कल्याणी पवार यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर

कल्याणी पवार यांना ग्रामविकास प्रतिष्ठान राजगुरूनगर या संस्थेचा महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर

सजग वेब टीम, बाबाजी पवळे

राजगुरूनगर | पुर,ता.खेड येथे वृद्धाश्रम उभारून अनाथ व वाचताना आधार देत सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या कल्याणी दिनकर पवार यांना ग्रामविकास प्रतिष्ठान राजगुरूनगर,जि.पुणे या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे व पुरस्कार समिती अध्यक्ष रामदास दौंडकर यांनी पुरस्कार निवडीचे पत्र दिले.१२ फेब्रुवारीला मुंबई मराठी पत्रकार संघ भवन मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श पुढे ठेवून पुरसारख्या ग्रामीण भागात वृद्धाश्रम उभा केला असून त्याद्वारे एक भरीव असे सामाजिक कार्य कल्याणी पवार यांनी उभे केले आहे. पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याबद्दल पवार यांचे कौतुक होत आहे.समाजात कार्यरत असताना हा पुरस्कार कार्य करण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल असे कल्याणी पवार यांनी मत व्यक्त केले.

Read more...
Open chat