कळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी

कळमोडी पाणलोट समितीचे जलसंपदामंत्र्यांना निवेदन; पूर्व भागात पाणी सोडण्याची मागणी

सजग वेब टिम

मुंबई – खेड तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांना कळमोडी धरणाचे पाणी मिळावे यासाठी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची कळमोडी पाणलोट समितीने भेट घेऊन निवेदन दिले
कळमोडी उपसा जलसिंचन योजनेचे अंदाजपत्रक व सर्वेक्षण अहवाल मुख्य अभियंता जलसंपदा पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून तात्काळ निधीबाबतीत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे यांना दिले
कळमोडी धरणातून प्रलंबित असलेली उपसा जलसिंचन योजना तातडीने कार्यान्वित व्हावी यासाठी संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना काल लेखी निवेदन सादर केले.

आज मुंबई येथील गिरीष महाजन यांच्या निवासस्थानी कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे,खजिनदार रामदास दौंडकर,सल्लागार जयंत टावरे,संचालक वसंत राऊत यांनी भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली.तेव्हा सर्वेक्षण व अंदाजपत्रक अहवाल शासनाकडे आल्यानंतर तातडीने कार्यवाही करू असे सांगितले.मागील आठवड्यात केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट संस्थेच्या वतीने घेतली होती.तसेच लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन याप्रश्नी न्यायाची मागणी करणार आहे.

Read more...
Open chat