मनिषा कैलास शेळके यांचे सर्व कुटुंब (एकूण ९ रुग्ण) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सर्व कुटुंबियांना लेण्याद्री कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यातच दुर्दैवाने शेळके यांच्या सासू लक्ष्मीबाई सखाराम शेळके वय ८५ वर्षे रा. धनगरवाडी ता. जुन्नर, जि. पुणे यांचा राहत्या घरी मृत्यू झाला.

प्राथमिक अंदाजानुसार त्या सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय असून त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी कुणीही कौटुंबिक सदस्य नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनालाच पुढाकार घ्यावा लागला. नारायणगाव पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत धनगरवाडी व आरोग्य विभाग यांच्या वतीने आजींचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी सपोनि अर्जुन घोडे पाटील, नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ व आरोग्य विभागाचे कर्मचारी व सरपंच शेळके ताई, ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके आदी उपस्थित होते.

रुग्ण आढळलेल्या ठिकाणी योग्य उपाय योजना करून सर्व परिसर निर्जंतुक करण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी सांगितले आहे.

Read more...

कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासाच्या आत देणे बंधनकारक – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

कोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने २४ तासाच्या आत जाहीर करणे बंधनकारक – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

सजग वेब टीम, पुणे

पुणे, दि. ८ | कोरोना संशयित व्यक्तींचे चाचणीसाठी घेतलेल्या नमुनांचा अहवाल २४ तासांच्या आत करण्याचे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल रुग्ण ज्या भागातील रहिवासी आहे म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसैकर यांच्या अध्यक्षतेखाली कोवीड -१९ संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने खासगी प्रयोगशाळा चालकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या.
सर्व प्रयोगशाळा चालकांनी दररोज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या नमुन्यातील अहवाल न चुकता श्री. कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक कार्यालय यांच्याकडे सादर करावे. चाचणी बाबत आरटी-पीसीआरवर डेटा दररोज अपलोड करण्यात यावा व दैनंदिन अहवाल सनियंत्रण अधिकारी यांना देण्यासाठी प्रत्येक प्रयोगशाळेने एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांक कळविण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसैकर दिल्या.

Read more...

जुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा

जुन्नर तालुक्याला पडलाय कोरोनाचा वेढा

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना चा प्रसार दिवसेंदिवस वाढतोय. आज तालुक्यात ओतूर पोलिस स्टेशन, वारुळवाडी, विठ्ठलवाडी-येणेरे व संतवाडी-आळे व जुन्नर येथे कोरोनाबाधित एकूण पाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या ५८ झाली. यापैकी ३२ जण बरे झाले आहेत, तर २४ जण उपचार घेत आहेत. औरंगपूर व मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये १७, तर पुणे येथे ७ जण उपचार घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्‍यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरीकांची आणि प्रशासनाची चिंता देखील वाढत चालली आहे. जुन्नर शहरात दुसरा रुग्ण आढळून आला आहे. उंब्रज, ओतूर, आळे व सावरगाव येथील रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

गावनिहाय अॅक्टिव्ह रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे:- डिंगोरे – १ (बरा), सावरगांव – ५ (बरे), मांजरवाडी – २ (बरे),पारुंडे – ३ (बरे), आंबेगव्हाण – २ (बरे),धोलवड – ३ (बरे ), धालेवाडी तर्फे मिन्हेर – १ (बरा), विठ्ठलवाडी -वडज – १ (बरा),शिरोली तर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी – १(बरा) ,कुरण – १(बरा), चिंचोली – ३(बरे),ओतुर – २ (बरा) जुन्नर- १(बरा), राजुरी- १(बरा), नवलेवाडी – १(बरा) ,धामणखेल -१(बरा),कुसुर- १(बरा).

मृत्यू:- औंरगपूर – १(मृत्यू), मोकासबाग-१ (मृत्यू), अॅक्टिव्ह :- बोरी- ३,खामुंडी-७, खानापूर-३, शिरोली खुर्द-३,उंब्रज नंबर एक-१. धनगरवाडी – १, ओतूर-१, वारूळवाडी-१, विठ्ठलवाडी-१, संतवाडी,-१,वारुळवाडी-१,जुन्नर-१. एकुण रुग्ण ५८, मृत्यू – २, बरे ३२, ऍक्टिव्ह – २४.

Read more...

हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी

हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.२८| हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने ५० लाख रूपयांचा सहायता निधी कर्नल सालणकर यांनी जिल्हाधिकरी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्त केला. यामध्ये वीस लाख रूपये पंतप्रधान सहायता निधी, २० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-१९ , आरोग्य विभागास पाच लाख रूपयाचे पीपीइ किट व उपविभागीय अधिकारी पुणे शहर व तहसीलदार मुळशी यांच्यकडे पाच लाख रूपयांचे 850 धन्य किट देण्यात आले.

 

विभागीय आयुक्त् कार्यालयात धनादेश प्रधान करतेवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.

Read more...

मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय

सजग वेब टिम, जुन्नर

मुंबई दि २१ |  कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल.म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.

फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील

बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे

राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read more...

कोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

कोरोनाच्‍या दोन व्‍यक्‍तींना डिस्‍चार्ज- विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर

सजग वेब टिम, जुन्नर

पुणे, दि. २५ | जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्‍या दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, त्‍यामुळे आज त्‍यांना डीस्‍चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्‍यांच्‍या पहिल्‍या टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, आज त्‍यांच्‍या दुस-या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटीव्‍ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देतांना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण ८२५ नमुने घेतले होते, त्‍यापैकी ७३७ चे अहवाल प्राप्‍त झाले. यामध्‍ये ६९२ अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर ३७ अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ ९० टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. त्‍याचे नागरिकांनी कुठेही उल्‍लंघन करु नये, असे आवाहन करुन ते म्‍हणाले, या २१ दिवसांत आपल्‍या सर्वांची साथ, सर्वांचे सहकार्य या परिस्थितीवर मात करण्‍यासाठी मदत करु शकते. कोणत्‍याही जीवनावश्‍यक वस्‍तू म्‍हणजे औषधी, भाजीपाला, अन्‍नधान्‍य आपल्‍यापर्यंत पोहोचवण्‍याचा आमचा आटोकाट प्रयत्‍न राहील, प्रशासन यासाठी नियोजन करत आहे. आपण या नियोजनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला. या संकट समयी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या, असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा, त्‍याच बरोबर सगळयांना सुरक्षित ठेवा, असेही ते म्‍हणाले.

Read more...

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे सहवासितही पॉझिटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई, दि.१० | पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई – पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून राज्यात ३०९ पैकी २८९ जणांचे अहवाल कोरोनासाठी निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या करोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ५९१ प्रवासी आले आहेत.
१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत.
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४

Read more...
Open chat