आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला – आशाताई बुचके

जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. १६ ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप सर्व पक्षीय कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांनी कुकडी प्रकल्पातील विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला असून त्यांना नियोजन करता आले नसल्याची बोचरी टीका करत आमदार सोनवणे यांना घरचा आहेर दिला.

Read more...

हक्काचे पाणी राखू शकलो नाही हे आमच्या तालुक्याचे दुर्दैव – अतुल बेनके

आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला – आशाताई बुचके

औषध उपचारानिमित्त दवाखान्यात असल्याने उपस्थित राहू शकलो नाही – आमदार सोनवणे

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर | कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. १६ ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप सर्व पक्षीय कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे अन्यथा साम दाम दंड भेदाच्या नीतीचा अवलंब करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अतुल बेनके म्हणाले, कुकडी प्रकल्पाचे तालुक्यातील धरणांबाबतचे नियोजन पूर्ण फसले आहे. हक्काचे पाणी राखू शकलो नाही हे आमच्या तालुक्याचे दुर्दैव आहे. पाण्याबाबत राजकारण कधी केले नाही. जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांना दम देणाऱ्या विरोधात योग्य वेळी भूमिका घेऊ असे आमदार सोनवणे यांचे नाव न घेता बेनके यांनी सांगितले. आमदार शरद सोनवणे पुणे येथे औषध उपचारानिमित्त दवाखान्यात असल्याने ते उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते.

यावेळी संतप्त झालेल्या आशा बुचके यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व आमचा लोकप्रतिनिधी पाण्याच्या नियोजनाबाबत नालायक ठरला असून त्यांना नियोजन करता आले नसल्याची बोचरी टीका करत आमदार सोनवणे यांना घरचा आहेर दिला. यांच्यावर करत पाण्याचे तालुक्यात एमआयडीसी नसल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे, मात्र याची मांडणी लोक प्रतिनिधीने योग्य प्रकारे केली नाही. धरणे आमच्या तालुक्यात असताना इतर जिल्ह्यातील लोकांची दादागिरी खपवून घेणार नाही असे बुचके यांनी बजावले. सत्यशील शेरकर म्हणाले की, मागील आवर्तनाच्या वेळी प्रशासनाने पुन्हा आवर्तन सोडणार नाही, असे सांगून फसवणूक केली आहे.

दरम्यान माणिकडोह धरणात सद्यस्थितीत 278 दशलक्ष घनफुट इतका उपयुक्त पाणीसाठा शिलक आहे. यापैकी 150 दशलक्ष घनफुट पाणीसाठा जुन्नर शहर व लाभक्षेत्रातील काही गावांसाठी पिण्यासाठी शिल्लक ठेऊन उर्वरित पाणी या आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे. आज पासून सुरू झालेले आवर्तन सुमारे सव्वीस तास चालणार असल्याचे सांगण्यात आले. पाणी हे गाळमिश्रित असल्याने ते पिण्यासाठी किती योग्य आहे असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत. पिण्याच्या नावाखाली राजकीय दबावापोटी अन्य जिल्ह्यातील शेती व्यवस्था वाचविण्याचा प्रयत्न यातून होत तर नाही अशी शंका माणिकडोह धरणावर अवलंबित शेतकरी व्यक्त करत आहेत.

Read more...

जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी; चर्चा आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची

पुणे : आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा जुन्नर तालुक्यात सुरूआहे. हे वृत्त समजल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या व जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार असलेल्या आशाताई बुचके यांच्या सर्व समर्थकांनी नारायणगाव येथील विश्रामगृहावर बैठक घेऊन आमदार सोनवणे यांच्या शिवसेनाप्रवेशास विरोध दर्शविला. जर सोनवणे यांना प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती, तसेच अनेक पदांवर काम करणाऱ्या शिवसैनिकांनी सामूहिकरीत्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. याबाबत वृत्तपत्र व सोशल मीडियावर जुन्नर तालुक्यात शिवसेनेत फूट पडणार, तसेच लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी जुन्नर विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी, अशा बातम्या आल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकारी दि. ५ मार्च रोजी मातोश्रीवर भेटण्यासाठी गेले होते.

