आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी या सदरातील सावित्रीची लेक आहेत..


हलीमा कुरेशी

एका मुस्लिम घरातून आलेल्या हलीमादिदी आज पत्रकारिता या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवत आहेत.
घरुन आई-वडिलांकडून शिक्षण घेण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन याचा हलीमादिदी व त्यांच्या भावंडांनी सदुपयोग करत वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.

हलीमादिदींचं संपूर्ण नाव हलीमाबी अब्दुल कुरेशी.
तसा त्यांच्या घरचा व्यवसाय खाटिक व्यवसाय. पण वडिलांनी तो झुगारला व ते ट्रक ड्रायवर म्हणून संपूर्ण भारतभर फिरू लागले. मुलींना शिक्षण देवून मोठं करण्याचा विचार इथूनच अधिक बळकट होत गेला.
हलीमादिदींचं शिक्षण विज्ञान शाखेतून झालं, पुढे आवड म्हणून त्यांनी रानडे इन्स्टिट्यूूटमधून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.
व गेल्या साड़ेपाचवर्षांपासून त्या न्यूज़18 साठी काम करत आहेत.या काळात त्यांनी आळंदी ते पंढरपूर वारी,
दुष्काळाचं कव्हरेज २०१५,
माळीन दुर्घटना,
एम आय टी कॉलेज मधील रॅगिंग प्रकरण,
घुमान साहित्य संमेलन पंजाब,
गोवंश हत्याबंदी चे सामाजिक आर्थिक परिणाम,
सफाई कामगारांची व्यथा,
वंचित घटकांचे प्रश्न समोर आणणारी अनेक वार्तांकन अशा अनेक मुद्यांना हात घातला.

पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा प्रतिष्ठित रामनाथ गोएंका राष्ट्रीय पुरस्कार,२०१६
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मिळाला.

हलीमादिदी सध्या रानडे इंस्टिट्यूट या नामांकित इन्स्टिट्यूटमधे विजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवत देखील आहेत.त्याचबरोबर त्या विज्ञान विषयांतर्गत व्याख्यानेदेखील देतात. तसेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करतात व मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देताना दिसतात.

इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणाऱ्या हलीमादिदींनी सामाजिक विषयांवर लेखन केलं आहे.

मुस्लिम समाजातुन आलेल्या या मुलीला स्वःताच्या समाजातुन तर पाठिंबा मिळालाच, पण सर्व समाजातुन आज त्यांना एक मानाचं स्थान देखील मिळतंय.

अशा या तुम्हां-आम्हांला माहित असणाऱ्या, जाणून-उमजुन पत्रकारिता पत्रकाराने करावी असं सांगत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा लौकिक टिकावा,यासाठी कटिबद्ध असणाऱ्या हलीमादिदींना लोकसंस्थेचा मानाचा मुजरा व त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!

-स्नेहल डोके-पाटील

Read more...
Open chat