आमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेना प्रवेश

जुन्नर | मनसेचे एकमेव आमदार पूर्वाश्रमीचे शिवसैनिक जुन्नर चे आमदार शरद सोनवणे यांची उद्या सोमवार दिनांक ११ मार्च रोजी पुन्हा शिवसेनेत घरवापसी होत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेना भवन येथे शक्तिप्रदर्शन करत ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे. कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३वा वर्धापन दिन पार पडला आणि त्यांनंतर आलेली हि बातमी म्हणजे मनसेला मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनंतर मनसे चा एकमेव आमदारही आता शिवसेनेच्या गळाला लागला आहे.

बरोबर ५ वर्षांपूर्वी २०१४ साली आमदार शरद सोनवणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर जुन्नर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत मनसेचे विद्यमान सर्व आमदार पराजित झाले फक्त आ. सोनवणे हे एकमेव उमेदवार निवडून आले होते.

शिवजयंती कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही भूमिपूजन कार्यक्रम पार पडले होते त्यावेळी राज ठाकरे यांचा फोटो फ्लेक्सबोर्ड वर नव्हता त्याचवेळी या प्रवेशाची कुणकुण लागली होती यामुद्द्यावरून सोशल मीडियावर वादही झाला होता.

Read more...
Open chat