प्रवेश दिल्यास जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे दबावतंत्र वापरून जि. प. गटनेत्या आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीस गेल्यानंतर या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याने या पदाधिकाऱ्यांना कोणतेही म्हणणे सादर न करताच माघारी यावे लागले. ठाकरे यांनी पदाधिकाºयांच्या राजीनाम्याच्या दबावतंत्राला दाद न दिल्याने आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना
प्रवेशास हिरवा कंदील दिला असल्याचे मानले जात आहे. येत्या आठ दिवसांत आमदार सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची दाट शक्यता असून आमदार सोनवणे यांचा प्रवेश झाला तर आशाताई बुचके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार सोनवणे यांच्या प्रवेशापूर्वी जुन्नर तालुक्यातील प्रमुख पदाधिकाºयांना मातोश्रीवर बोलाविण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

 

जुन्नर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी
आशाताई बुचके यांनी वैयक्तिक भेट मागितली असता उद्धव ठाकरे यांनी ‘मला तुमच्याशी बोलायचे नाही, पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा’ असे म्हणत भेट देण्यास नकार दिला. तसेच हॉलमध्ये येऊन सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी आशाताई बुचके यांना राजीनाम्याच्या दबावतंत्रावर खडे बोल सुनविले. मीडियामार्फत आपण केलेले वक्तव्य पक्षाला अशोभनीय आहे. आपण पक्षापेक्षाही मोठ्या झाल्या आहात. तुम्ही तालुक्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पक्षाबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रथम पक्षाची माफी मागा. त्यानंतर आपणास भेटण्यास टाईम देऊ, असे स्पष्ट केले, बेशिस्तपणा चालणार नाही, अशी तंबीही पदाधिकाऱ्यांना दिली. जुन्नर तालुक्यातून राजीनामे देण्याचे दबावतंत्र करून मातोश्रीवर गेलेल्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी हवा काढून घेतल्याने आशाताई बुचके व त्यांचे समर्थक एकाकी पडले आहेत. आमदार सोनवणे यांचा प्रवेश निश्चित असल्याचे त्यांना मिळालेल्या वागणुकीवर स्पष्ट झाल्याने आता आशाताई बुचके यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read more...

आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध

आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध
– पदाधिकारी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत

सजग वेब टीम, जुन्नर

नारायणगाव – जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग शासकीय विश्रामगृह वारुळवाडी याठिकाणी आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. काल प्रसिद्ध झालेल्या आमदार सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत च्या वृत्ताने जुन्नर तालुक्यातील शिवसेनेत अस्वस्थता पसरली असून विविध पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यासंबंधीची मतं आज माध्यमांसमोर व्यक्त केली.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात यावा अशी मुख्य मागणी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष नेतृत्वाकडे करण्यात आली. आम्हांला विश्वासात घेऊन च वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावेत अन्यथा आम्ही सर्व जण आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा देऊ असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला असून याबाबत पक्ष नेतृत्वाने गंभीरपणे विचार करावा. शिवसैनिकांचा विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे असं सांगताना उमेदवारीबाबत दगा फटका झाल्यास कार्यकर्ते म्हणतील ती माझी पुढील दिशा असेल असंही सूचक विधान यावेळी केलं.

जर सोनवणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर बुचके या अपक्ष लढणार का? अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. जुन्नर तालुका शिवसेनेने पक्ष नेतृत्वाला आता सूचक इशारा दिला असून यावर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या पत्रकार परिषदेवेळी उपतालुका प्रमुख संतोष खैरे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुका संघटक योगेश पाटे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, संभाजी तांबे, जीवन शिंदे, मंगेश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Read more...
Open chat