कनेरसर येथील यमाई देवस्थानच्या अध्यक्षांसह चौघे निलंबित

बाबाजी पवळे (सजग वेब टीम)

राजगुरूनगर | कनेरसर (ता.खेड) येथील यमाईदेवी देवस्थानचे अध्यक्ष मोहन दौंडकर व तीन विश्वस्तांना अनागोंदी कारभाराबद्दल निलंबित करण्यात आले असल्याची माहिती अॅड. नितीन कास्लिवाल यांनी दिली.

यमाई देवस्थानच्या अध्यक्षांसह विश्वस्तांना निलंबित करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली असून तालुक्यातील इतर देवस्थानचे धाबे दणाणले आहेत.

कनेरसर येथील यमाई देवस्थान येथील अनागोंदी कारभाराबद्दल ग्रामस्थांनी धर्मदाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवरून धर्मदाय आयुक्तांनी न्यासाचे व विश्वस्तांचे चौकशीबाबत आदेश दिले होते. निरीक्षकामार्फत केलेल्या चौकशीमध्ये तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यावर ट्रस्टविरूध्द सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम कलम ४१ (ड) नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार विश्वस्तांना नोटीसा काढण्यात आल्या होत्या व त्यांची बाजू ऎकून घेतल्यावर अध्यक्ष मोहन दौंडकर यांचेसह उपाध्यक्ष प्रशांत म्हसुडगे, सुनिल दौंडकर व विठ्ठल ताम्हाणे यांना निलंबित केले आहे.

यमाईदेवी देवस्थानचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्याने तालुक्यातील अन्य देवस्थानांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार चालू असल्याची जोरदार चर्चा आहे.

Read more...
Open chat